कार्यक्षम आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा समाजातील सर्व सदस्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्याची तरतूद सुनिश्चित करणे हे राज्याच्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक आहे. हा कोणताही विशेषाधिकार किंवा उपकार नाही जो कधीतरी दिला जाऊ शकतो आणि कधीतरीकाढून घेतला जाऊ शकतो.
आगे पढ़ेंCategory: Hindi
Hindi articles
बेस्ट भाडेवाढ - एक जनविरोधी पाऊल:
ऑपरेशन ब्लूस्टारचा ४१ वा स्मृतीदिन:
प्रार्थनास्थळावरील हल्ला – राज्याच्या दहशतवादाचे कृत्य
६ जून २०२५ हा केंद्रीय सशस्त्र दलांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर केलेल्या हल्ल्याचा ४१ वा स्मृतीदिन होता. त्या हल्ल्याला अधिकृतपणे ऑपरेशन ब्लूस्टार असे नाव देण्यात आले होते .
त्यावेळी खरोखर काय घडले आणि ते का घडले याबद्दल सत्य जाणून घेणे आवश्यक आहे. हे आवश्यक आहे कारण आपल्याला अजूनही बऱ्याच वेळा, राज्याचा दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचाराचा धोका, तसेच विविध सबबीखाली प्रार्थनास्थळांवर हल्ले आदींचा सामना करावा लागत आहे.
आगे पढ़ें
इराणवरील इस्रायली हल्ल्याचा धिक्कार करा
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, १७ जून, २०२५
इराणवरील अमेरिकेने समर्थित इस्रायली युद्धाचा निषेध करण्यासाठी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी जगातील शांतताप्रेमी लोकांसोबत सामील झाली आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चे नेते आणि कार्यकर्त्यांच्या हिंदुस्थानी राज्याने केलेल्या हत्येचा निषेध करा
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २३ मे २०२५
२१ मे रोजी, हिंदुस्थानी सुरक्षा दलांनी छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या करिगट्टा टेकड्यांवरील जंगलात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चे सरचिटणीस कॉम्रेड केशव राव आणि इतर २६ पार्टी सदस्यांना घेरून ठार मारले.
सीपीआय (माओवादी) च्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या तसेच आदिवासींच्या हिंदुस्थानी राज्याने केलेल्या निर्घृण हत्येचा हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीची केंद्रीय समिती निषेध करते.
आगे पढ़ेंडिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा:
राज्याच्या पाळत ठेवण्याच्या यंत्रणेला कायदेशीर ठरविण्यासाठी आणि लोकांच्या हक्कांवर हल्ला करण्यासाठीचे एक साधन
नियम २२ ने आणखी एक पाऊल पुढे टाकत सरकारला व्यक्तींच्या संमतीशिवाय कंपन्यांकडून संवेदनशील वैयक्तिक डेटा मागण्याची व्यापक परवानगी मिळवून दिली आहे. याचा अर्थ असा की कोणतीही सरकारी संस्था – इंटेलिजेंस ब्युरोपासून ते स्थानिक पोलिस स्टेशनपर्यंत – संमतीशिवाय, सुरक्षा उपायांशिवाय आणि जबाबदारीशिवाय वैयक्तिक डेटा कायदेशीररित्या मिळवू शकते.
आगे पढ़ें
चला 20 मे रोजी होणाऱ्या सर्व हिंद सार्वत्रिक संपाला आपण यशस्वी करूया!
कामगार एकता कमिटीचे आवाहन, 9 मे 2025
या संपाच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्य सरकारांना आम्ही कामगार सांगू इच्छितो की “व्यवसाय सुलभता” सुधारण्याच्या नावाखाली आमच्या हक्कांवर ते करत असलेले हल्ले स्वीकारण्यास आम्ही नकार देतो. भांडवलदारांसाठी जे सर्वोत्तम आहे ते देशासाठी सर्वोत्तम आहे हा युक्तिवाद स्वीकारण्यास आम्ही नकार देतो. नाही, भांडवलदारांसाठी जे सर्वोत्तम आहे ते कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध आहे. ते संपूर्ण हिंदुस्थानी समाजाच्या हिताच्या विरुद्ध आहे.
आगे पढ़ें
काश्मिरी लोकांवरील आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांचा निषेध करा!
राज्याच्या दहशतवादाला कोणत्याही आधारावर उचित ठरवता येणार नाही!
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ३ मे २०२५
संपूर्ण जगासमोर जे उघडपणे सुरू आहे तो म्हणजे निर्लज्जपणे केलेला राज्याचा दहशतवाद आहे. समाजातील सर्व सदस्यांना संरक्षण देण्याऐवजी, हिंदुस्थानी राज्याने काश्मिरी लोकांविरुद्ध, सर्व मुस्लिमांविरुद्ध आणि सरकारच्या कथनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध दहशत पसरवली आहे.
सर्व महिला आणि विवेकी पुरुषांनी, राज्याच्या या दहशतवादाचा एकजुटीने विरोध करण्याचे आणि हिंदुस्थानी लोकांच्या एकता आणि एकात्मतेच्या रक्षणासाठी उभे राहण्याचे काळाचे आवाहन आहे.
आगे पढ़ें
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करा!
हिंदुस्थान ची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २६ एप्रिल २०२५
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
आगे पढ़ेंमे दिन 2025:
कामगार-शेतकरी ऐक्य बळकट करूया आणि येणाऱ्या क्रांतिकारी वादळांसाठी सज्ज होऊया!
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 29 एप्रिल 2025
कामगार साथींनो,
या वर्षी मे दिन अशा वेळी येत आहे जेव्हा जगभरातील कामगार त्यांच्या उपजीविकेवर आणि हक्कांवर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध दृढ संघर्ष करत आहेत. भांडवलशाही व्यवस्था खूप खोल संकटात आहे. भांडवलदार शासक वर्ग आणि त्याच्या सेवेतील सरकारे त्यांच्या शोषणकारी व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी राक्षसी पद्धतींचा अवलंब करत आहेत.
आगे पढ़ें
मे दिन, आंतरराष्ट्रीय कामगार वर्ग दिन झिंदाबाद!
भांडवलशाही शोषण संपवण्याचा संघर्ष मजबूत करूया!
कामगार एकता कमिटीची ललकारी, 26 एप्रिल 2025
दरवर्षी, जगातील सर्व देशांतील कामगार मोर्चे, रॅली, गेट मीटिंग आणि इतर प्रकारच्या कृतींसह दिन साजरा करतात. या दिवशी आपण कामगार म्हणून आपले हक्क खंबीरतेने मागतो. सर्व प्रकारच्या शोषण आणि दडपशाहीपासून मुक्तीसाठी लढण्याचा आपला संकल्प आपण व्यक्त करतो. 1890 मध्ये जेव्हा युरोप आणि उत्तर अमेरिकेतील कामगारांनी पहिला मे दिवस साजरा केला होता, तेव्हापासून ही कामगार वर्गाची परंपरा आहे.
आगे पढ़ें