कामगार, शेतकरी आणि ग्राहकांच्या एकजुटीच्या विरोधामुळे कर्नाटकातील वीज वितरणाचे खाजगीकरण थांबले

कामगार एकता कमिटीच्या  प्रतिनिधीचा अहवाल

मे २०२६ मध्ये, टाटा पॉवरने कर्नाटक विद्युत नियामक आयोगाकडे राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये वीज वितरणाची परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मागितलेल्या परवानगीमध्ये बंगळूरु ग्रामीण, म्हैसूरु, तुमकूरु, बेळागावी, धारवाड, उत्तर कन्नडा, दक्षिण कन्नडा आणि उडुपी यांसारख्या राज्यातील सर्व प्रमुख जिल्ह्यांचा समावेश होता.

Karnataka_electricity_protest२००३ च्या विद्युत कायद्यानुसार ही परवानगी मागण्यात आली होती. हा कायदा नियामक आयोगांना एका क्षेत्रात एकापेक्षा जास्त वीज वितरकांना परवानगी देण्याची मुभा देतो, मात्र त्यासाठी वितरकाने स्वतःची वीज वितरण पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असते. तथापि, टाटा पॉवरने केलेल्या अर्जात स्वतःची वितरण पायाभूत सुविधा उभारण्याच्या योजनेबद्दल कोणताही तपशील दिला नव्हता.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, संसदेच्या स्थायी समितीकडे प्रलंबित असलेल्या विद्युत (सुधारणा) विधेयक २०२५ नुसार, सरकारी वितरण कंपनी (डिस्कॉम) ला खाजगी वितरण परवानाधारकाला, त्यांच्याकडून “वापर शुल्क” (व्हीलिंग चार्जेस) घेऊन आपल्या वितरण पायाभूत सुविधा वापरण्याची परवानगी देणे बंधनकारक आहे. या विधेयकाला वीज कामगार, शेतकरी आणि उपभोक्ते यांच्या तीव्र विरोधाने सरकारला ते स्थायी समितीकडे पाठवण्यास भाग पडले. टाटा पॉवरने वितरण परवान्यासाठी केलेला अर्ज कदाचित, नजीकच्या भविष्यात संसदेकडून विद्युत (सुधारणा) विधेयक २०२५ मंजूर होईल या अपेक्षेनेच केला असावा.

समांतर वितरण परवाना हे डिस्कॉमच्या खाजगीकरणाच्या आणि विजेला एक अत्यावश्यक सामाजिक गरज न ठेवता व्यावसायिक वस्तू बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. देशातील प्रत्येक राज्यात वीज क्षेत्रातील कामगार आणि शेतकरी या दोघांनीही समांतर वितरण परवान्यासाठीच्या प्रत्येक अर्जाला विरोध केला आहे.

कर्नाटकातही, टाटा पॉवरच्या अर्जाला विरोध करण्यासाठी वीज क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आठवड्यामागून आठवडे, शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात निदर्शने केली. वीज क्षेत्रातील कामगारांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी बंगळूरुमध्ये एका अधिवेशनाचे आयोजन केले होते, ज्यात हजारो कामगार सहभागी झाले होते. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज आणि ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशन यांसारख्या वीज क्षेत्रातील कामगार आणि अभियंत्यांच्या अखिल भारतीय संघटनांनी घोषित केले की, देशभरातील वीज क्षेत्रातील सुमारे ३० लाख कामगार आणि अभियंते कर्नाटकच्या वीज कामगारांच्या समर्थनासाठी पुढे येतील. हजारो वीज उपभोक्त्यांनी टाटा पॉवरच्या अर्जाला विरोध करण्यासाठी कर्नाटक विद्युत नियामक आयोगाकडे आपले निवेदन पाठवले.

वाढता विरोध पाहून, टाटा पॉवरने ३ जुलै २०२६ रोजी परवान्यासाठीचा आपला अर्ज मागे घेतला.

वीज कामगार, शेतकरी आणि जनतेने दाखवलेल्या एकजुटीच्या विरोधाचा हा विजय आहे, ज्यामुळे वीज वितरणाच्या खाजगीकरणाचा हा प्रयत्न थांबला. वीज आणि इतर क्षेत्रांच्या खाजगीकरणाच्या कोणत्याही प्रयत्नाला विरोध करण्यासाठी संघर्ष हाती घेण्यासाठी कामगार आणि जनतेला ही एक प्रेरणा आहे.

हे सुद्धा वाचा:

Public Awareness Campaign Against Electricity Privatization and Smart Meters

High electricity prices in spite of surplus production shows the anarchy of capitalism

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *