गेल्या २५ वर्षांत इस्लामी दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या नावाखाली भडकवल्या गेलेल्या युद्धांमधून अमेरिकी साम्राज्यवाद आणि त्यांच्या लष्करी-औद्योगिक संकुलानेच नफा कमावला आहे. या युद्धांची किंमत अमेरिकेतील आणि इतर देशांतील कामगार वर्ग आणि जनतेलाच मोजावी लागली आहे. “दहशतवादाविरुद्धचे युद्ध” या बहाण्याचा वापर अमेरिकेतील आणि इतर देशांतील कामगार वर्ग आणि जनतेचा साम्राज्यवादी युद्धांना असलेला विरोध आणि त्यांच्या हक्कांवरील हल्ल्यांना चिरडण्यासाठी देखील केला गेला आहे.
आगे पढ़ेंTag: 11 सप्टेंबर 2001
अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त:
अफगाणी लोकांविरुद्धचे अमेरिकी साम्राज्यवादाचे राक्षसी गुन्हे कधीच विसरता येणार नाहीत
अफगाणिस्तानच्या लोकांना स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे
15 ऑगस्ट 2021, रोजी तालिबान सैन्याने काबूल शहरात प्रवेश केला आणि राष्ट्रपती महाल ताब्यात घेतला. काही तासांपूर्वी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी अमेरिकेच्या मदतीने देश सोडून पळून गेले होते. अमेरिकेने पैसे आणि प्रशिक्षण देऊन तयार केलेले तीन लाखांचे अफगाणी सैन्य लढाई न करताच बरखास्त करण्यात आले. या घटनांमुळे काबूलमधील अमेरिकेच्या समर्थित कठपुतळी राजवटीचा अंत झाला. याचबरोबर अफगाणिस्तानवरील सुमारे 20 वर्षांचा अमेरिकी साम्राज्यवादी कब्जा संपुष्टात आला.
आगे पढ़ें