९ जुलै रोजी सर्व-हिंद सार्वत्रिक संप:
भांडवलशाही आक्रमणाविरुद्धचा आपला संघर्ष आपण तीव्र करूया!
या संपाचे दैदीप्यमान यश सुनिश्चित करूया!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, २२ जून २०२५

आपले तात्काळ हातात घ्यायचे कार्य म्हणजे आपली एकता अधिक मजबूत करणे आणि आपल्या उपजीविकेवर आणि हक्कांवर होणाऱ्या सर्व हल्ल्यांविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र करणे. त्याच बरोबर, आपण हे ओळखले पाहिजे की केवळ हा प्रतिकार संघर्ष करणे पुरेसे नाही. कार्ल मार्क्सने आपल्याला शिकवल्याप्रमाणे, आपण हे विसरू नये की आपण “परिणामांशी लढत आहोत, परंतु त्या परिणामांच्या कारणांशी नाही” (संदर्भ: मजुरी, किंमत आणि नफा). शोषित वर्गाच्या या स्थितीचा अंत करण्यासाठी, भांडवलदार वर्गाच्या राजवटीच्या जागी कामगार आणि शेतकऱ्यांची राजवट प्रस्थापित करण्यासाठीच्या संघर्षात आपली शक्ती वापरण्यासाठी आपल्याला संघटित व्हावे लागेल.

इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा आपल्या देशातील कामगारांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आली आहे. आता तिचे   घोषणेपासून कृतीच्या कार्यक्रमात रूपांतरित करण्याची वेळ आली आहे.

आगे पढ़ें


चला 20 मे रोजी होणाऱ्या सर्व हिंद सार्वत्रिक संपाला आपण यशस्वी करूया!

कामगार एकता कमिटीचे आवाहन, 9 मे 2025

या संपाच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्य सरकारांना आम्ही कामगार सांगू इच्छितो की “व्यवसाय सुलभता” सुधारण्याच्या नावाखाली आमच्या हक्कांवर ते करत असलेले हल्ले स्वीकारण्यास आम्ही नकार देतो. भांडवलदारांसाठी जे सर्वोत्तम आहे ते देशासाठी सर्वोत्तम आहे हा युक्तिवाद  स्वीकारण्यास आम्ही नकार देतो. नाही, भांडवलदारांसाठी जे सर्वोत्तम आहे ते कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध आहे. ते संपूर्ण हिंदुस्थानी समाजाच्या हिताच्या विरुद्ध आहे. 

आगे पढ़ें