“जीन्स जिहाद” च्या नावाखाली पश्चिम दिल्लीतील कामगारांना  लक्ष्य केले जात आहे

मजदूर एकता कमिटीच्या  वार्ताहराचा अहवाल

जातीय विष पसरवणे, एका किंवा दुसऱ्या समुदायाविरुद्ध द्वेषाचा प्रचार करणे, जातीय हिंसाचार आणि दहशत घडवणे – हे सर्व भांडवलदार वर्गाच्या राजवटीच्या पद्धतीचा एक भाग आहे. त्यांचे उद्दिष्ट कष्टकरी जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी, त्यांच्या शोषणाविरुद्धच्या संघर्षात त्यांची एकता तोडणे हे आहे. कष्टकरी जनतेच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन शोषकांच्या या राक्षसी योजनांना पराभूत केले पाहिजे.

आगे पढ़ें


लोकांची घरे उध्वस्त करण्याच्या मोहिमेविरुद्ध संयुक्त पत्र

२३ जुलै रोजी, सहा राजकीय पक्ष—कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी-लेनिनिस्ट (लिबरेशन), रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक—यांनी पंतप्रधान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून ही विध्वंसक  मोहीम त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.

आगे पढ़ें


बंगाली भाषिक लोकांवरील हल्ल्यांविरुद्ध  संयुक्त पत्र

२३ जुलै रोजी, कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी-लेनिनिस्ट (लिबरेशन), रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या दिल्ली राज्य समित्यांनी, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि दिल्लीचे उपराज्यपाल यांना एक पत्र पाठवले, ज्यामध्ये असे म्हटले होते की बांग्लादेशी स्थलांतरितांना हुडकून काढण्याच्या  नावाखाली चालवली जाणारी मोहीम ही मानवी हक्कांचे घोर उल्लंघन करत आहे.

आगे पढ़ें


कष्टकरी जनतेचे नागरिकत्व व मतदानाचा हक्क हिरावून घेण्याच्या प्रयत्नांचा तीव्र विरोध करा!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, १५ जुलै २०२५

मतदार यादीचे पुनरावलोकन करण्याच्या नावाखाली, निवडणूक आयोगाने बिहारमधील सर्वच्या सर्व . कोटी नोंदणीकृत मतदारांना, त्यांचे नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्रे ३० दिवसांच्या आत सादर करण्यास सांगितले आहे. आणि हे बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या केवळ काही महिन्यांपूर्वी घडले आहे.

आगे पढ़ें


उत्तर प्रदेशातील वीज खाजगीकरणाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा द्या!

कामगार एकता कमिटीचे आवाहन, २२ जून २०२५
उत्तर प्रदेशातील दक्षिणांचल आणि पूर्वांचल वितरण निगमच्या खाजगीकरणाविरोधातील संघर्षाला सर्व स्तरांतील जनतेने बिनशर्त पाठिंबा द्या असे आवाहन कामगार एकता कमिटी करते.  आमची मागणी आहे की हे देशविरोधी, कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि जनविरोधी खाजगीकरणाचे धोरण तात्काळ थांबवावे, आणि उत्तर प्रदेशातील वीज कंपन्यांच्या कामगारांवर लादलेला दडपशाही सेवा आदेश तात्काळ मागे घेतला जावा.

आगे पढ़ें


इराणवरील अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करा

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २३ जून २०२५

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी २२ जून रोजी अमेरिकेने इराणवर केलेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करते, कारण तो हल्ला म्हणजे त्या देशाच्या सार्वभौमत्वाचे निर्लज्ज उल्लंघन आहे. हे राष्ट्रा-राष्ट्रांमधील संबंधांना नियंत्रित करणाऱ्या तत्त्वांचे उघड उल्लंघन आहे, एक दहशतवादाचे कृत्य आहे.

आगे पढ़ें

९ जुलै रोजी सर्व-हिंद सार्वत्रिक संप:
भांडवलशाही आक्रमणाविरुद्धचा आपला संघर्ष आपण तीव्र करूया!
या संपाचे दैदीप्यमान यश सुनिश्चित करूया!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, २२ जून २०२५

आपले तात्काळ हातात घ्यायचे कार्य म्हणजे आपली एकता अधिक मजबूत करणे आणि आपल्या उपजीविकेवर आणि हक्कांवर होणाऱ्या सर्व हल्ल्यांविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र करणे. त्याच बरोबर, आपण हे ओळखले पाहिजे की केवळ हा प्रतिकार संघर्ष करणे पुरेसे नाही. कार्ल मार्क्सने आपल्याला शिकवल्याप्रमाणे, आपण हे विसरू नये की आपण “परिणामांशी लढत आहोत, परंतु त्या परिणामांच्या कारणांशी नाही” (संदर्भ: मजुरी, किंमत आणि नफा). शोषित वर्गाच्या या स्थितीचा अंत करण्यासाठी, भांडवलदार वर्गाच्या राजवटीच्या जागी कामगार आणि शेतकऱ्यांची राजवट प्रस्थापित करण्यासाठीच्या संघर्षात आपली शक्ती वापरण्यासाठी आपल्याला संघटित व्हावे लागेल.

इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा आपल्या देशातील कामगारांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आली आहे. आता तिचे   घोषणेपासून कृतीच्या कार्यक्रमात रूपांतरित करण्याची वेळ आली आहे.

आगे पढ़ें

राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला ५० वर्षे झाली त्या निमित्ताने:
जेव्हा हिंदुस्थान मधील लोकशाही म्हणजे भांडवलदार वर्गाची हुकुमशाही आहे हे सत्य जेव्हा स्पष्टपणे उघडकीस आले

हिन्दुस्थानची  कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २२ जून २०२५

आणीबाणीच्या घोषणेमागील उद्दिष्ट काय होते?

आणीबाणीच्या घोषणेला ५० वर्षे उलटून गेलीत. त्या निमित्ताने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची योग्य संधी सर्व पुरोगामी शक्तींना मिळालेली आहे. जून १९७५ मध्ये आणीबाणीच्या घोषणेमागील खरा उद्देश लपवण्यासाठी, भांडवलदार वर्गाचे  राजनीतिज्ञ आणि विद्वान जो संभ्रम पसरवत आहेत त्याचे निवारण करणे आवश्यक आहे. हे खूपच महत्त्वाचे आहे, कारण आज आणीबाणी जाहीर न करताही लोकशाही अधिकारांवर सर्वतर्फी हल्ले करण्यासाठी कठोर कायदे वापरले जात आहेत.

आगे पढ़ें

बेस्ट भाडेवाढ - एक जनविरोधी पाऊल:
कार्यक्षम, सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था मिळण्याचा लोकांना अधिकार आहे

कार्यक्षम आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा समाजातील सर्व सदस्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्याची तरतूद सुनिश्चित करणे हे राज्याच्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक आहे. हा कोणताही विशेषाधिकार किंवा उपकार नाही जो कधीतरी दिला जाऊ शकतो आणि कधीतरीकाढून घेतला जाऊ शकतो.

आगे पढ़ें

ऑपरेशन ब्लूस्टारचा ४१ वा स्मृतीदिन:
प्रार्थनास्थळावरील हल्ला – राज्याच्या  दहशतवादाचे कृत्य

६ जून २०२५ हा केंद्रीय सशस्त्र दलांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर केलेल्या हल्ल्याचा ४१ वा स्मृतीदिन होता. त्या  हल्ल्याला अधिकृतपणे ऑपरेशन ब्लूस्टार असे नाव देण्यात आले होते .

त्यावेळी खरोखर काय घडले आणि ते का घडले याबद्दल सत्य जाणून घेणे आवश्यक आहे. हे आवश्यक आहे कारण आपल्याला अजूनही बऱ्याच वेळा, राज्याचा  दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचाराचा  धोका, तसेच विविध सबबीखाली प्रार्थनास्थळांवर हल्ले आदींचा  सामना करावा लागत आहे.

आगे पढ़ें