२७ सप्टेंबरच्या भारत बंदला मनापासून पाठिंबा द्या !

मजदूर एकता कमेटीचे निवेदन, ८ सप्टेंबर, २०२१

शेतकरी संघटनांच्या संयुक्त आघाडीने म्हणजेच संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारत बंदची हाक दिली आहे. एक वर्षापूर्वी याच दिवशी संसदेने पारित केलेल्या तीन शेतकरीविरोधी कायद्यांना हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. याच दिवशी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केलेल्या जनआंदोलनांना १० महिने पूर्ण होतील.

आगे पढ़ें


अफगाणी लोकांविरुद्धचे अमेरिकी साम्राज्यवादाचे राक्षसी गुन्हे कधीच विसरता येणार नाहीत

अफगाणिस्तानच्या लोकांना स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे

15 ऑगस्ट 2021, रोजी तालिबान सैन्याने काबूल शहरात प्रवेश केला आणि राष्ट्रपती महाल ताब्यात घेतला. काही तासांपूर्वी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी अमेरिकेच्या मदतीने देश सोडून पळून गेले होते. अमेरिकेने पैसे आणि प्रशिक्षण देऊन तयार केलेले तीन लाखांचे अफगाणी सैन्य लढाई न करताच बरखास्त करण्यात आले. या घटनांमुळे काबूलमधील अमेरिकेच्या समर्थित कठपुतळी राजवटीचा अंत झाला. याचबरोबर अफगाणिस्तानवरील सुमारे 20 वर्षांचा अमेरिकी साम्राज्यवादी  कब्जा संपुष्टात आला.

आगे पढ़ें

स्वातंत्र्य दिन 2021च्या निमित्ताने
हिंदुस्थानाला नवीन पायाची गरज आहे

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 15 ऑगस्ट, 2021

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान आपले भाषण देण्याच्या तयारीत असताना, बहुसंख्य हिंदुस्थानी लोकांकडे उत्सव साजरा करण्यासारखे काहीच नाही. याउलट, आपल्याकडे संतप्त होण्याची खूप कारणे आहेत.

आगे पढ़ें


आंतरराष्ट्रीय कामगार वर्ग दिन झिंदाबाद!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीची साद, १ मे २०२१

कामगार साथीदारांनो,

आज आंतरराष्ट्रीय कामगार वर्ग दिन, म्हणजेच मे दिवस आहे. गेल्या १३१ वर्षांपासून, जगभरातील कामगारांनी आपल्या वर्गाचा हा उत्सव साजरा केला आहे. आपण आपला विजय साजरा करतो, आणि आपल्या ध्येयाकडे आगेकूच करण्याकरता आपल्या पराजयापासून धडे घेतो. आपल्या तातडीच्या आर्थिक आणि राजकीय मागण्यांबरोबर आपण एका नव्या समाजाच्या निर्मितीसाठी लढतो – एका समाजवादी समाजासाठी, जो मानवाद्वारे मानवाच्या शोषणाच्या प्रत्येक प्रकारापासून मुक्त असेल.

आगे पढ़ें

चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणुका:
निवडणुका म्हणजे मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि दिशाभूल करण्याचे साधन आहेत

हिंदुस्थानी गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ६ एप्रिल, २०२१

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील मार्चमध्ये सुरु झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल २ मे रोजी घोषित होईल.

आगे पढ़ें

भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याच्या ९०व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने:
आपल्या हुतात्म्यांची साद

हिंदुस्तानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २० मार्च, २०२१

यावर्षीच्या २३ मार्च रोजी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाचा ९०वा स्मृतिदिन आहे. ब्रिटिश शासकांनी या तीन तरुण मुलांना १९३१ मध्ये याच दिवशी फाशी दिली, कारण ते वसाहतवादी व्यवस्था पूर्णपणे उलथून टाकण्यासाठी  विनातडजोड लढले. त्यांच्यावर धोकादायक दहशतवादी असल्याचा शिक्का मारण्यात आला व त्यांना मृत्युदंड दिला गेला .

आगे पढ़ें

हिंदुस्थानाच्या नवनिर्माणासाठीच्या लढ्यात महिला आघाडीवर!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 8 मार्च. 2021

2021 च्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी भारतीय समाजात खळबळीचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे जुने निर्बंध व पूर्वग्रह मोडून काढत हजारो महिला संसदेने पारित केलेल्या कायद्यांविरुद्ध व केंद्र सरकारने अंगिकारलेल्या धोरणांविरुद्ध निषेध मोर्चांमध्ये भाग घेत आहेत.

आगे पढ़ें

शेतकऱ्यांच्या आंदोलनास बदनाम करण्यासाठी पसरवण्यात येत असलेल्या अराजकतेचा व हिंसाचाराचाधिक्कार करा!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २९ जानेवारी २०२१

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत व सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये शेतकरी संघटनांद्वारे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर परेड्स व जननिदर्शनांत लाखो महिला व पुरुष सहभागी झाले होते. लोकांनी ट्रॅक्टर परेड्सचे स्वागत केले, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला व मनापासून शेतकऱ्यांच्या संघर्षाला पाठिंबा व्यक्त केला. परंतु भांडवलदारी कंपन्यांच्या नियंत्रणामधील मुख्यप्रवाहाची प्रसार माध्यमे केवळ दिल्लीत काही ठिकाणी पोलीस व शेतकऱ्यांमधील झालेल्या हिंसक चकमकीच वारंवार दाखवतराहिली. अशा चकमकीच्या दृश्य चित्रांना शेतकरी आंदोलनाविरुद्धच्या विषारी प्रचाराची जोड देण्यात येत आहे.

आगे पढ़ें

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने:

कामगार आणि शेतकऱ्यांचे प्रजासत्ताक प्रस्थापित करण्यासाठी चला संघटीत होऊया !

 हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, २४ जानेवारी २०२१

स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सरकारच्या अधिकृत परेडच्या बरोबरीनेच, कृषी कायद्यांच्या विरोधात एक  मोठा निषेध मोर्चाही निघणार आहे. या अनधिकृत परेडमध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर भारतीय संघराज्यातील अनेक राज्यांमधून आलेले लाखो महिला व पुरुष ट्रॅक्टरसहित सहभागी होणार आहेत अशी अपेक्षा आहे.

आगे पढ़ें

अधर्मी राज्याविरोधात हे कामगार-शेतकऱ्यांचे धर्मयुद्ध आहे!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन ,  10 जानेवारी , 2021

आज आपल्या देशाच्या व संपूर्ण जगाच्या नजरेत भरणारे एक  दृश्य घडत आहे – आपल्या देशाच्या सरकाराविरुद्ध कामगार-शेतकऱ्यांच्या  कुटुंबांतील आपल्या बहुसंख्य जनतेचा एक बिनतडजोड संघर्ष सुरू आहे.  २६ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या  सीमेवर एक विशाल, अभूतपूर्व निदर्शन होत आहे. कॉर्पोरेट घराण्यांचे कृषी क्षेत्रावर पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित करणे सुलभ करण्याकरता संसदेत पारित झालेले कायदे रद्द करा, ही जनविरोधाच्या तातडीच्या  मागण्यांमधील एक मागणी आहे.

आगे पढ़ें