हिंदुस्थान खऱ्या अर्थाने स्वतंत्र तेव्हा होईल जेव्हा त्याची शासन–सत्ता लोकांच्या हातात असेल
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीचे निवेदन, 1 ऑगस्ट, 2018
दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी जी खोटी आश्वासने दिली जातात, त्यांनी आपली लोकं त्रस्त झाली आहेत. जवाहरलाल नेहरूंचा “समाजवादी नमुन्याच्या समाजा” पासून, इंदिरा गांधींच्या “ग़रीबी हटाओ” व मनमोहन सिंगांच्या “मानवीय चेहऱ्याची भांडवलशाही” पासून नरेंद्र मोदींच्या “सर्वांची साथ सर्वांच्या विकासा”पर्यंत, सर्व पंतप्रधानांनी प्रत्येक 15 ऑगस्टला खोटी स्वप्ने रंगविलेली आहेत. लोकांना जे ऐकावेसे वाटते तेच बोलायचे पण करायचे मात्र जे टाटा, बिर्ला, अंबानी व इतर मक्तेदार घराण्यांना पाहिजे असते, असेच प्रशिक्षण ह्या सर्व नेतेमंडळींना देण्यात आले आहे.
आगे पढ़ें