इराणवरील अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करा

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २३ जून २०२५

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी २२ जून रोजी अमेरिकेने इराणवर केलेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करते, कारण तो हल्ला म्हणजे त्या देशाच्या सार्वभौमत्वाचे निर्लज्ज उल्लंघन आहे. हे राष्ट्रा-राष्ट्रांमधील संबंधांना नियंत्रित करणाऱ्या तत्त्वांचे उघड उल्लंघन आहे, एक दहशतवादाचे कृत्य आहे.

बॉम्बहल्ल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषित केले, की अणुसामग्रीवर प्रक्रिया केली जात असलेली तीन ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत.  अमेरिकेच्या दबावापुढे जर इराणझुकलेनाही, तर त्यांनी इराणचा संपूर्ण नाश करण्याची धमकी दिली. त्यांनी इराणची राजधानी तेहरानमध्ये राहणाऱ्या एक कोटी लोकांना ते शहर सोडण्याचे किंवा विनाशाला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी उघडपणे जाहीर केले आहे की अमेरिकेचे उद्दिष्ट इराणमध्ये सत्तापालट घडवून आणणे आहे. त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांची हत्या करण्याची धमकी दिली आहे.

१२ जून रोजी इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या १० दिवसांनंतर अमेरिकेची ही आक्रमक कृती केली . त्या हल्ल्यांमध्ये लष्करी आणि नागरी पायाभूत सुविधांवर, व तेल आणि वायू सुविधांवर बॉम्बस्फोट, तसेच इराणच्या वरिष्ठ लष्करी नेत्यांची आणि अणुशास्त्रज्ञांची लक्ष्यित हत्या यांचा समावेश होता.

इराण अणुशस्त्रे तयार करण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे जागतिक शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा दावा करून अमेरिकन साम्राज्यवादी त्यांच्या स्वतःच्या कृतींचे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे उघड उघड खोटे आहे, अगदी  २००३ मध्ये त्यांनी त्यांच्या सशस्त्र आक्रमणाचे आणि इराकवरील कब्जाचे समर्थन करण्यासाठी पसरवलेल्या असत्या सारखेच. त्यावेळी अमेरिकेने दावा केला होता, की इराकने मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रे साठवली आहेत अशी माहिती त्यांच्या गुप्तचर यंत्रणेकडे आहे.. आक्रमणानंतर तीन महिन्यांनी, संपूर्ण जगाला हे कळले की इराककडे अशी कोणतीही मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रे नव्हती.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी १९ जून रोजी स्पष्टपणे सांगितले की इराण अणुशस्त्रे तयार करण्याचे काम करत असल्याचा कोणताही पुरावा नाही. अमेरिकन गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनीही या वर्षाच्या मार्चमध्ये इराण अणुशस्त्रे तयार करत नसल्याचे जाहीर केले होते. हे स्पष्ट आहे की अमेरिकन साम्राज्यवादी पुन्हा एकदा एका सार्वभौम राष्ट्राविरुद्धच्या त्यांच्या स्वतःच्या गुन्हेगारी आक्रमणाचे समर्थन करण्यासाठी खोटा प्रचार करत आहेत.

संपूर्ण पश्चिम आशियावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करणे हा अमेरिकन साम्राज्यवाद्यांचा उद्देश आहे. भूतकाळात जसे होते तसेच, अमेरिका त्यांचे वर्चस्ववादी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इस्रायलचा वापर करत आहे.

इराणवर अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्याने पश्चिम आशिया आणि संपूर्ण जगासमोर एक अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील युद्ध संपूर्ण प्रदेशाला वेढून टाकू शकेल, हे नाकारता येत नाही.

जगातील बहुतेक देशांनी इराणवरील अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांचा निषेध केला आहे. अमेरिकेसह सर्व देशांचे लोक इराणविरुद्धच्या अन्याय्य अमेरिका-इस्रायली युद्धाचा निषेध करत आहेत आणि ते त्वरित थांबवण्याची मागणी करत आहेत.

हिंदुस्थान सरकार इराणच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भूमिका घेत नाहीय. ते अमेरिकन साम्राज्यवाद आणि इस्रायलच्या हल्ल्यांविरुद्ध आवाज उठवत नाहीय. अशा या तत्वहीन भूमिकेमुळे, जगातील लोकांच्या डोळ्यात हिंदुस्थानची प्रतिमा उंचावत नाहीय. अमेरिकन साम्राज्यवादी आक्रमण आणि युद्धाला विरोध करणाऱ्या बहुसंख्य सरकारांमध्ये आणि लोकांमध्ये हिंदुस्थानने सामील झाले पाहिजे.

ज्याचे कोणत्याही सबबीखाली समर्थन केले जाऊ शकत नाही, अशा अमेरिका आणि इस्रायलच्या बर्बर हल्ल्यांना तोंड देत असलेल्या इराण, पॅलेस्टाईन, येमेन आणि इतर देशांतील लोकांच्या पाठीशी  हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी ही उभी आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *