हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीचा ४३ वा वर्धापन दिन साजरा

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या स्थापनेचा 43 वा वर्धापन दिन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी पार्टीचे प्रवक्ते कॉम्रेड प्रकाश राव यांनी केंद्रीय समितीच्या वतीने ‘अशा आधुनिक लोकशाहीसाठीचा संघर्ष अग्रेसर करूया जिच्यात कामगार आणि शेतकरी अजेंडा ठरवतील!’ हे महत्त्वपूर्ण भाषण केले.

मुख्य भाषणानंतर उत्साही चर्चा झाली जिच्यात अनेक

कॉमरेड सहभागी झाले होते. 2024 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारऐवजी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यास लोकांच्या कोणत्याही समस्या सुटणार नाहीत या निष्कर्षाला त्यांनी दुजोरा दिला. समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सत्तेतील वर्ग बदलण्याची गरज आहे. शेतकरी आणि इतर कष्टकरी लोकांसोबत युती करून, भांडवलदार वर्गाच्या राज्याच्या जागी कामगार वर्गाचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे.

आपापल्या स्वानुभवावरून बोलतांना, चर्चेतील सहभागींनी प्रातिनिधिक लोकशाहीची विद्यमान व्यवस्था ही भांडवलदार वर्गाच्या लोकशाहीची व्यवस्था आहे, म्हणजेच भांडवलदारांसाठी लोकशाही आहे या मूल्यांकनाचे समर्थन केले. कामगार, शेतकरी आणि इतर कष्टकरी लोकांवर ही क्रूर हुकूमशाही आहे. समाजाचा कारभार कसा चालतो याविषयीच्या निर्णयांमध्ये आपले म्हणणे असले पाहिजे अशा आधुनिक काळातील लोकांच्या इच्छेशी आणि आकांक्षेशी ही व्यवस्था सुसंगत नाही.

निर्णयकर्ते बनण्याची लोकांची इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यास सत्ताधारी भांडवलदार वर्ग सक्षम नाही, यास अनेक सहभागींनी दुजोरा दिला. या उद्देश्यास उचलून धरण्याची जबाबदारी सर्वहारा वर्गाची आहे. राजकीय व्यवस्थेत आणि निवडणूक प्रक्रियेतील बदलांची मागणी करण्यासाठी आणि लढण्यासाठी आपण कम्युनिस्टांनी कामगारांना एकत्र केले पाहिजे; अशा प्रकारचे बदल जे निर्णय घेण्याची शक्ती लोकांच्या हातात आणतील. अशा या कार्यक्रमात शेतकरी आणि इतर सर्व अत्याचारित लोकांनाही आपण जोडले पाहिजे. आपल्या हातात निर्णय घेण्याची शक्ती आल्याने, भांडवली लोभ पूर्ण करण्यापासून ते लोकांच्या गरजा पूर्ण करण्यापर्यंत आपण अर्थव्यवस्थेची दिशा बदलू शकू.

सर्व देशांतील कामगारांचे क्रांतिकारी गाणे, इंटरनॅशनल या गाण्याने, लढाऊ भावनेने उत्सवाची सांगता झाली.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *