SCHOOL-FEE-HIKE-PROTEST-DELHI

दिल्ली खाजगी शाळा शुल्क नियमन कायदा:
चांगल्या दर्जाचे सार्वत्रिक शालेय शिक्षण हे एक दूरचे स्वप्न राहिले आहे

गेल्या काही दशकांपासून शासक वर्ग शिक्षणाचे खाजगीकरण करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे एक अत्यंत फायदेशीर नफा कमावणारे उद्योग बनले आहेत, जे चांगले भविष्य देण्याच्या नावाखाली कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात.

आगे पढ़ें

बेस्ट भाडेवाढ - एक जनविरोधी पाऊल:
कार्यक्षम, सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था मिळण्याचा लोकांना अधिकार आहे

कार्यक्षम आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा समाजातील सर्व सदस्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्याची तरतूद सुनिश्चित करणे हे राज्याच्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक आहे. हा कोणताही विशेषाधिकार किंवा उपकार नाही जो कधीतरी दिला जाऊ शकतो आणि कधीतरीकाढून घेतला जाऊ शकतो.

आगे पढ़ें


खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या कार्यक्रमाविरुद्ध एकजूट व्हा!

कामगार आणि शेतकऱ्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी संघर्ष करा!

मे दिवस 2024 साठी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन

कामगार साथींनो!

मे दिन अशा वेळी जवळ येत आहे जेव्हा कामगार आणि शेतकरी भांडवलदार वर्गाच्या खाजगीकरण आणि उदारीकरण कार्यक्रमाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत. बेरोजगारीने अभूतपूर्व पातळी गाठली आहे. बहुतांश उपलब्ध नोकऱ्या सर्वात खालच्या दर्जाच्या आहेत. अन्न आणि इंधनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींपुढे कामगारांचे पगार मागे पडत आहेत. शेतकऱ्यांना घटत्या उत्पन्नाचा आणि असह्य कर्जाच्या ओझ्याचा सामना करावा लागत आहे.

आगे पढ़ें

एअर इंडियाचे खाजगीकरण -
अधिकाधिक नफा मिळवण्याचा मक्तेदार भांडवलदारांचा हव्यास पूर्ण करण्यासाठी उचललेले एक कामगार-विरोधी, जन-विरोधी पाऊल

एकत्रितपणे ९४ विमाने मालकीची असलेली व देशभरातील १०० ठिकाणांवर व ६० आंतरराष्ट्रीय ठिकाणावर आपली सेवा पुरवणारी एअर इंडिया आणि तिची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेस टाटा समूहाला विकली गेली आहे.

आगे पढ़ें