हिंदुस्थानाच्या कम्युनिस्ट गदर पार्टीचे प्रकाशन, 8 जानेवारी 2017
2016 च्या वर्षाखेर सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या रोकड पैशाच्या घोर संकटाबरोबर झाली. 8 नोव्हेंबर ला नोटबंदीच्या नावाखाली जी मोहीम सुरू केली गेली होती, त्यामुळे चारी बाजूला हाहाःकार माजला आहे आणि समाजातील उत्पादनाच्या अनेक क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. 8 नोव्हेंबर, 2016 ला चलनात असणारया नोटांच्या 86 टक्के नोटा एका झटक्यातच अवैध ठरविल्या गेल्या. लोकांना आपल्या जुन्या नोटा बँकामध्ये जमा करण्यासाठी 50 दिवसांचा वेळ दिला गेला. असा समाज जेथे अधिकतर लोक आपल्या उपजीविकेसाठी रोकड पैश्यातील व्यवहारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, इथे नोटबंदीचा त्वरीत आर्थिक परिणाम वास्तविकपणे खूपच विनाशकारी झाला आहे.
आगे पढ़ें