आपल्या लोकांच्या संघर्षांना भावाभावातील जनसंहारांत बुडविण्याचा हिंदुस्थानी राज्याचा घृणास्पद प्रयत्न
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 8 ऑगस्ट, 2018
30 जुलै, 2018ला आसामच्या नागरिकांच्या रजिस्टरची (एन.आर.सी.ची) दुसरी यादी प्रकाशित करण्यात आली. त्यात असलेल्या “हिंदुस्थानी नागरिकांची” संपूर्ण यादी आहे. 3.29 कोटी अर्जदारांपैकी 40 लाख महिला, पुरुष व मुलामुलींची नावे त्यात नाहीयत.
एकाच फटक्यात 40 लाख लोकांना, ते “नागरिक नाहीत”, “घुसखोर” व “विदेशी” आहेत असे घोषित करण्यात आले आहे. मतदान व मालमत्तेच्या अधिकारांसहित, एक नागरिक म्हणून त्यांचे सर्व अधिकार त्यांच्यापासून हिसकावून घेतलेले आहेत. त्यांना 30 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर एवढा अवधी देण्यात आलेला आहे, ज्याच्यात त्यांना हिंदुस्थानी राज्याला पुरावा द्यावा लागेल की त्यांची नावे चुकून वगळण्यात आलेली आहेत. तरच त्यांना त्यांचे अधिकार परत मिळतील.
आगे पढ़ें