गुटवादी व सांप्रदायिक दुष्मनी आणि दहशत पसरविणाऱ्या राजकारणाची निंदा करा ! एकावर हल्ला म्हणजे सगळ्यांवर हल्ला !

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन , ९ मार्च २०१८

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यानंतर तेथील कम्युनिस्ट आणि ट्रेड युनियनच्या कार्यकर्त्यांवर क्रूर हल्ले करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)चे कार्यालय लुटून त्याला आग लावण्यात आली. लेनिनच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली.

त्रिपुरातील या घटनांच्या नंतर लगेचच, देशातील इतर भागातही गुटवादी व सांप्रदायिक दुष्मनी पसरविण्याचे अभियान सुरु करण्यात आले. जातीवाद विरुध्दच्या लढाईतील सुप्रसिध्द योध्दे अशी ओळख असलेल्या पेरियार यांच्या पुतळ्याचीही तमिळनाडूत विटंबना करण्यात आली. त्यानंतर एका मंदिराच्या बाहेर काही ब्राह्मणांचा अपमान करण्यात आला. पश्चिम बंगाल मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी आणि उत्तर प्रदेशात डॉक्टर भीम राव आंबेडकर यांच्या पुतळ्यांवरही हल्ला करण्यात आला. अशाप्रकारे लोकांमध्ये उन्माद भडकविण्याचा आणि राजकीय व विचारधारात्मक श्रध्दा,जात, धर्म, जीवनशैली आदीच्या आधारे एकमेकांविरुध्द लढविण्याचा सुनियोजितपणे प्रयत्न करण्यात येतोय.

लोक व त्यांच्या श्रद्धांवरील या सर्व हल्ल्यांचा हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी भर्त्सना करते. गुटवादी व सांप्रदायिक दुष्मनी आणि दहशत पसरविणे हा फूट पाडा आणि राज्य करा या सत्ताधाऱ्यांच्या अपराधी राजनीतीचाच एक हिस्सा आहे.

लोकांमध्ये एकमेकांविरुध्द हिंसा हे शासकच आयोजित करतात. मग ते शासकच खोटा प्रचार करतात की लोक आणि त्यांच्या वेगवेगळ्या श्रध्दाच हिंसेसाठी जबाबदार आहेत. त्रिपुरात कम्युनिस्टांवर हल्ला व लेनिनचा पुतळा पाडण्याचे समर्थन करताना असा दावा करण्यात आला की ती घटना म्हणजे लोकांच्या “मनात ठुसठुसत असलेल्या संतापाची” अभिव्यक्ती होती. पण सत्य हेच आहे की केंद्रीय व राज्यीय सुरक्षा दलांच्या निगराणीखाली भाजपा नेत्यांच्या नेतृत्वाखाली ते हल्ले करण्यात आले होते. त्रिपुराच्या राज्यपालांनी सोशल मिडीयावरील ट्वीटद्वारे त्या हल्ल्यांचे समर्थन केले, यावरून स्पष्ट दिसून येते की त्या हल्ल्यांना सत्ताधाऱ्यांचे पूर्ण समर्थन होते.

मक्तेदार घराण्यांच्या नेतृत्वाखालील प्रस्थापित भांडवलदारी व्यवस्था लोकांच्या गरजांची पूर्ती करू शकत नाहीय हेच आपल्या लोकांपुढील समस्येचे मूळ आहे. प्रस्थापित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, लोकांमध्ये फूट पाडणे व त्यांचे लक्ष खऱ्या समस्यांवरून दुसरीकडे वळविण्यासाठी, अशा अपराधी पध्दतीचा वापर सत्ताधाऱ्यांना करावा लागतो.

जवळजवळ १५० मक्तेदार घराण्यांच्या नेतृत्वाखाली भांडवलदार वर्गाचे शोषक व दमनकारी राज्य हेच लोकांच्या सगळ्या समस्यांचे मूळ आहे. कामगार विरोधी, शेतकरी विरोधी, समाज विरोधी आणि राष्ट्र विरोधी असा उदारीकरण आणि खाजगीकरण यांच्या द्वारे जागतिकीकरणाचा कार्यक्रम या मक्तेदार घराण्यांना जबरदस्तीने राबवायचा आहे. लोकांना खोटी आश्वासने देत देत, हा कार्यक्रम पुढे रेटण्यासाठी त्यांच्या भरोशाच्या या अथवा त्या पार्टीवर ते अवलंबून आहेत. याआधी ते मुख्यत्वे काँग्रेस पार्टीवर भरोसा ठेवत होते. सध्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजपावर ते भरोसा ठेवत आहेत.

आपल्या देशातील वसाहतवादी सत्ता ७० वर्षांपूर्वीच संपुष्टात आली. पण इंग्रज वापरीत असलेली फोडा व राज्य कराची राजनीती मात्र संपुष्टात आली नाही. १९८४मध्ये काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सुवर्ण मंदिरासारख्या पूजा स्थानावरही कसा हल्ला केला होता हे आपण कधीच विसरू शकत नाही. भाजपा आणि काँग्रेस पार्टी दोघांनीही संगनमताने बाबरी मशिदीचा कसा विध्वंस केला हेही आपण विसरू शकत नाही. गुजरातचा नरसंहार भाजपाच्या निगराणीखाली झाला होता हे आपण विसरू शकत नाही. हिंसेचे वातावरण तयार करायचे आणि बहुसंख्य असलेल्या कष्टकरी जनतेमध्ये फूट पाडायची व त्यांच्यात दहशत पसरवायची हेच त्या सगळ्याचे उद्दिष्ट होते.

सध्या गुटवादी व सांप्रदायिक दुष्मनी आणि दहशत पसरविण्याच्या मागचे उद्दिष्ट तेच आहे. त्यांच्यामुळे लोकांच्या मध्ये आपापसात भांडणे चीथावली जातात आणि विभिन्न गटांवरील हिंसा व दहशत योग्य ठरविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

लोकांची एकता आणि त्यांच्यातील बंधुभाव नष्ट करण्यासाठी शासकवर्ग अराजकता आणि हिंसा घडवून आणतो. सद्सद् विवेक बुध्दी जागृत असणाऱ्या हिंदुस्थानातील सर्व लोकांना, गुटवादी हिंसा आणि दुष्मनी पसरविणाऱ्या सर्व अभियानांची निंदा करण्याचे आवाहन, कम्युनिस्ट गदर पार्टी करते. राजकीय आणि विचारधारात्मक मतभिन्नता बळाच्या आधाराने निपटविण्याच्या सर्व प्रयत्नांना चला आपण सगळे विरोध करूयात. फोडा व राज्य करा या राजनीतीचा चला आपण सगळे मिळून पराभव करूया. चला राजकीय दहशतवादाविरुद्ध आपण सगळे एक होऊया. चला आपण सगळे मिळून सार्वत्रिक मानवी आणि लोकशाही हक्कांचे समर्थन करूया.

सर्वांच्या सुख आणि सुरक्षेची खात्री देईल अशी राज्य व्यवस्था स्थापित करण्याच्या दृष्टीकोनाने चला आपण गुटवादी व सांप्रदायिक दुष्मनी आणि दहशत यांच्या विरुध्द संघर्ष करूया. सद्सद्विवेक बुध्दीने विचार करण्याचा अधिकार अनुल्लंघनीय असण्याची खात्री अशी राज्य व्यवस्था देईल. आपापल्या धार्मिक श्रद्धेनुसार उपासना करण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे अशी व्यवस्था रक्षण करेल व त्याचबरोबर कुठल्याही धर्मावर विश्वास न करणाऱ्यांच्या अधिकाराचीही ती व्यवस्था रक्षण करेल. समाजापुढील कुठल्याही समस्येबद्दल न घाबरता किंवा संकोच करता, स्वतःचे मत व्यक्त करण्याच्या सगळ्यांच्या अधिकाराचे अशी व्यवस्था रक्षण करेल. धर्म, जात, विचारधारा अथवा इतर कुठल्याही बहाण्याने समाजातील कुठल्याही सदस्याच्या अधिकाराचे जो कोणी उल्लंघन करेल त्यांना कडक शिक्षा अशी व्यवस्था करेल.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *