व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनार्थ उभे राहा!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन , ४ जानेवारी २०२६

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीची  केंद्रीय समिती, अमेरिकन सरकारने व्हेनेझुएला आणि त्या देशाच्या  जनतेच्या सार्वभौमत्वाचे ज्याप्रकारे  क्रूर उल्लंघन केले त्याचा  निषेध करते.

व्हेनेझुएलाची राजधानी कराकस शहर आणि मिरांडा, अरागुआ आणि ला ग्वायरा या राज्यांमधील नागरी आणि लष्करी क्षेत्रांवर अमेरिकेने सशस्त्रआक्रमण केले.  राज्याच्या दहशतवादाचे हे एक उघड कृत्य होते.. व्हेनेझुएलाचे कायदेशीररित्या निवडून आलेले अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण करून त्यांना अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतले आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले .

अमेरिकन साम्राज्यवादाचे हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व तत्त्वांचे पूर्णपणे उल्लंघन करते. ते संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे गंभीर उल्लंघन करते, जे सार्वभौमत्वाचा आदर, राज्यांची कायदेशीर समानता आणि बलाचा/सक्तीचा वापर करण्यास मनाई करते.

अमेरिकन साम्राज्यवादाच्या या कृतीने  कॅरिबियन भूभाग  आणि संपूर्ण लॅटिन अमेरिकेतील शांततेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोणताही देश अमेरिकेच्या अशा हल्ल्यांपासून सुरक्षित नाही हेच ते दर्शवित आहेत.

व्हेनेझुएलाच्या बोलिव्हेरियन प्रजासत्ताकाच्या सरकारने व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वावर अमेरिकन साम्राज्यवादाने केलेल्या निर्घृण हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी देशातील संपूर्ण जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या प्रदेशातील आणि संपूर्ण जगातील सर्व देशांना त्यांच्या सार्वभौमत्वाच्या निर्घृण उल्लंघनाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.

कोलंबिया, क्युबा, मेक्सिको, चिली, ब्राझील, इराण, रशिया, चीन आणि जगातील अनेक देशांनी व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या बेकायदेशीर आक्रमणाचा निषेध केला आहे.

हिंदुस्थानच्या  सरकारने  व्हेनेझुएला आणि तिच्या लोकांविरुद्ध अमेरिकेच्या आक्रमकतेचा निषेध करावा असे  हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी आवाहन करते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *