असे दहशतवादी गुन्हे थांबवण्याचे काम असलेल्या दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांसारख्या यंत्रणांना, खरे गुन्हेगार सापडले नाहीत म्हणून किंवा निरपराध लोकांना आरोपी ठरवून त्यांना कठोर तपासाशिवाय व पुराव्याशिवाय वर्षानुवर्षे त्रास देण्यासाठी, कोणतीही शिक्षा किंवा जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. संघटित हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना, तसेच अटक होऊन अनेक वर्षे तुरुंगात खितपत असलेल्या निरपराधांना न्याय नाकारण्यात आला आहे.
आगे पढ़ेंTag: UAPA
मालेगाव बॉम्बस्फोट खटला:
पत्रकारांवरील हल्ल्याचा धिक्कार करा!
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ६ ऑक्टोबर, २०२३
३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या वेळेस, दिल्ली पोलिसांनी न्यूज पोर्टल न्यूजक्लिकच्या कार्यालयावर आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये आणि हिंदुस्थानातील इतर शहरांमध्ये सुमारे पन्नास स्त्रीपुरुषांच्या घरांवर छापे टाकले. ज्यांना लक्ष्य करण्यात आले त्यांमध्ये पत्रकार, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि इतर लोक ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी या मीडिया हाऊससोबत काम केले आहे, अशा व्यक्ती होत्या.
आगे पढ़ें