मजदूर एकता कमिटीच्या वार्ताहराचा अहवाल
25 ऑगस्ट 2023 रोजी, राजस्थान परिचारिका संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली, परिचारिकांनी जयपूरच्या रामनिवास बागजवळील रामलीला मैदान परिसरात 11 कलमी मागण्यांच्या समर्थनार्थ एक विशाल रॅली काढली. या रॅलीत जिल्हा रुग्णालयांत, ग्रामीण रुग्णायांत, व प्राथमिक रुग्णालयांमध्ये कार्यरत हजारो परिचारिका सहभागी झाल्या होत्या. रॅली मध्ये 5 सप्टेंबरपासून संपाची घोषणा करण्यात आली आहे. रॅलीनंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
मजदूर एकता लहरने आधी रिपोर्ट केल्याप्रमाणे, 18 जुलैपासून, राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणारे सुमारे 55,000 नर्सिंग कर्मचारी त्यांच्या 11 कलमी मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्यांच्या न्याय्य मागण्यांवर कोणतीही कार्यवाही करत नसल्याने परिचारिकांना संपावर जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.
5 सप्टेंबरच्या संपापूर्वी परिचारिकांनी विविध विरोध प्रदर्शनाच्या माध्यमातून आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सकाळी 8 ते 10 या वेळेत दररोज दोन तास विरोध निदर्शन करण्यात येणार आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना सर्व जिल्हा मुख्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संपाची नोटीस देण्यात येणार आहे.