आपल्या देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा वर्ग आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारे पैसे कमवू शकत नाही. लाखो कुटुंबे अस्तित्वासाठी झुंज देत आहेत, उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी शक्य असेल त्या कोणाकडूनही पैसे कर्जाऊ वा उसने घेत आहेत. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणाची समस्या बळावते आहे, जी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात वाढत आहे.
आगे पढ़ें