हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, १२ नोव्हेंबर २०२३
सर्वांसाठी सुरक्षित उपजीविका आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी देशाचे शासक बनणे आणि अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. कोणत्याही अपवादाशिवाय समाजातील सर्व सदस्यांचे लोकशाही आणि मानवी हक्क सुरक्षित आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे.
बँक कर्जांमध्ये वाढ: धोकादायक प्रवृत्ती
बँककर्जांच्या वाढीची उच्च गती आणि बँकांच्या नफ्यात सुधारणा ही हिंदुस्थानी अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याची लक्षणे म्हणून उद्धृत केली जात आहेत. परंतु, उत्पादनासाठी घेतलेल्या कर्जांपेक्षा उपभोगासाठी घेतलेल्या कर्जांमुळे पतवाढ होणे, हे काही चांगले लक्षण नाही. उलट ही एक धोकादायक प्रवृत्ती आहे. शिवाय, बँकांचा हा सुधारित नफा अतिशय उच्च सार्वजनिक किंमत मोजून प्राप्त झाला आहे. यामध्ये सरकारने भांडवलदार कर्जबुडव्यांचे कर्ज माफ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेला खर्च आणि ग्राहकांना बचत ठेवींवर दिलेल्या व्याजापेक्षा त्यांच्याकडून ग्राहक कर्जांवर आकारलेले अधिक व्याज, यांचा समावेश आहे.
आगे पढ़ेंमहान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीच्या १०६व्या वर्धापनदिनानिमित्त:
वस्तुगत परिस्थिती सर्वहारा क्रांतींच्या दुसर्या फेरीची हाक देत आहे
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ५ नोव्हेंबर २०२३
७ नोव्हेंबर १९१७ रोजी (त्या वेळच्या रशियन कॅलेंडरप्रमाणे २५ ऑक्टोबर रोजी), लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्वाखाली, कामगार, शेतकरी आणि सैनिकांनी रशियामधील भांडवलशाहीची सत्ता उलथून टाकली. कामगार वर्गाची इतर सर्व कष्टकरी लोकांसोबत युतीची सत्ता क्रांतीने स्थापन केली.
आगे पढ़ें
पॅलेस्टिनी लोकांच्या नरसंहाराला अमेरिकेच्या सातत्याने दिलेल्या पाठिंब्याचा धिक्कार करा!
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २१ ऑक्टोबर २०२३
अमेरिकन सरकारने बेशरमपणे इस्रायलला राजकीय आणि लष्करी पाठिंबा दिला आहे. अल अहली अरब हॉस्पिटलवर बॉम्बिंग झाल्यानंतर काही तासांतच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायलला भेट दिली आणि घोषित केले की अमेरिका शेवटपर्यंत इस्रायलच्या पाठीशी उभी राहील.
आगे पढ़ें
पॅलेस्टिनी लोकांशी एकजुटीचे जागतिक स्तरावर प्रदर्शन
जगभरातील अनेक शहरांमध्ये पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ हजारो हजारो लोकांची प्रचंड मोठी निदर्शने होत आहेत. इस्राईलने केलेले गाझा वरील बॉम्बिंग, मुलांची हत्या, हॉस्पिटल्स आणि निवासी क्षेत्रांवरील बॉम्ब हल्ले यांचा निदर्शक धिक्कार करत आहेत. इस्राईल सरकारने गाझा प्रदेशाची जी क्रूर नाकाबंदी केली आहे, पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा तोडला आहे, आणि गाझाला वैद्यकीय आणि इतर मानवतावादी मदतीपासून वंचित ठेवले आहे त्याचाही ते धिक्कार करत आहेत.
आगे पढ़ेंसंसदेचे विशेष अधिवेशन:
संसदीय लोकशाहीची विश्वासार्हता पूर्ववत करण्याचा प्रयत्न
१८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
संसदीय लोकशाहीची व्यवस्था – कामगार वर्ग आणि कष्टकरी जनतेचे – बहुसंख्य लोकसंख्येचे – निर्णय घेण्याचे अधिकार डावलते.
इस्रायल आणि हमासमधील युद्ध त्वरित थांबवणे आवश्यक आहे
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचेनिवेदन , १० ऑक्टोबर २०२३
संयुक्त राष्ट्र संघाने पॅलेस्टिनी लोकांचा मातृभूमीसाठीचा कायदेशीर हक्क सुनिश्चित केला पाहिजे. त्याने पॅलेस्टिनी प्रदेशांवरील इस्रायलचा ताबा संपवला पाहिजे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दोन राज्यांच्या निर्मितीचा जो ठराव पारित केला होता त्या ठरावाची अंमलबजावणी सुनिश्चित केली पाहिजे. 1967 पूर्वीच्या ज्या सीमा होत्या त्यानुसार पूर्व जेरुसलेम ही राजधानी असेल अशा पॅलेस्टाईन राज्याची स्थापना सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तरच या प्रदेशात शाश्वत शांततेची हमी मिळू शकेल.
पत्रकारांवरील हल्ल्याचा धिक्कार करा!
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ६ ऑक्टोबर, २०२३
३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या वेळेस, दिल्ली पोलिसांनी न्यूज पोर्टल न्यूजक्लिकच्या कार्यालयावर आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये आणि हिंदुस्थानातील इतर शहरांमध्ये सुमारे पन्नास स्त्रीपुरुषांच्या घरांवर छापे टाकले. ज्यांना लक्ष्य करण्यात आले त्यांमध्ये पत्रकार, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि इतर लोक ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी या मीडिया हाऊससोबत काम केले आहे, अशा व्यक्ती होत्या.
आगे पढ़ेंरोजगाराच्या प्रमाणाला आणि गुणवत्तेला लागलेली उतरती कळा:
देशाच्या तरुण कामगारशक्तीचा अपव्यय
सरकारचे प्रवक्ते दावा करतात की हिंदुस्थान ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. मात्र, नोकऱ्यांची संख्या वाढत नाही आणि उपलब्ध नोकऱ्यांचा दर्जा खालावत चालला आहे. तरुण लोकसंख्या ही हिंदुस्थानाची सर्वात मौल्यवान उत्पादक शक्ती आहे; ती वाया जात आहे कारण आर्थिक व्यवस्था लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर भांडवली लोभ पूर्ण करण्यासाठी आहे.
आगे पढ़ें
राजस्थानच्या परिचारिकांनी आपल्या मागण्यांसाठी जयपूरमध्ये रॅली काढली
मजदूर एकता कमिटीच्या वार्ताहराचा अहवाल
25 ऑगस्ट 2023 रोजी, राजस्थान परिचारिका संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली, परिचारिकांनी जयपूरच्या रामनिवास बागजवळील रामलीला मैदान परिसरात 11 कलमी मागण्यांच्या समर्थनार्थ एक विशाल रॅली काढली.
आगे पढ़ें