4 नोव्हेंबरच्या दिवशी, 100 वर्षांपूर्वी, संपूर्ण रशियात अनेक कारखान्यांमध्ये आणि सैन्याच्या तुकड्यांमध्ये भांडवलदार वर्गाची सत्ता क्रांतीद्वारे उलथून टाकण्याची जय्यत तयारी सुरु होती. राजधानी पेट्रोग्राड शहरातील स्मोल्नी ह्या रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी (बोल्शेविक) च्या मुख्यालयात 6 नोव्हेंबर 1917 रोजी कॉम्रेड लेनिन ह्यांचे आगमन झाले. त्या दिवशी रात्रभर सैन्याच्या क्रांतिकारी तुकड्या आणि लाल सेनेच्या तुकड्या तिथे येत राहिल्या. जिथे प्रासंगिक सरकार पाय रोवून बसले होते, त्या शहराच्या मध्यभागी असलेल्या हिवाळी राजवाड्याला वेढा देण्यासाठी बोल्शेविक पार्टीने त्यांना पाठविले.
आगे पढ़ेंसार्वजनिक बँकांचे पुनर्पूंजीकरणः कर्ज न चुकविणाऱ्या भांडवलदारांमुळे आलेल्या संकटाची किंमत आम जनतेकडून वसूल
24 ऑक्टोबर 2017 रोजी अर्थमंत्री जेटलींनी घोषणा केली की येत्या 2 वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पुनर्पूंजीकरण करण्यासाठी हिंदुस्थानचे सरकार 2 लाख 11 हजार कोटी रुपये देईल. सरकारने 2015 साली इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत अशी घोषणा केली होती की सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 4 वर्षांत 70 हजार करोड रुपयांचे भांडवल घालेल. पण तेव्हापासून दोनच वर्षात गुंतवणुकीची ही रक्कम जवळ जवळ तिप्पट वाढली आहे.
आगे पढ़ेंगुजरात नरसंहारा नंतरची 15 वर्षेः हिंदुस्थानी राज्याच्या सांप्रदायिक स्वभावाचा उघड पर्दाफाष
गुजरातमधील राज्यद्वारा संघटित नरसंहारास 15 वर्षे झाली आहेत. हिंदुस्थानातील व परदेषी शक्तींनी स्वतःच्या मतलबासाठी त्यावर पांघरूण घालायची भरपूर धडपड केली, पण तरीही त्या नरसंहाराने पीडित लोकांना न्याय मिळाला नाही, हा आजही एक ज्वलंत मुद्दाच आहे. त्या पीडितां बरोबर सद्सद्विवेक बुद्धी जागृत असलेल्या महिला पुरुषांनी सत्य व न्यायाची मागणी अद्याप उचलून धरलेलीच आहे. खालील गोष्टी आत्तापर्यंत निर्विवाद सत्य म्हणून सिद्ध
आगे पढ़ें
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2017 : एका नवीन राज्यव्यवस्थेच्या निर्मितीसाठी महिलांना आपला संघर्ष प्रखर करावा लागेल!
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 27 फेब्रुवारी 2017 आज 8 मार्चच्या निमित्ताने, हिंदुस्थान आणि जगभरातील सर्व स्त्रियांद्वारे आपल्या अधिकारांसाठी व समाजातील सगळ्यांच्या मानव अधिकारांच्या रक्षणांसाठी चालविल्या जाणाऱ्या बहाद्दुर आणि अथक संघर्षाला कम्युनिस्ट गदर पार्टी मुजरा करते. भांडवलशाही, साम्राज्यवादी युद्धे, नस्लवाद, राजकीय दहशतवाद, व तऱ्हेतऱ्हेचे दमन आणि मनुष्या-मनुष्यांतील भेदभावाविरुद्धच्या संघर्षांत स्त्रिया सतत आघाडीवर राहिल्या आहेत. त्या कामगारांच्या संपसंघर्षांत सामिल
आगे पढ़ेंहिंदुस्थानी प्रजासत्ताकाच्या स्थापनेला ६७ वर्षे झाली त्या निमित्ताने
नवीन पायाच्या आधारावर प्रजासत्ताकाचे नव-निर्माण करायला हवे हिंदुस्थानाच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २४ जानेवारी, २०१७ हिंदुस्थानाचे प्रजासत्ताक जे काही असल्याचा दावा करते, प्रत्यक्षात मात्र सत्य त्याच्या उलटे आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत असे घोषित केलेले आहे की “आम्ही, हिंदुस्थानातील लोक, हिंदुस्थानाला एक सार्वभौम, समाजवादी, आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वरूपात संघटित करण्याचा गंभीर निर्णय घेत आहोत”. पण सत्य हे आहे की
आगे पढ़ें
नोटबंदी – खरा उद्देश्य आणि खोटे दावे
हिंदुस्थानाच्या कम्युनिस्ट गदर पार्टीचे प्रकाशन, 8 जानेवारी 2017
2016 च्या वर्षाखेर सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या रोकड पैशाच्या घोर संकटाबरोबर झाली. 8 नोव्हेंबर ला नोटबंदीच्या नावाखाली जी मोहीम सुरू केली गेली होती, त्यामुळे चारी बाजूला हाहाःकार माजला आहे आणि समाजातील उत्पादनाच्या अनेक क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. 8 नोव्हेंबर, 2016 ला चलनात असणारया नोटांच्या 86 टक्के नोटा एका झटक्यातच अवैध ठरविल्या गेल्या. लोकांना आपल्या जुन्या नोटा बँकामध्ये जमा करण्यासाठी 50 दिवसांचा वेळ दिला गेला. असा समाज जेथे अधिकतर लोक आपल्या उपजीविकेसाठी रोकड पैश्यातील व्यवहारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, इथे नोटबंदीचा त्वरीत आर्थिक परिणाम वास्तविकपणे खूपच विनाशकारी झाला आहे.
आगे पढ़ेंजुन्या नोटा रद्द केल्याने दहशतवाद अथवा भ्रष्टाचार या पैकी काहीही संपुष्टात येणार नाही!
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २० नोव्हेंबर २०१६ ८ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून, भारतीय रिझर्व बँकेने प्रसृत केलेल्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा बेकायदा ठरविण्यात आल्या. नोटबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबरला घोषित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी नी आपल्या देशातील लोकांना उपदेश केला की “……भ्रष्टाचार, काळा पैसा, नकलीनोटाआणि दहशतवादा विरुध्दच्या लढयात, आपल्या देशाला शुध्द करण्याच्या या अभियानात, आपले लोक काही दिवस
आगे पढ़ें