प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजनाः शेतकऱ्यांना धोका देणे आणि भांडवलदारी व्यापाऱ्यांच्या तिजोऱ्या भरणे ह्या उद्देशाने बनवली गेलेली योजना

गेल्या काही वर्षांत देशभरातील शेतकरी स्वतःच्या उपजीविकेच्या सुरक्षेची मागणी करत पुन्हा पुन्हा रस्त्यावर येत आहेत. एक मागणी अशी आहे की सरकारने त्यांच्या पिकांच्या लागवडीसाठी खर्चाच्या दीडपट किंमतीची हमी द्यावी आणि ते सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तंत्राची स्थापना करावी. शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्याऐवजी सरकार अशा योजनांची घोषणा करत आहे ज्या कृषी व्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्या भांडवलदारांच्या हितांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. 12

आगे पढ़ें

लैंगिक अत्याचाराने पिडीत असलेल्यांचे समर्थन करा

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 20ऑक्टोबर 2018

काम करण्याच्या जागी लैंगिक अत्याचाराची शिकार झालेल्या अनेक महिलांची दर्दभरी कहाणी आपण गेले 4 आठवडे वाचत व ऐकत आहोत. वृत्तपत्रे आणि इतर माध्यमे, मनोरंजन उद्योग, कला व संस्कृती, शिक्षण, राजकीय पाट्र्यांची कार्यालये, खाजगी कंपन्या, इत्यादी अनेक क्षेत्रातील महिलांना तो अत्याचार भोगायला  लागलाय.

आगे पढ़ें

मानव अधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेचा आणि छळाचा जोरदार धिक्कार करूयात !

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट ग़दर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 29 ऑगस्ट, 2018 28 ऑगस्टला पूर्वनियोजित कारवाईत, पुणे पोलिसांनी मुंबई, दिल्ली, रांची, गोवा आणि हैद्राबादमध्ये एकाच वेळी, अशा अनेक लोकांच्या घरांवर छापे मारले, जे गरीब आणि दडपलेल्या लोकांच्या अधिकारांसाठी संघर्ष करत आले आहेत. त्यांमध्ये ट्रेड युनियन कार्यकर्ते, वकील, लेखक, कवी आणि पाद्री यांचा समावेश आहे. सुपरिचित अशा पाच मानव अधिकार कार्यकर्त्यांना – सुधा

आगे पढ़ें

आसामच्या नागरिकांच्या राष्ट्रीय रजिस्टरची अंतिम यादी प्रकाशितः

आपल्या लोकांच्या संघर्षांना भावाभावातील जनसंहारांत बुडविण्याचा हिंदुस्थानी राज्याचा घृणास्पद प्रयत्न

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 8 ऑगस्ट, 2018

30 जुलै, 2018ला आसामच्या नागरिकांच्या रजिस्टरची (एन.आर.सी.ची) दुसरी यादी प्रकाशित करण्यात आली. त्यात असलेल्या “हिंदुस्थानी नागरिकांची” संपूर्ण यादी आहे. 3.29 कोटी अर्जदारांपैकी 40 लाख महिला, पुरुष व मुलामुलींची नावे त्यात नाहीयत.

एकाच फटक्यात 40 लाख लोकांना, ते “नागरिक नाही”, “घुसखोर” व “विदेशी” आहेत असे घोषित करण्यात आले आहे. मतदान व मालमत्तेच्या अधिकारांसहित, एक नागरिक म्हणून त्यांचे सर्व अधिकार त्यांच्यापासून हिसकावून घेतलेले आहेत. त्यांना 30 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर एवढा अवधी देण्यात आलेला आहे, ज्याच्यात त्यांना हिंदुस्थानी राज्याला पुरावा द्यावा लागेल की त्यांची नावे चुकून वगळण्यात आलेली आहेत. तरच त्यांना त्यांचे अधिकार परत मिळतील.

आगे पढ़ें

हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त:

हिंदुस्थान खऱ्या अर्थाने स्वतंत्र तेव्हा होईल जेव्हा त्याची शासनसत्ता लोकांच्या हातात असेल

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीचे निवेदन, 1 ऑगस्ट, 2018

दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी जी खोटी आश्वासने दिली जातात, त्यांनी आपली लोकं त्रस्त झाली आहेत. जवाहरलाल नेहरूंचा समाजवादी नमुन्याच्या समाजा पासून, इंदिरा गांधींच्या ग़रीबी हटाओ व मनमोहन सिंगांच्या मानवीय चेहऱ्याची भांडवलशाही पासून नरेंद्र मोदींच्या सर्वांची साथ सर्वांच्या विकासापर्यंत, सर्व पंतप्रधानांनी प्रत्येक 15 ऑगस्टला खोटी स्वप्ने रंगविलेली आहेत. लोकांना जे ऐकावेसे वाटते तेच बोलायचे पण करायचे मात्र जे टाटा, बिर्ला, अंबानी व इतर मक्तेदार घराण्यांना पाहिजे असते, असेच प्रशिक्षण ह्या सर्व नेतेमंडळींना देण्यात आले आहे.

आगे पढ़ें

1975-1977 मधील राष्ट्रीय आणीबाणीचे धडे

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 11 जुलै 2018.

25 जूनला “राष्ट्रीय आणीबाणी”( इमर्जन्सी)च्या घोषणेला 43 वर्षे पूर्ण झाली. तात्कालिन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी, अंतर्गत उपद्रवामुळे देशाला धोका आहे असे कारण सांगून, राज्यघटनेच्या 352 कलमाच्या आधाराने आणीबाणी घोषित केली होती.

आगे पढ़ें

शेतकऱ्यांच्या मागण्या समाजहिताच्या आहेत !

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे प्रतिपादन, 22 मे, 2018

संपूर्ण देशातील शेतकरी आपल्या दीर्घकालीन मागण्यांसाठी 1 ते 10 जून, 2018 ह्या कालावधीतआपले निषेध आंदोलन करणार आहेत. ह्या मागण्यांमध्ये सर्व कृषी उत्पादनांची किफायतशीर किंमतीत सार्वजनिक खरेदी,तसेच बिनशर्त कृषीकर्ज माफी समाविष्ट आहेत.त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांना वीजबिल माफी, पीक संरक्षण वीमा ह्या संबंधीत असलेल्या समस्या, जनजाती व वनवासी यांचे भूमी विषयक अधिकार, शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन आणि त्यांच्या आपापल्या तत्सम आणि विशेष मागण्या ते करणार आहेत.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेकडो शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकता मंच ह्यांच्या ध्वजांखाली एकत्र आले आहेत. ह्या दहा दिवसांत शेतकरी भाज्या, अन्न, दूध तसेच इतर कृषी उत्पादने शहरांकडे पाठवणार नाहीत. 10 जून, 2018 ला त्यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे.

आगे पढ़ें
thumbnail

तूतीकोरिन गोळीबार: लोकांच्या न्याय्य संघर्षांना दडपून टाकण्यासाठी बर्बर बलप्रयोगाचा जोरदार धिक्कार करा!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 28 मे, 2018

22 मे, 2018ला तामिळनाडुच्या तूतीकोरिन शहरांत पोलिसांद्वारे लोकांवर केलेल्या बर्बर हल्ल्याचा हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी जोरदार धिक्कार करते. ह्या हल्ल्यात कमीत कमी 13 निरपराध लोकांचा मृत्यू झालेला आहे. गोळ्यांमुळे गंभीर जखमी झालेल्या 65हून अधिक लोकांना शहरातील वेगवेगळ्या इस्पितळात दाखल केले गेले आहे. बातम्यांनुसार, युद्धांत वापरल्या जाणाऱ्या स्नाइपर बंदुकींचा वापर करण्यात आला होता.

आगे पढ़ें
English_charts

बँकिंग व्यवस्थेचे वाढते संकट – कारणे आणि उपाय

सध्या बँकिंग व्यवस्थेच्या संकटांनी पुनश्च डोके वर काढल्यामुळे हा विषय सार्वजनिक मंचावर चर्चेसाठी उपस्थित झाला आहे. नुकतेच निदर्शनास आलेले बँक घोटाळे, ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, हिंदुस्थानातील बऱ्याच इतर बँका तसेच हिऱ्यांचे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी या प्रकरणांमध्ये अंतर्भूत आहेत. ज्यात सार्वजनिक बँका गुंतलेल्या आहेत अशा या संकटातून बाहेर पडण्यासाठी, “सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करणे हा एकमेव पर्याय आहे”, असा

आगे पढ़ें

उदारीकरण व खाजगीकरणाद्वारे जागतिकीकरणाच्या कार्यक्रमाविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र करा! सर्वांना सुबत्तेची व समृद्धीची हमी मिळू शकेल अशा नव्या हिंदुस्थानाच्या निर्मितीच्या कार्यक्रमाभोवती एकजूट व्हा!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 1 मे, 2018

मे दिन 2018च्या निमित्ताने, आपल्या उपजीविकांवर व अधिकारांवर भांडवलदार वर्गाच्या व त्याच्या सरकारांच्याद्वारे होत असलेल्या हल्ल्यांविरुद्ध, बहादुरीने संघर्ष करत असलेल्या सर्व देशातील कामगारांचे कम्युनिस्ट गदर पार्टी अभिवादन करते. आम्ही त्या सर्व राष्ट्रांना व लोकांना सलाम करतो, जे साम्राज्यवाद्यांद्वारे व मक्तेदार भांडवलदारी कंपन्यांद्वारे छेडल्या जाणाऱ्या अपराधी युद्धांचा, आर्थिक नाकेबंदींचा व गुलामीत जखडणाऱ्या तहांचा विरोध करत आहेत.

आगे पढ़ें