हिंदुस्थानच्या नवनिमार्णासाठी महिलांचा संघर्ष

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 8 मार्च 2019

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आपल्या अधिकारांसाठी आणि एका नव्या समाजासाठी संघर्ष करत असणाऱ्या हिंदुस्थानातील आणि सर्वच जगातील लक्षोवधी महिलांना हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सलाम करते!

जगातील सर्व देशांत महिला म्हणून आणि एक मानव म्हणून महिला त्यांच्या अधिकारांची मागणी करत आहेत. कष्टकरी पुरुषांच्या खांद्याला खांदा जोडून, भांडवलदारी शोषण, साम्राज्यवादी हल्ले आणि युद्धाला संपविण्याची मागणी त्या करीत आहेत.

आगे पढ़ें

युद्ध व दडपशाहीने ना काश्मीरची समस्या सुटेल व ना दहशतवादाचा अंत होईल

26 फेब्रुवारी 2019च्या पहाटे हिंदुस्थानी वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेला पार केले व पाकिस्तानमध्ये काही दहशतवादी छावण्यांवर 1000 किलो वजनाचे लेझर-निर्दिष्ट बाँब टाकल असे वृत्त आहे. मोठ्या भांडवलदारांच्या नियंत्रणातील मीडिया युद्धाचे ढोल बडवत आहे व मोठमोठ्याने बढाया मारत आहे की पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यावर ’’पाकिस्तानास यथायोग्य उत्तर दिले गेले आहे’’. काश्मीरमध्ये दहशतीच्या मोहिमेस खूप वाढवले गेले आहे. बी.एस.एफ., सी.आर.पी.एफ. व आई.टी.बी.पी.च्या

आगे पढ़ें
thumb

पीक विमा योजनाः “शेतकऱ्यांना मदत करण्याच्या” बहाण्याने भांडवलदारी विमा कंपन्यांच्या हातात नफ्याचा व्यापार सोपविण्याचे कारस्थान

जुन्या पीक विमा योजनेच्या जागेवर फेब्रुवारी 2016 साली सरकारने नवीन प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. ही नवीन योजना शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या सोडवायला मदत करेल असा दावा सरकारने केला होता. आता 3 वर्षांनंतर त्या योजनेमुळे शेतकऱ्यांना कितपत मदत झाली हे बघूया. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांचे काय विचार आहेत? जे शेतकरी पिकासाठी कर्ज घेतात त्यांना पीक विमा घेण्यास बाध्य करण्यात

आगे पढ़ें

पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक

12-16 जानेवारीमध्ये ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खाजगी विमा कंपन्यांच्या कलेक्टरच्या ऑफिसासमोर धरणे दिले। ह्या खाजगी विमा कंपन्या प्रधानमंत्री फ़सल बीमा योजनेच्या अंतर्गत पिकांच्या विम्याची स्कीम चालवतायत आणि त्यांना ह्या क्षेत्रातील 50 पंचायतींमधील शेतकऱ्यांना पिकाच्या विम्यांच्या धनराशीपासून वंचित केले आहे। ह्यांतील एक विमा कंपनीने राजस्व निरीक्षकए ग्राम स्तरीय कार्यकर्ता व इतर जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी करून विमा मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन केलेय व

आगे पढ़ें

हिंदुस्थानी गणराज्याच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त : हिंदुस्थानी गणराज्याचे नवनिर्माण ही काळाची मागणी आहे!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेवदन, 10 जानेवारी, 2019

ह्या 26 जानेवारीला हिंदुस्थानी गणराज्याची 69 वर्षे पूर्ण होतील. आज आपल्या सर्वांना अतिशय गंभीरपणे विचार करावा लागेल की हे गणराज्य जे-जे दावे करतं आणि प्रत्यक्षात जे काही घडतं आहे, ह्या दोघांमध्ये एवढा मोठा फरक का आहे. आज आपल्याला ही चर्चा करावी लागेल की ह्या देशाचे मालक बनण्याची आपल्या लोकांची आकांक्षा पूरी करण्यासाठी काय करावं लागेल.

आगे पढ़ें

गदरींच्या मार्गावर चालण्याचा अर्थ आहे हिंदुस्थानच्या नवनिर्माणासाठी संघर्ष करणे!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या 38व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पार्टीचे महासचिव, कॉम्रेड लाल सिंह यांचे भाषण

साथींनो,

आपण आपल्या पार्टीचा 38वा वर्धापन दिन अशा वेळी साजरा करत आहोत ज्यावेळी सर्व देशांतील लोकं अत्यंत गंभीर स्थितीचा सामना करत आहेत. रोजगाराची असुरक्षितता असहनीय होत आहे. संपूर्ण विश्वात अराजकता आणि हिंसा वाढत चालली आहे. वंशविद्वेष, सांप्रदायिकता, विशेष जाती आणि समुदाय, राष्ट्र आणि राष्ट्रीयता ह्यांचे दमन – हे सारेच दिवसेंदिवस, अधिकाधिक भयंकर होत आहे.

आगे पढ़ें

महावितरण (MSEDCL)च्या कामगारांच्या न्याय्य संघर्षाचे समर्थन करा!

समाजविरोधी खाजगीकरणाच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी एकजूट होऊया!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या प्रादेशिक समितीचे निवेदन, डिसेंबर 2018

कामगार बंधू-भगिनींनो!

कळवा-मुंब्रामध्ये वीज वितरणाचे खाजगीकरण रोखण्यासाठी व अधिकारी मनमानीने आपल्यावर लागू करू इच्छिणाऱ्या महावितरणच्या पुनर्रचनेच्या विरोधातील आपल्या न्याय्य संघर्षाचे कम्युनिस्ट गदर पार्टी समर्थन करते.

आगे पढ़ें

अमृतसरमधील दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार करा!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, नोव्हेंबर 19, 2018

नोव्हेंबर 19, 2018ला, जेव्हा निरंकारी समाजाचे शेकडो लोक अमृतसर जिल्ह्यातील अदलीवाल गावात प्रार्थना करत होते, तेव्हा दोन दहशतवाद्यांनी जबरदस्तीने प्रार्थना मंडपात प्रवेश करून त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला के ला. परिणामतः तीन लोकं ठार मारली गेली तर वीसहून अधिक स्त्री-पुरुष व मुले जखमी झाली.

आगे पढ़ें

आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनाः आरोग्य व विमा क्षेत्रांतील मोठ्या मक्तेदारी कॉर्पोरेट्सचा नफा सुनिश्चित करण्यासाठीची योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23 सप्टेंबरला आयुष्यमान भारत- राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना (ए.बी.-एन.एच.पी.एस.) औपचारिकरित्या झारखंडमध्ये सुरु केली. आयुष्यमान भारत ही सरकारी निधीने राबविण्यात आलेली जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आहे असा गाजा-वाजा केला जातोय. ह्या योजनेचा पहिला टप्पा 2018-2022 ह्या कालावधीमध्ये राबविण्यात येईल. ह्या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे संपूर्ण देशात विविध ठिकाणी आरोग्य व कल्याण केंद्र स्थापित करणे आणि राष्ट्रीय स्वास्थ्य

आगे पढ़ें

उदारीकरणाच्या कार्यक्रमाने शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला उध्वस्त केले आहे.

सुरक्षित उपजीविकांची हमी देण्यास केंद्र व राज्य सरकारांना तातडीने पाऊले उचलण्यास भाग पाडण्यासाठी हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांनी एक जोरदार संघर्ष सुरू केला  आहे. विविध राज्यांतील अधिकाधिक शेतकरी संघटना अधिकारांसाठी संघर्षात सामील होत आहेत. गेल्या दोनपेक्षा अधिक दशकांत हिंदुस्थानी राज्याच्या उदारीकरणाच्या कार्यक्रमाने शेतकरी वर्गाला उध्वस्त केले आहे. वाढत्या प्रमाणात कृषी जागतिक बाजारपेठेत एकीकृत होत आहे. शेतकऱ्यांना राज्याकडून मिळणाऱ्या समर्थनात कपात होत आहे. कृषी

आगे पढ़ें