हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन जानेवारी, 2020
5 जानेवारीला संध्याकाळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवर जो प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्याचा हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी तीव्र निषेध करते. लोखंडाच्या सळ्या व लाठ्या घेऊन व स्वतःचे चेहरे झाकून गुंड परिसरांत घुसले व त्यांनी अतिशय निर्घृणतेने हिंसा व अराजकता पसरविली. ह्या पूर्वनियोजित व राज्याद्वारे आयोजित हल्ल्यांत 20हून अधिक विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि शिक्षिकांना व शिक्षकांना गंभीर जखमा झाल्या.
जे.एन.यू.चे खाजगीकरण करण्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्येक प्रयासाविरुद्ध जे.एन.यू.चे विद्यार्थी व शिक्षक संघर्ष करीत आले आहेत. नागरिकत्व संशोधन कायद्याविरुद्ध (सी.ए.ए.विरुद्ध) व राष्ट्रीय नागरिकत्व पंजीविरुद्ध (एन.आर.सी.विरुद्ध) आवाज उठविण्याचे त्यांनी धाडस केले म्हणून जामिया मिलिया इस्लामिया विपीठाच्या विद्यार्थ्यांवर 15 डिसेंबरला जेव्हा बर्बर हल्ला करण्यात आला, तेव्हा देशातील इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांच्या जोडीने जे.एन.यू.च्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जोरदार समर्थन केले. सी.ए.ए. व एन.आर.सी.विरुद्ध आपल्या लोकांच्या संघर्षात जे.एन.यू.चे विद्यार्थी सक्रिय भूमिका बजावित आहेत.
जे.एन.यू.च्या विद्यार्थ्यांविरुद्ध ही क्रूर हिंसा म्हणजे लोकांच्या वाढत्या संघर्षांना दडपून टाकायच्या केंद्र सरकारच्या आततायी प्रयत्नांचे एक चिन्ह आहे. 26 डिसेंबरला गृहमंत्री अमित शाहने धमकी दिली होती की जी लोकं सी.ए.ए.चा विरोध करीत आहेत त्या सर्वांना “धडा शिकवला जाईल”. अमित शाहने हेही म्हटले होते की जी लोकं सरकारचे सी.ए.ए. परत घेण्याची मागणा करीत आहेत ते “तुकडे-तुकडे गँग”चे सदस्य आहेत. गेली चार वर्षे सरकार जे.एन.यू.च्या विद्यार्थ्यांबद्दल व शिक्षकांबद्दल हा खोटा प्रचार करीत आहे की ते “तुकडे-तुकडे गँग”चे सदस्य आहेत व त्यांची हिंदुस्थानाला तोडून टाकायची इच्छा आहे. हे स्पष्ट आहे की 5 जानेवारीला जे.एन.यू.च्या विद्यार्थ्यांवर व शिक्षकांवर केलेला हल्ला राज्याद्वारे आयोजित केला गेला होता.
जे.एन.यू.च्या उपकुलगरूंच्या व दिल्ली पोलीसांच्या भूमिकेवरून हे स्पष्ट होते की जे.एन.यू.च्या विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला राज्याद्वारे आयोजित होता. गुंडांनी आपले भयंकर काम पूर्ण केल्यानंतरच उपकुलगुरूंनी पोलिसांना परिसरांत बोलविले. जी लोकं जे.एन.यू.च्या विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास व त्यांना समर्थन देण्यास बाहेरून आली होती, त्यांना पोलिसांनी आत जाऊन दिले नाही. पण गुंडांचे मारपीट व तोडफोड करण्याचे भंयंकर काम जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मात्र पोलिसांनी त्यांना सहीसलामत फाटकाच्या बाहेर पोहोचविले.
आपल्या अधिकारांसाठी जे.एन.यू.चे विद्यार्थी व शिक्षक जे न्याय्य संघर्ष करीत आहेत, त्याला हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी पूर्ण समर्थन देते.