महान ऑक्टोबर क्रांतीचा उद्घोष करा!

चला, आपल्या देशात कामगार-शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपण काम करूया!

7 नोव्हेंबर 1917ला रशियाच्या क्रांतिकारी कामगारांनी, शेतकऱ्यांनी, सैनिकांनी व नाविकांनी विंटर पॅलेसवर आक्रमण केले व अल्पकालीन सरकारच्या प्रतिनिधींना अटक केले. त्यांनी मंत्रालयांना, राज्याच्या केंद्रीय बँकेला, व त्याच बरोबर रेल्वे स्टेशनांना, पोस्ट व तार ऑफिसांना आपल्या ताब्यात घेतले. बोल्शेव्हिक पार्टीच्या नेतृत्वाखाली कामगार वर्गाने रशियामध्ये राजनैतिक सत्ता काबिज केली. ह्या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले. जगभरातील भांडवलदारांना धडकी भरली. ह्या घटनेने जगभरातील दलित-शोषित लोकांना प्रेरित केले व त्यांना नवी उमेद दिली.

ह्या क्रांतीने एका नव्या राज्याला व समाजाला जन्म दिला, जिथे कष्टकरी लोक केंद्रात होते. ह्या नव्या सोव्हिएत राज्याने मोठ्या भांडवलदारांची मालमत्ता हडपली व मोठ्या उद्योगांना, दळणवळणाला, बँकिंगला व व्यापाराला सार्वजनिक मालकीच्या अंतर्गत सामाजिक उपक्रमांत बदलले. ह्या नव्या राज्याने ग़रीब शेतकऱ्यांना स्वेच्छेने आपल्या जमीनींना एकत्र करून मोठ्या पातळीवर सामूहिक शेतांमध्ये बदलण्यासाठी प्रेरित केले. कष्टकरी जनतेच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सर्व वस्तूंच्या व सेवांच्या उत्पादनाला व वितरणाला एका योजनेच्या अंतर्गत आणण्यात आले. एका नव्या समाजवादी अर्थव्यवस्थेचा उदय झाला जिथे ना बेकारी होती, ना महागाई व ना कोणत्याही प्रकारचे संकट.

तेव्हा कोणताही शोषक वर्ग उरला नाही व कोणतेही विशेषाधिकार पण नाहीत. प्रत्येक कामगाराला, शेतकऱ्याला व सैनिकाला वैधानिक मंडळांच्या प्रतिनिधीस निवडण्याचा व प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा अधिकार होता. निवडून आलेल्या प्रतिनिधीला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त होऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान दर्जा मिळण्यासाठी सोव्हिएत राज्याने अनुकूल परिस्थिती निर्माण केली होती. सोव्हिएत राज्याने समाजाच्या सर्व सदस्यांना शांतीची, सुखाची व सुरक्षेची हमी दिली. ज्यांनी ज्यांनी समाजवादी व्यवस्था निर्माण करण्याकरिता योगदान दिले होते त्या सर्व राष्ट्रांची व लोकांची एकता सोव्हिएत राज्याने मजबूत केली.

सोव्हिएत राज्याच्या ह्या पूर्ण अनुभवाने मानवतेला हा विश्वास दिला की अशा समाजाचे निर्माण करणे शक्य आहे जिथे प्रत्येक सदस्याला मानवोचित इज्जतीचे जीवन जगणे शक्य असेल. ऑक्टोबर क्रांतीने एका नव्या वर्गाला, कामगार वर्गाला, सत्तेवर आणले व म्हणून जगातील सर्व कामगारांना व उत्पीडित लोकांना ह्या मार्गावर जाण्यास प्रेरित केले.

आज आपला देश व संपूर्ण जग मोठ्या संकटाच्या कचाट्यात आहे. सगळीकडे युद्ध व जनसंहार पसरलेले आहेत. सगळीकडे श्रमिक लोकं आर्थिक हलाखीत राहत आहेत. दुसरीकडे श्रमिकांच्या कठोर मेहनतीतून निर्माण झालेल्या सामाजिक दौलतीस मूठभर अल्पसंख्यक हडप करत आहेत. समाजाची दिशा ठरवण्यात विशाल श्रमिक जनसमुदायाची कोणतीही भूमिका नाहीय. प्रचलित राजनैतिक प्रणालीत त्यांना पूर्णतः वाळीतच टाकण्यात आले आहे.

प्रचलित प्रणालीत सखोल, मूलभूत परिवर्तनाची गरज आहे. आणि म्हणूनच, नंतर जरी त्या प्रणालीचा विनाश झाला होता, तरीदेखील ऑक्टोबर क्रांती, श्रमजीवी लोकशाही व समाजवादाची स्थापना, ह्यांतून आपल्याला आज बहुमूल्य धडे मिळतात.

भूतपूर्व सोव्हिएत संघात भांडवलशाहीच्या क्रमिक पुनर्स्थापनेमुळे व त्याचे एका साम्राज्यवादी शक्तीत परिवर्तन झाल्यामुळे सोव्हिएत संघ व अमेरिका, ह्या दोन महाशक्तींमध्ये धोकादायक टक्कर सुरू झाली. त्यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली व जगाचे दोन परस्परविरोधी गटात विभाजन झाले. अखेरीस सोव्हिएत संघाचे जेव्हा पतन झाले, तेव्हापासून पूर्ण जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता सत्तापरिवर्तनासाठी अमेरिकन साम्राज्यवाद्यांद्वारे बर्बर समाजविरोधी हल्ले व युद्ध जगाने बघितले आहेत. 1989 नंतर जे काही घडले त्यामुळे ह्या नरभक्षक भांडवलदारी-साम्राज्यवादी व्यवस्थेचा अंत करण्याची गरज अधिक निकडीची झाली आहे.

आपल्या देशात ह्या भांडवलदारी व्यवस्थेच्या बद्दलच्या सर्व अशा भ्रमांना नष्ट करण्याची निकडीची गरज आहे, ज्यांचे तथाकथित धर्मनिरपेक्ष व लोकशाही हिंदुस्थानी राज्य व त्याची बहुपार्टी प्रतिनिधित्ववाली राजनैतिक प्रक्रिया जतन करते. ह्या व्यवस्थेस सुंदर बनवण्याचे कितीही प्रयत्न जरी केले, तरी ती शोषित-पीडित कामगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना व नवयुवकांना मुक्ती देऊ शकत नाही.

आजच्या विषयी ह्याच चिंतेला लक्षात घेऊन आपण भूतकाळाकडे बघतो. आजच्या ह्या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण भूतकाळाकडून धडे घेतले पाहिजेत, जेणेकरून आपल्या लोकांसाठी व जगभरातील सगळ्या कामगारांच्या व शोषित-पीडित लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रस्ता उघडू शकू. आज आपल्याला ते करावे लागेल जे करण्यात बोल्शेव्हिक पार्टीला एका शताब्दीपूर्वी यश मिळाले. बोल्शेव्हिक पार्टी व तिच्या सातत्याने केलल्या कार्यामुळेच 1917मध्ये क्रांतीच्या विजयास अनुकूल परिस्थिती बनली. मार्क्सवादाचे रक्षण करता करता त्याला विकसित करून रशियाच्या प्रत्यक्ष परिस्थितीत त्याला लागू करून सत्ता काबिज करण्यासाठी व नवसमाजाचे निर्माण करण्यासाठी बोल्शेव्हिक पार्टीने कामगारांचे, शेतकऱ्यांचे व सैनिकांचे नेतृत्व केले.

1980मध्ये हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीची स्थापना क्रांतीसाठी आत्मनिष्ठ परिस्थिती बनविण्याच्या उद्देश्यानेच करण्यात आली होती. तेव्हापासून आपल्या पार्टीचा एकच कार्यक्रम राहिलेला आहे, व तो म्हणजे हिंदुस्थानाच्या कामगारांना व शेतकऱ्यांना देशाचे राज्यकर्ते बनण्यासाठी परिस्थिती तयार करणे, जेणेकरून ते एक असे राज्य व समाज उभारू शकतील जे समाजाच्या प्रत्येक सदस्याला सुखाची व सुरक्षेची हमी देतील.

चला, आपण महान ऑक्टोबर क्रांतीला सलाम करून आपल्या देशात श्रमजीवी क्रांतीच्या विजयासाठी आत्मनिष्ठ परिस्थिती बनवूया!

इंकलाब झिंदाबाद!

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.