पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौराः हिंदुस्थानी सत्ताधारी वर्गाच्या व अमेरिकन सामाज्यवाद्यांच्यामधील रणनैतिक युतीला पुष्टी

आशियावर आपले संपूर्ण वर्चस्व स्थापित करण्यासाठी अमेरिकेला हिंदुस्थानाबरोबरची आपली रणनैतिक युती मजबूत करायची आहे. अमेरिकेला चीनला रोखायचे आहे, रशियाला कमजोर बनवायचे आहे व ईराणला एकाकी पाडायचे आहे. हिंदुस्थानाच्या मोठ्या भांडवलदारांना स्वतः आशियातील सर्वात प्रबळ ताकद बनायचे आहे. ह्यासाठी त्यांची सर्वात मोठी स्पर्धा चीनबरोबर आहे असे ते मानतात. हिंदुस्थानाचे सत्ताधारक आपले उद्देश्य साधण्यासाठी अमेरिकेशी आपली रणनैतिक युती मजबूत बनवू पाहताहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 22-27 सप्टेंबरमधील अमेरिकेचा दौरा म्हणजे दोन्ही देशांतील सत्ताधारी वर्गांमधील रणनैतिक युतीला जास्त मजबूत बनविण्याचा एक भाग होता.

हिंदुस्थानी पंतप्रधानांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून, अमेरिकेच्या अध्यक्षांनी ह्यूस्टन, टेक्ससमध्ये अमेरिकानिवासी हिंदुस्थानी लोकांच्या मेळाव्यात भाग घेतला. ह्याचा खूप गाजावाजाने प्रचार करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टी व डेमोक्रेटिक पार्टी, अशा दोन्ही पार्ट्यांच्या नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ह्यावरून पुन्हा सिद्ध होते की अमेरिकन साम्राज्यवादी भांडवलदारांच्या दृष्टीने हिंदुस्थानअमेरिका रणनैतिक युतीला मजबूत करणे किती महत्त्वपूर्ण आहे. मक्तेदार भांडवलदारांच्या नियंत्रणातील हिंदुस्थानी मिडियाने, हिंदुस्थानी मोठ्या भांडवलदारांच्या विचारांनुसार, हिंदुस्थानअमेरिकेचे संबंध मजबूत होण्याबद्दल अत्यंत खुशी प्रकट केली.

आशियावर आपले संपूर्ण वर्चस्व स्थापित करण्यासाठी अमेरिकेला हिंदुस्थानाबरोबरची आपली रणनैतिक युती मजबूत करायची आहे. अमेरिकेला चीनला रोखायचे आहे, रशियाला कमजोर बनवायचे आहे व ईराणला एकाकी पाडायचे आहे. हिंदुस्थानाच्या मोठ्या भांडवलदारांना स्वतः आशियातील सर्वात प्रबळ ताकद बनायचे आहे. ह्यासाठी त्यांची सर्वात मोठी स्पर्धा चीनबरोबर आहे असे ते मानतात. हिंदुस्थानाचे सत्ताधारक आपले उद्देश्य साधण्यासाठी अमेरिकेशी आपली रणनैतिक युती मजबूत बनवू पाहताहेत.

ह्या वेळी अमेरिका व चीनमध्ये व्यापार युद्ध चालू आहे. हिंदुस्थानचा भांडवलदार वर्ग ह्या संधीचा फायदा घेऊन आपल्या बाजारांचा विस्तार करू इच्छितोय. अमेरिका ईराणविरुद्ध एकामागून एक भडकाऊ कृत्ये करीत आहे व ईराणवर हल्ला करण्यासाठी पश्चिम आशियाई देशांची एक लष्करी युती बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही हिंदुस्थानाच्या भांडवलदारांसाठी एक चिंतेची बाब आहे. अफगाणिस्तानमधील आपली हितं जोपासण्याकरिता अमेरिकेला पाकिस्तानची मदत हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानची भूमिका वाढेल अशा कोणत्याही नव्या व्यवस्थेला हिंदुस्थानाच्या भांडवलदार वर्गाचा विरोध आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून अमेरिकेने हिंदुस्थानावर दबाव डालावा, ह्यासाठी पाकिस्तान प्रयत्नरत आहे. ह्या पार्श्वभूमीवर मोदींनी अमेरिकेचा दौरा केला.

अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी नेहमीच हिंदुस्थानाला व पाकिस्तानाला एकमेकांविरुद्ध लढवत ठेवण्याचे धोरण वापरले आहे. असे करून त्यांनी ह्या भूभागातील आपली ढवळाढवळ योग्य ठरविली आहे. काश्मीरवरून हिंदुस्थानपाकिस्तानातील विरोधाचा अमेरिकेने आपल्या फायद्याकरिता दुरुपयोग केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंपच्या जाहिर वक्तव्यावरून हे स्पष्ट आहे. आपल्याला दोन्ही देशांमध्ये शांती हवी आहे असे जरी त्यांनी नाटक केले असले तरी त्या मागे प्रत्यक्षात अमेरिका दोन्ही देशांना भरपूर शस्त्रास्त्र देत राहते व आपल्या उद्देश्यासाठी दोन्ही देशांच्या सत्ताधारकांना एकमेकांशी भिडवत राहते. हिंदुस्थानाला व पाकिस्तानाला आपापसातील विवाद शांतीपूर्ण पद्धतीने सोडविता येऊ नयेत हे सुनिश्चित करण्याकरिता अमेरिकेच्या गुप्तहेर एजंस्यांनी वेगवेगळ्या दहशतवादी गुटांचे संघटन व सशस्त्रीकरण केले आहे व त्यांच्याद्वारे त्यांनी नित्यनेमाने दहशतवादी हल्ले आयोजित केल्येत.

पूर्ण जगात अमेरिका दहशतवादाचा उगम आहे ह्याचा हवा तेवढा पुरावा आहे. जगातील विविध भागात आपली रणनैतिक उद्दिष्टे साधण्याकरिता अमेरिकेने अनेक दहशतवादी गुटांना प्रशिक्षित केले आहे हे सर्वश्रुत आहे. पण तरीदेखील त्यांच्याविरुद्ध आक्रमक युद्ध करण्याच्या समर्थनार्थ अमेरिकन साम्राज्यवादी हा खोटा प्रचार करत राहतात की मुसलमान लोकं व इस्लामी देश दहशतवादी आहेत. ट्रंप व मोदी, दोघांनी “दहशतवादाविरुद्ध युद्ध” करण्यास आपण वचनबद्ध आहोत असे जाहीर केले. अमेरिकन नेत्यांनी ईराणला जगातील दहशतवादाचा सर्वात मोठा प्रायोजक आहे असे घोषित केले, तर हिंदुस्थानी नेत्यांनी तोच आरोप पाकिस्तानावर केला.

मोदी व ट्रंप, दोघांनी आपापल्या देशातील “अवैध” स्थलांतरित लोकांविरुद्ध बोंबाबोंब केली आहे. अमेरिकेत राहणारी अनेक हिंदुस्थानी लोकं स्थलांतरविरोधी कायद्यांचे व राज्याद्वारे आयोजित द्वेषपूर्ण अपराधांचे शिकार बनले आहेत. परंतु त्यांच्या दयनीय स्थितीविषयी मोदींना काहीच चिंता नव्हती.

हिंदुस्थानाचे भांडवलदार मानतात की त्यांचे अमेरिकेशी नाते अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदुस्थानाठी अमेरिका हे विदेशी भांडवल, प्रौद्योगिकी व गुंतवणुकींचे एक प्रमुख स्त्रोत आहे. हिंदुस्थानी सुरक्षा बलांसाठी सर्वात आधुनिक प्रौद्योगिकी जास्तीत जास्त प्रमाणात अमेरिका देते. अमेरिकेसाठी एक आकर्षक बाजारपेठ म्हणून हिंदुस्थानाला बढावा देण्याकरिता हिंदुस्थानी भांडवलदार वर्गाने मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा वापर केला. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीसाठी हिंदुस्थानाला आकर्षक बनविण्यासाठी त्यांच्या सरकारने कोणती पाऊले उचलली आहेत, ह्यावर मोदींनी प्रकाश टाकला. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी विदेशी भांडवलाची गुंतवणूक वाढविण्यासाठी व निर्यातकेंद्रित वृद्धीसाठी आपल्या सरकारने काय काय केले ह्या विषयावर त्यांनी खूप जोर दिला. खास करून ऊर्जा व रक्षा क्षेत्रांत व अनेक इतर क्षेत्रांत अमेरिकन कंपन्यांनी हिंदुस्थानात जास्त गुंतवणूक करावी असे त्यांनी आवर्जून सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून दुतर्फी व्यापारासंबंधित काही मुद्द्यांवरून हिंदुस्थानात व अमेरिकेत विवाद निर्माण झालेला आहे. जी.एस.पी.(Generalized System of Preferences) यादीतून अमेरिकेने हिंदुस्थानाला निलंबित केले आहे. तिने पोलादाच्या व अॅल्युमिनियमच्या उत्पादांवर शुल्क लावला आहे. ह्याच्या बदल्यात हिंदुस्थानाने अमेरिकेच्या विविध उत्पादांवर शुल्क लागू केले आहे. दोन्ही देशांच्या शासकीय अधिकाऱ्यांमध्ये ह्या मुद्द्यांवर अजून चर्चा चालू आहे. परंतु त्याचबरोबर हे स्पष्ट आहे की दोन्ही देशाच्या सत्ताधाऱ्यांना आपल्या वाढत्या रणनैतिक संबंधांच्या मध्ये ह्या विवादामुळे व्यत्यय आणू द्यायचा नाहीय.

मोदींनी 17 प्रमुख अमेरिकन ऊर्जा कंपन्यांच्या उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा केली व हिंदुस्थानाने अमेरिकेकडून तेल व नैसर्गिक गॅस विकत घेण्याचा निर्णय केला आहे, ह्याबद्दल ट्रंपने खुशी व्यक्त केली. रक्षा व सुरक्षा दोन्हींमध्ये हिंदुस्थानाबरोबर वाढत्या सहयोगाविषयी ट्रंप बोलले व त्यांनी हे ठासून सांगितले की ह्या वेळी हिंदुस्थानाने अमेरिकेकडून जवळपास 18 अब्ज डॉलरची रक्षा सामुग्री विकत घेतली आहे व ह्या पुढे अजून काही रक्षा सौदे केले जाणार आहेत. हिंदप्रशांत महासागराच्या क्षेत्रात हिंदुस्थानाच्या व अमेरिकेच्या सेनांमध्ये वाढता सहयोग आहे व ते एकमेकांवर जास्त प्रमाणात अवलंबून आहेत ह्यावर ट्रंपनी जोर दिला व आणिक काही दिवसांत दोन्ही देशांच्या पहिल्यांदाच होणाऱ्या भूमी, वायु व नौ सेनांच्या ‘टाइगर ट्रायम्फ’ नावाच्या संयुक्त युद्ध सरावाचा उल्लेख केला.

मोदींचा अमेरिकेचा दौरा परत सिद्ध करतो की हिंदुस्थानाचे मोठे भांडवलदार देशाला एका अतिशय धोकादायक साम्राज्यवादी मार्गावर नेत आहेत. हा मार्ग आहे जलद गतीने लष्करीकरण करण्याचा व “इस्लामी दहशतवादाविरुद्ध” लढण्याच्या नावाने अमेरिकेबरोबर युती बनवून अन्याय्य कब्जाकारी युद्धांत भाग घेण्याचा मार्ग. ह्या मार्गाने जाऊन विदेशांत हिंदुस्थानी भांडवलदारांसाठी बाजारपेठा वाढविण्याची व त्यांची प्रभावक्षेत्रे अधिक विस्तृत करून जगावर आपले वर्चस्व ज्यांनी साधले आहे, त्या मोठ्या शक्तींच्या विशेष गटांत हिंदुस्थानाची जागा कायम करण्याची आपल्या सत्ताधारींची इच्छा आहे. ट्रंपनी सर्वांसमोर मोदी सरकारला जो पाठिंबा प्रकट केला, त्यावरून स्पष्ट होते की आजमितीस अमेरिकन साम्राज्यवादी हे मानताहेत की आपल्या हुकूमशाहीखाली एकध्रुवीय जग स्थापित करण्याच्या आपल्या विश्वव्यापी इस्लामविरोधी, समाजविरोधी व आक्रमक युद्धखोर हल्ल्यास सफल बनविण्याकरिता आपला विश्वासू मित्र म्हणून हिंदुस्थानाची भूमिका मजबूत बनविण्याकरिता पुन्हा निवडून आलेले मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार हेच सर्वोत्तम आहे. हिंदप्रशांत महासागराच्या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या आपल्या इराद्यांसाठी ते हिंदुस्थानाच्या सत्ताधारी वर्गाबरोबरच्या ह्या रणनैतिक युतीस मजबूत करत आहेत.

आपल्या स्वतःची साम्राज्यवादी उद्दिष्टे साधण्यासाठी आपल्या देशाचा सत्ताधारी वर्ग अमेरिकेच्या समर्थनावर अवलंबून आहे. परंतु अमेरिका जगातील इतर कुठल्याही देशाचा विश्वासू मित्र राहिलेला नाहीय. आपल्या स्वतःच्या हितांनुसार अमेरिकेचे साम्राज्यवादी इतर देशांबरोबर युती बनवतात व तोडतात देखील. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देश्याच्या अनुषंगाने ते अमुक एका देशाचे समर्थन करतात. जेव्हा तो देश त्यांच्या उपयोगाचा राहात नाही तेव्हा काहीही तमा न बाळगता ते त्याच देशाला उध्वस्त करतात.

हिंदुस्थान जर अमेरिकेचा विश्वासू मित्र बनला तर त्याचा अर्थ त्याला अमेरिकेच्या अन्याय्य साम्राज्यवादी युद्धांमध्ये भागीदार बनावे लागेल. हे हिंदुस्थानी लोकांच्या हितांच्या अगदी विपरीत आहे. हे अमेरिकेच्या दादागिरीविरुद्ध संघर्षरत असलेल्या सर्व राष्ट्रांच्या व लोकांच्या हितांच्या विरुद्ध आहे. आपल्या शासकांच्या ह्या धोकादायक साम्राज्यवादी रस्त्याचा आपण जोरदार विरोध केला पाहिजे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.