कॉम्रेड लेनिनच्या 149 व्या जन्मदिवसाच्या निमित्तानेः कॉम्रेड लेनिनचे विचार व लढाऊ बाणा अमर राहो !

22 एप्रिल हा व्लादिमिर इलिच लेनिनचा 149वा जन्मदिवस. ते 20व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे प्रमुख सिद्धांतकार आणि कृतीशील नेते होते.

जागतिक अर्थव्यवस्था जसजशी एका संकटातून दुसऱ्या संकटाच्या दिशेने धडपडत वाटचाल करतेय आणि सगळीकडे बर्बादी पसरवित आहे, तसतसे हे स्पष्ट होतेय कि वर्तमानातील वास्तविक घटनाक्रमाचे आकलन होण्यासाठी, लेनिनचे विचार समजून घेणे अनिवार्य आहे. भांडवलशाहीच्या सगळ्यात उच्च पडावाबद्दल, म्हणजेच साम्राज्यवादाबद्दल लेनिनने जे अचूक विश्लेषण केले होते, ते जागतिक भांडवलशाहीच्या वर्तमान संकटाचे आकलन होण्यासाठी मार्गदर्शक आहे.

सगळ्या जगातील लोक, भांडवलदारी लोकशाहीच्या विभिन्न रूपातील तथाकथित गणराज्यांच्या राजवटीने त्रस्त झाले आहेत. प्रचंड धनबलाच्या मदतीने निवडणुका जिंकणाऱ्या तथाकथित प्रतिनिधींबद्दल लोक अजिबात संतुष्ट नाहीत.

“राज्य आणि क्रांती” या त्यांच्या प्रसिध्द रचनेत कॉम्रेड लेनिननी राज्याबद्दलच्या मार्क्सवादी निष्कर्षांची पुन्हा पुष्टी केली. राजेशाहीपासून आधुनिक गणराज्यांच्या, भांडवलशाही समाजव्यवस्थेच्या वेगवेगळ्या शासन प्रणाली या प्रत्यक्षात भांडवलदार वर्गाची हुकूमशाहीच असतात, या सत्याचा कॉम्रेड लेनिनी खुलासा केला. मुठभर शोषकांच्या सत्तेचीच ती वेगवेगळी रूपे असतात.

लेनिनच्या नेतृत्वाखाली बोल्शेविक पार्टीने 1917 मधील महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीचे नेतृत्व केले होते. भांडवलदारी शोषकांचे राज्य नेस्तनाबूत करणे शक्य आहे हे प्रत्यक्ष कृतीने ऑक्टोबर क्रांतीने जगभरातील पीडित लोकांना दाखवून दिले. कष्टकरी लोक स्वतःच्या प्रयत्नांतून श्रमिकांचे राज्य स्थापन करू शकतात हे ऑक्टोबर क्रांतीने दाखवून दिले.

वैज्ञानिक समाजवादाच्या मार्क्सवादी सिद्धांतांचा वापर करून, कॉम्रेड लेनिनी 20व्या शतकातील प्रारंभीच्या काळाचे विश्लेषण केले. जागतिक स्तरावरील अचानकपणे झालेल्या परिवर्तनांचे मुल्यांकनही त्यांनी केले. भांडवलदारांमधील स्पर्धा तोपर्यंत मक्तेदार भांडवलदारांमधील स्पर्धेच्या टप्प्यावर पोचली होती. भांडवलदारी व्यवस्था अभूतपूर्व परजीवी टप्प्यावर पोचली होती. सर्वशक्तिशाली आणि प्रभावी वित्तीय मक्तेदारी, समाजातील प्रत्येक उत्पादक व सुदृढ गोष्ट नष्ट करत होती.

कॉम्रेड लेनिननी समजाविले, की काही साम्राज्यवादी आणि वसाहतवादी शक्तींच्या हातात संपूर्ण जगाची विभागणी झालेय. म्हणूनच जगाची फेरवाटणी करूनच प्रत्येक साम्राज्यवादी शक्ती स्वतःचे प्रभावक्षेत्र वाढवू शकते.

साम्राज्यवाद हा असा टप्पा आहे ज्यात भांडवलशाहीतील अंतर्विरोध सोडवणुकीच्या स्तरावर पोचतात असे लेनिननी सांगितले. साम्राज्यवाद्यांमधील आपापसांतील तंटे, समाजाला वारंवार बर्बादी पसरविणाऱ्या युद्धांमध्ये ढकलतील असे पूर्वानुमान त्यांनी केले. जे देश युध्द छेडतील ते काहीही समर्थन का देईनात, पण सत्य हेच आहे की जगाची फेरवाटणी करण्याचा धनाढ्य शोषक व लुटारूंचे प्रयत्न हेच त्या युद्धांमागील खरे कारण असते. जेव्हा श्रमजीवी वर्ग सर्व पीडितांना संघटित करून आपल्या हातात राज्य सत्ता घेऊन साम्राज्यवादी शृंखलेतून बाहेर निघेल आणि भांडवलशाही व्यवस्थेच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यात यशस्वी होईल, तेव्हाच शांती कायमस्वरूपी प्रस्थापित होऊ शकेल.

फेब्रुवारी 1917मध्ये झारची सत्ता उलथून टाकल्यानंतर, कॉम्रेड लेनिननी त्यांची प्रसिद्ध रचना “एप्रिल थिसीस” मध्ये लिहिले होते की “श्रमजीवी वर्गाची चेतना आणि संघटना कमजोर  असल्यामुळे” त्या क्रांतीनंतर सत्ता भांडवलदार वर्गाच्या हातात गेली. जमीन, शांती आणि रोटी यांसह क्रांतीच्या सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी, सर्व कष्टकरी आणि पिडीत लोकांबरोबर गठबंधन असलेल्या श्रमजीवी वर्गाच्या हातात राज्यसत्ता असणे आवश्यक होते.

कॉम्रेड लेनिन जेव्हा म्हणत की रशियातील कामगार आणि शेतकरी देशाचे सत्ताधीश बनण्याच्या क्षमतेचे आहेत, तेव्हा अनेक तथाकथित मार्क्सवादी पंडित लेनिनची खिल्ली उडवायचे. पण लेनिननी अत्यंत बहादुरीने त्या सगळ्यांचा विरोध केला. आपल्या सैद्धांतिक निष्कर्षांवर ते ठाम राहिले आणि सर्व रशियन कम्युनिस्टांचे नेतृत्व करून, त्यांनी कष्टकऱ्यांना आत्मविश्वास दिला की त्यांना स्वतःच्या हातात राज्यसत्ता घ्यावीच लागेल व तसे करण्याची त्यांची क्षमता आहे.

लेनिनच्या नेतृत्वाखाली बोल्शेविक पार्टीने क्रांतिकारी जनसमुदायाने निर्माण केलेल्या कामगार प्रतिनिधींच्या सोविएट अधिक विकसित केल्या. सोविएट असे साधन बनल्या ज्यांचा वापर करून क्रांतिकारी कामगार, सैनिक व शेतकरी सामुहिक निर्णय घेण्यात आणि एकत्रित कार्यक्रम ठरविण्यात सक्रिय सहभाग घेऊ शकत.

भांडवलदारी संसदीय व्यवस्था ही सोविएट व्यवस्थेच्या तुलनेने मागासलेली आहे असे लेनिननी मांडले. झारची राजेशाही उखडून टाकल्यावर जी नवीन राज्यव्यवस्था स्थापन करायची होती त्याची रूपरेषा त्यांनी विस्तृतपणे मांडली. भांडवलदार वर्गाची नव्हे तर श्रमिक वर्गाची ती हुकुमशाही असायला हवी, संसदीय गणराज्य नव्हे तर सोविएट गणराज्य असायला हवे, असे त्यांनी मांडले. “सोविएटच्या हातात संपूर्ण शक्ती!” या घोषणेतून त्यांनी तो निष्कर्ष मांडला.

लेनिनवादी विचारांच्या मार्गदर्शनाने जर आपण आजच्या परिस्थितीचे विश्लेषण केले तर आपण असाच निष्कर्ष काढू की जोपर्यंत वर्तमान संसदीय गणराज्य टिकून असेल तोपर्यंत आपल्या कुठल्याही ज्वलंत समस्या सुटणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयासहित या गणराज्याच्या सर्वच संस्था आज पूर्ण बदनाम झाल्या आहेत. अनेक भांडवलदारी पार्ट्या “लोकशाही वाचवा” असा जो नारा देत आहेत त्याने लोकांनी फसता कामा नये.

वर्तमान राजनैतिक व्यवस्था पूर्णपणे बदनाम झालीय, पूर्णपणे सडली आहे. ती आपण वाचवायची नाहीय. तिच्या जागेवर एक नवीन व्यवस्था स्थापित करायला हवी. रशियात सोविएट लोकशाही अशा स्वरूपात ती नवीन व्यवस्था विकसित झाली होती, ज्यात श्रमजीवी वर्ग आणि त्याच्या पार्टीच्या नेतृत्वाखाली जनसमुदायाच्या हातात राज्यसत्ता होती.

मक्तेदार भांडवलदार घराण्यांच्या नेतृत्वाखाली भांडवलदार वर्गाच्या हातात आपल्या देशाची राज्यसत्ता आहे, ती संपुष्टात आणणे हेच हिंदुस्थानातील जनसमुदायापुढील सगळ्यात महत्वाचे काम आहे. देशाच्या संपत्तीचे निर्माते, कामगार व कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातात देशाची राज्यसत्ता असायला हवी. जेव्हा तसे होईल तेव्हाच देशाची अर्थव्यवस्था मुठभर भांडवलदारांच्या लालसापूर्तीसाठी न चालवता, कष्टकरी जनतेच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने राबविली जाईल. तेव्हाच आपला समाज प्रत्येक प्रकारच्या अत्याचारापासून व गुलामीपासून मुक्त होईल. तेव्हाच हिंदुस्थान साम्राज्यवादी व्यवस्थेपासून स्वतंत्र होईल.

वर्तमान संसदीय लोकशाहीची व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेद्वारे, राज्यसत्ता कधीच श्रमजीवी वर्ग व त्यांच्या मित्रांच्या हातात येऊ शकत नाही. जसे रशियात 100 वर्षांपूर्वी केले गेले तसेच आपल्या देशातील कामगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना आणि नौजवानांना आपल्या वैकल्पिक सत्तेची तंत्रे विकसित करावी लागतील. एका उन्नत लोकशाहीसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, ज्यात आपण कष्टकरी लोक फक्त मत देणेच नव्हे तर देशातील सर्व निर्णय घेऊ शकू.

वर्तमान परिस्थितीत लेनिनवादी सिध्दांत आणि कार्यनीती लागू करण्याचा अर्थ आहे त्या नवीन प्रकारच्या संघटना विकसित करणे, ज्यांना या शतकात क्रांतीकारी जनसमुदायाने जन्म दिलाय.

औद्योगिक केंद्रांमध्ये बनत असलेल्या कामगार एकता समित्यांना आणखी विकसित करायला हवे. गावांमध्ये कामगार-शेतकरी समित्या बनवाव्या आणि मजबूत कराव्या लागतील. लोकांच्या हातात सत्ता येण्याच्या दिशेने अनेक शहरी व ग्रामीण निवासी विभागात कार्यरत समित्यांना आणखी विकसित करायला हवे. वर्तमान राज्याच्या जागेवर जे नवीन राज्य प्रस्थापित करायचे आहे त्याचे अंकूर अशा स्वरुपात या संघटनांना विकसित करायला हवे.

वर्तमान संसदीय गणराज्याबद्दल जे काही भ्रम आहेत ते दूर  करण्यासाठी आपल्याला धैर्याने व सातत्याने काम करायला हवे. भांडवलदारांच्या “कमी वाईट” पार्ट्यांबद्दल जे भ्रम आहेत ते संपवायला  हवेत. वर्तमान राज्याच्या आणि त्याच्या राज्यघटनेच्या “धर्मनिरपेक्ष पाया”चे रक्षण करण्याच्या चुकीच्या समजुतीचा पर्दाफाश करावा लागेल, कारण हे राज्य आणि याची राज्यघटना वरपासून खालपर्यंत सांप्रदायिक आणि भ्रष्ट आहेत.

हिंदुस्थानी समाजाला एका अशा क्रांतीची गरज आहे जी भांडवलदार वर्गाच्या सत्तेला नेस्तनाबूत करेल, सामंतवाद आणि वसाहतवादाचे सर्व अवशेष मिटवून टाकेल, देशाला साम्राज्यवादी व्यवस्थेपासून मुक्त करेल आणि एक आत्मनिर्भर समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा मार्ग सूलभ करेल.

आपल्याला एक आधुनिक लोकशाही राज्य हवे आहे, जे देशातील विभिन्न रहिवाशांचे स्वेच्छापूर्वक संघराज्य असेल, ज्यात सार्वभौमत्व लोकांच्या हातात असेल, संसद अथवा मंत्रिमंडळाच्या हातात नाही. आपल्याला एका अशा राजकीय प्रक्रियेची आवश्यकता आहे ज्यात सर्व प्रौढ नागरिकांना निवडण्याचा व निवडून येण्याचा अधिकार प्रत्यक्षात असेल, निवडून आलेल्या प्रतिनिधींना जबाबदार  ठरविण्याचा आणि त्यांना परत बोलविण्याचा अधिकार असेल, तसेच देशाची नीती, नियम आणि कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव देण्याचा अधिकार असेल.

आजच्या परिस्थितीत सर्व कम्युनिस्टांनी एकजूट होऊन कामगार, शेतकरी, महिला आणि नौजवानांमध्ये, एकजूट संघर्ष करण्यासाठी व सामूहिक निर्णय घेणाऱ्या संघटना बनविण्याचे काम करायला हवे. कामगारवर्गाचे एकजूट नेतृत्व देणाऱ्या एका पार्टीला बनविण्याच्या व मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नात आपण एकजुटीने काम करायला हवे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.