युद्ध व दडपशाहीने ना काश्मीरची समस्या सुटेल व ना दहशतवादाचा अंत होईल

26 फेब्रुवारी 2019च्या पहाटे हिंदुस्थानी वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेला पार केले व पाकिस्तानमध्ये काही दहशतवादी छावण्यांवर 1000 किलो वजनाचे लेझर-निर्दिष्ट बाँब टाकल असे वृत्त आहे. मोठ्या भांडवलदारांच्या नियंत्रणातील मीडिया युद्धाचे ढोल बडवत आहे व मोठमोठ्याने बढाया मारत आहे की पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यावर ’’पाकिस्तानास यथायोग्य उत्तर दिले गेले आहे’’.

काश्मीरमध्ये दहशतीच्या मोहिमेस खूप वाढवले गेले आहे. बी.एस.एफ., सी.आर.पी.एफ. व आई.टी.बी.पी.च्या हजारों सैनिकांना विमानातून श्रीनगरला धाडलेले आहे. 22 फेब्रुवारीच्या रात्री श्रीनगरात शेकडो राजनैतिक कार्यकत्यांना अटक करण्यात आले. हुर्रियत काँफरंसच्या प्रमुख नेत्यांना काश्मीर राज्याच्या बाहेरील तुरुंगात डांबण्यात येत आहे.

14 फेब्रुवारीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्ण देशात खूपच जास्त तणाव पसरवण्यात येत आहे. सत्ताधारी पार्टीद्वारा प्रोत्साहित गुंड देशात जागोजागी, खास करून काश्मीरी लोकांवर व इतर मुसलमान लोकांवरही हल्ले करत आहेत. प्रमुख “विरोधी पक्षाने” ह्या हल्ल्यांबद्दल मौन धारण केले आहे व काश्मीरमध्ये किंवा पाकिस्तानविरुद्ध़ सरकार जी काही पाऊले उचलू इच्छितंय त्यांना ते पूर्ण समर्थन देत आहेत.

देशभरात लोकं चिंतित आहेत की हिंदुस्थानी राज्य आता ह्यापुढे काय करणार आहे. देशाला पाकिस्तानच्या विरोधात पूर्ण युद्धात ढकलले जाणार आहे का? मुसलमानांना निशाणा बनवून सांप्रदायिक कत्तल आयोजित केली जाईल का? काश्मीरमध्ये जास्त रक्तपात करण्यात येईल का?

काश्मीरच्या लोकांचे वाढते दमन व सीमा-पार हवाई हल्ल्यांना ’’दहशतवाद मिटवण्याच्या’’ व पाकिस्तानचा बदला घेण्याच्या बहाण्याने रास्त ठरवण्यात येत आहे. जर सर्व घटनांचे थंड डोक्याने परिक्षण व विश्लेषण केले तर हे स्पष्ट होईल की सरकार जी पाऊले उचलत आहे, त्यांनी ना कश्मीरची समस्या सुटेल व ना दहशतवादाचा अंत होईल.

काश्मीरची समस्या

काश्मीरची समस्या एक राजनैतिक समस्या आहे. ही हिंदुस्थानी संघराज्यातील काश्मीरी लोकांच्या अपूर्ण राहिलेल्या आकांक्षांची समस्या आहे. हिंदुस्थानी राज्याने जर त्यांच्या ह्या भावनांना मान्यता दिली व समस्या सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर काश्मीरी लोकांच्या व देशातील सर्व लोकांच्या हितार्थ समस्या सोडवणे शक्य होईल. परंतु जोपर्यंत हिंदुस्थानी राज्य तिला ’’कायदा व सुव्यवस्थे’’ची समस्या मानून लाठ्या-गोळ्यांचा वापर करत राहील, तोपर्यंत काश्मीरच्या जखमांमधून रक्त वाहतच राहील व देशातील इतर भागांतदेखिल शांती व प्रगती शक्य होणार नाही.

काश्मीर व काश्मीरी लोकांच्या समस्येच्या बाबतीत नरेंद्र मोदी सरकार त्याच घातक रस्त्यावर तेज गतीने पुढे जात आहे, ज्याच्या वर गेल्या 30पेक्षा जास्त वर्षांपासून हिंदुस्थानी राज्य जलद गतीने जात आहे. कश्मीरमध्ये सेनेला व अर्ध-सैनिक बलांना हा आदेश दिला जातोय की तेथील जनतेशी एका कब्जाकारी सैन्यबलाप्रमाणे वागा, त्या लोकांना पूर्णपणे दडपून टाका. देशांतील इतर भागातील लोकांना सांगण्यात येतं की काश्मीरी लोक ’’दहशतवादी आहेत, ’’फुटिरवादी’’ आहेत, ’’पाकिस्तानी एजंट’’ आहेत व राज्याने त्यांना बर्बरतेने दडपले पाहिजे. ह्या धोरणाचा परिणाम झालाय की सर्व काश्मीरी लोक स्वतःला हिंदुस्थानी संघराज्यापासून पूर्णतः अलग समजू लागल्येत.जेव्हा जेव्हा सेना एन्काउंटरमध्ये कुठल्याही तरुणाचा खून करते, तेव्हा हजारोंच्या संख्येने कश्मीरी लोकं बाहेर पडून, भयानक राजकीय दहशतीला न घाबरता त्याचा निषेध करतात. ज्यांचे काम आहे बाहेरील शत्रूंच्या हल्ल्यांपासून आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणे, असे आपले लाखो-लाखो सैनिक आज आपल्याच लोकांच्या विरुद्ध एका कधीही न संपणाऱ्या युद्धात अडकले आहेत.

हिंदुस्थानी सेनेच्या काही सेवानिवृत्त कमांडरांनी सरळ सरळ म्हटले आहे की काश्मीरच्या समस्येवर कुठलाही सैनिकी उपाय होऊ शकत नाही. ह्या राजनैतिक समस्येवर राजनैतिक उपायाच्या गरजेवर त्यांनी जोर दिला आहे. परंतु आजपर्यंत सर्व सरकारांनी त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं नाहीय.

काश्मीर केवळ एक जमिनीचा तुकडा नसून एक जीताजागता समाज आहे

जेव्हा आपले राज्यकर्ते घोषित करतात की ’’काश्मीर आमचा आहे’’, पण त्याच बरोबर काश्मीरी लोकांवर ’’पाकिस्तानी एजंट’’ असल्याचा शेरा मारतात व त्यांना सेनेच्या पायांखाली दडपून ठेवतात, तेव्हा त्यांचे विचार व आचरण वसाहतवाद्यांसारखे व साम्राज्यवाद्यांसारखे असते. राज्यकर्त्यांना केवळ कश्मीरच्या जमीनीशी व संसाधनांशी मतलब आहे, काश्मीरच्या लोकांशी नव्हे.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत, आपण हिंदुस्थानी लोकांनी स्वतः आपल्या देशाचे मालक बनण्यासाठी वसाहतवाद्यांचे राज्य खतम करण्यासाठी लढाई केली होती. मात्र आझादीच्या 70 वर्षांनंतरही आपण कामगार, शेतकरी, महिला, नौजवान व आदिवासी लोक खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाहीयत. मूठभर मोठे भांडवलदार त्यांच्या विश्वासु पार्ट्यांमार्फत आपल्यावर राज्य करतात. अतिशय निर्दयतेने आपले शोषण-दमन होते. आपले राज्यकर्ते धर्म, जात, भाषा व इतर सर्व आधारांवर आपल्यांत फूट पाडून, खऱ्या आझादीसाठीच्या, देशाचे मालक बनण्यासाठीच्या आपल्या संघर्षाला दडपून टाकतात.

काश्मीरची लोकं त्याच आझादीसाठी संघर्ष करताहेत जिच्यासाठी देशातील इतर भागातील कामगार, शेतकरी, महिला, नौजवान व आदिवासी लोकं संघर्ष करताहेत. सत्ताधारी वर्ग व त्याची सरकारं अतिशय अपराधी प्रकारे काश्मीरी लोकांच्या संघर्षावर ’’राष्ट्र-विरोधी’’ असल्यावा शेरा मारतात. वेगवेगळ्या वेळी राज्यकर्त्यांनी अगदी अशाच प्रकारे पंजाब, साम, तामिळनाडू, इ.च्या लोकांच्या संघर्षांवर ’’राष्ट्र-विरोधी’’ असल्याचा शेरा मारला आहे. आपण कश्मीरी लोकांच्या संघर्षाकडे आपल्या शोषकांच्या व दमनकर्त्यांच्या चष्म्याने बघता कामा नये. काश्मीर केवळ एक भूखंड नसून एक समाज आहे. काश्मीरची लोकं म्हणजे आपले भाऊ, आपल्या बहिणी व आपली मुले आहेत. आपले भविष्य ठरवण्याचे काश्मीरी लोकांचा संघर्ष म्हणजे आपला संघर्ष आहे.

आपले राज्यकर्ते कामगार व शेतकऱ्यांच्या डोक्यांत हा खोटा प्रचार भरत राहतात की काश्मीरची समस्या पाकिस्तानने निर्मिलेली आहे. राज्यकर्ते दावा करतात की काश्मीरमध्ये घुसखोरांना पाठवण्यापासून पाकिस्तानला जर रोखण्यात आले तर काश्मीरमध्ये कोणतीच समस्या उरणार नाही.

हा अतिशय दिशाभूल करणारा प्रचार आहे. तो ह्या सत्यास लपवतो की काश्मीरच्या समस्येचे प्रमुख कारण आहे आपल्या सत्ताधारी वर्गाचे काश्मीरच्या बाबतीतले धोरण. काश्मीरच्या समस्येत पाकिस्तानची भूमिका दुय्यम आहे.

हिंदुस्थानी राज्याने काश्मीरी लोकांची व देशातील सर्व लोकांची सुबत्ता व सुरक्षा जर खरोखर सुनिश्चित केली तर बाहेरची कोणतीही शक्ती हिंदुस्थानी राज्याविरुद्ध बंड भडकवू शकणार नाही. उलट सर्वसाधारण कश्मीरी लोकंच गडबड पसरवणाÚयांना ताबडतोब पकडून अधिकाऱ्यांच्या हवाली करतील.

आपले राज्यकर्ते नेहमीच बढाया मारतात की त्यांनी पाकिस्तानला तोडून बांग्लादेशची निर्मिती केली. परंतु ते त्या इतिहासापासून काहीच शिकले नाहीत. पाकिस्तानापासून बांग्लादेश अलग होण्याचे मुख्य कारण हे होते की बांग्लादेशच्या लोकांनी पाकिस्तानी सत्ताधारी वर्गाद्वारे होणाऱ्या आपल्या राष्ट्रीय दमनाविरुद्ध बंड केले. पाकिस्तानने जर बांग्लादेशच्या लोकांच्या आकांक्षा पुÚया केल्या असत्या तर पाकिस्तानला तोडण्यात हिंदुस्थान कधीच सफल होऊ शकला नसता.

दहशतवादाविरुद्ध आपल्या सरकारची लढाई एक ढोंग आहे

परत परत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत देशातील लोकं अतिशय चिंतित आहेत. आपले राज्यकर्ते देशात होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यास पाकिस्तानवर दोषी होण्याचा शिक्का मारतं. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा म्हणून एक व्हिडियो दाखवला जात आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की तो एक बनावटी व्हिडियो आहे व ह्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी राज्याचा कुठलाही हात असण्याचे नाकरले आहे. सत्य काय आहे?

दहशतवाद हे बहुसंख्य भांडवलदारी राज्यांच्या धोरणाचं एक हत्यार आहे. वेगवेगळी राज्ये आपआपल्या देशांच्या अंतर्गत व दुसÚया देशांतदेखिल दहशतवादी हल्ले संघटित करतात व त्यांच्या आधारे स्वतःच्या देशात राज्याच्या दहशतवादास व दुसÚया देशांवर हल्लेखोर युद्धांना योग्य ठरवतात. ह्या किंवा त्या दहशतवादी गटाच्या नावाखाली असे हल्ले करण्यात येतात. अमेरिकाने जसे सिरियामध्ये केले, त्या प्रकारे बनावटी व्हिडियोंच्या आधारे सैनिकी हस्तक्षेपास योग्य ठरवले जाते. पूर्ण जगात अमेरिका हे दहशतवादाचे मूळ आहे. हे सर्वश्रुत आहे की अफगाणिस्तान व मध्य आशियातील स्वतःच्या साम्राज्यवादी आकांक्षांपायी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये सशस्त्र आतंकवादी गटांना संघटित केले व त्यांना पैसे, प्रशिक्षण व शस्त्रे दिली. अमेरिका ह्या गटांद्वारे वेगवेगळ्या देशांच्या सरकारांना अस्थिर बनवते, तसेच एकमेकांचे शेजारी असलेल्या देशांमध्ये युद्ध भडकवते व दुसÚया देशांत हस्तक्षेप करून सत्ता परिवर्तन करण्याचे समर्थन करते.

दक्षिण आशियावर आपले वर्चस्व निश्चित करण्यासाठी अमेरिकन साम्राज्यवाद नेहमीच हिंदुस्थानाला व पाकिस्तानाला एकमेकांविरुद्ध भिडवत राहिला आहे. अमेरिकेची इच्छा आहे की हिंदुस्थान व पाकिस्तान नेहमीच एकमेकांविरुद्ध लढत राहिले पाहिजेत व तिला त्यांच्यामध्ये शांतीदूत असल्याचे नाटक करत राहता आले पाहिजे. अमेरिकेने गेल्या दोन दशकांत हिंदुस्थानाला व पाकिस्तानाला एकमेकांविरुद्ध लढवण्याकरता परत परत दहशतवादाचे साधन वापरले आहे. आजही अमेरिका तेच करत्येय.

2001मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तावर कब्जा करण्याकरता आपल्या सेनेस धाडले होते, तेव्हा पाकिस्तानवर युद्धाचे समर्थन करण्यासाठी दबाव आणण्याकरता तिने हिंदुस्थानाचा वापर केला होता. संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला बहाणा बनवून, हिंदुस्थानी सेनेला पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केले गेले होते. जिथून अफगाणिस्तानावर सहज हल्ला करणे शक्य होते अशा आपल्या पश्चिमी सीमेस अमेरिकन सेनेसाठी खोलण्याकरता पाकिस्तानला मजबूर केले गेले होते.

ह्या वेळी इतर देशांना अस्थिर बनवण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचे एक मुख्य निशाणा इराण आहे. हे लक्ष्य साधण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी गटांचा वापर अमेरिका करत आहे. आपल्या इराणविरोधी मोहिमेत पाकिस्तानला शामिल करून घ्यायची अमेरिकेची इच्छा आहे. हे करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव घालण्याकरता पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याद्वारे अमेरिका हिंदुस्थानाचा वापर कदाचित करत असेल.

आपल्या राज्यकर्त्यांना चांगले माहित आहे की अफगाणिस्तान, इराण, सिरिया व इतर देशांमध्ये आपल्या धोरणांसाठी साधन म्हणून अमेरिकेने दहशतवादाचा वापर केला आहे. परंतु हिंदुस्थानी राज्याने कधीच, इतर देशांच्या विरुद्ध अमेरिकन साम्राज्यवादाचा व त्याच्या दहशतवादी कृतींचा विरोध केलेला नाहीय. उलट आपले राज्यकर्ते अमेरिकेबरोबर आपले रणनैतिक सैनिक संघटन अधिक मजबूत करत आले आहेत. ह्यावरून स्पष्ट होते की जगात कुठेही दहशतवादाचा अंत करणे, हा हिंदुस्थानी राज्याचा इरादा नाहीय.

हिंदुस्थानी राज्याचे ’’दहशतवादावर युद्ध’’ म्हणजे केवळ लोकांना शेंड्या लावण्यासाठी एक ढोंग आहे. आपल्या राज्यकर्त्यांद्वारा पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध करण्याचे ढोल पिटण्याचा दहशतवाद खतम करण्याशी काहीही संबंध नाहीय.

निष्कर्ष

पाकिस्तानविरुद्ध लढाईत आपल्या दोन्ही देशांमधील नागरिक व सैनिक आपल्या आपल्या अमूल्य जिवांस मुकतील. ह्या वेळीस पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याचा जोरजोरात प्रचार करणाÚया आपल्या देशाच्या राजयकर्त्यांना आपल्या लोकांच्या व आपल्या सैनिकांच्या जिवांची काहीच पर्वा नाहीय. युद्धाविषयी लोकांना भडकावून, आपले राज्यकर्ते देशाच्या कामगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना व नौजवानांना आपल्या अधिकारांसाठी संघर्षाच्या रस्त्यापासून दूर करून आपल्या मागे संघटित करू इच्छितात. त्यांच्या ह्या जाळ्यात आपण फसता कामा नये.

आपण हिंदुस्थानी लोकांनी ही मागणी केली पाहिजे की सरकारने कोणतीही पूर्वअट न घालता दहशतवादाच्या सहित सर्व विवादास्पद मुद्द्यांवर पाकिस्तान बरोबर बातचीत केली पाहिजे. कोणत्याही बाहेरील शक्तींच्या ढवळाढवळीविना आपल्या परस्परातील समस्या हिंदुस्थानने व पाकिस्तानने स्वतः सोडवणे, हे दोघांच्याही हिताचे आहे.

काश्मीरची समस्या एक राजनैतिक समस्या आहे व तिच्यावर राजनैतिक उपायच असू शकतो. आपण सर्व लोकांनी काश्मीरच्या समस्येवर ’’सैनिकी उपाया’’चा विरोध केला पाहिजे व पाकिस्तानविरुद्ध युद्धखोरीचा व युद्धाचा विरोध केला पाहिजे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.