गदरींच्या मार्गावर चालण्याचा अर्थ आहे हिंदुस्थानच्या नवनिर्माणासाठी संघर्ष करणे!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या 38व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पार्टीचे महासचिव, कॉम्रेड लाल सिंह यांचे भाषण

साथींनो,

आपण आपल्या पार्टीचा 38वा वर्धापन दिन अशा वेळी साजरा करत आहोत ज्यावेळी सर्व देशांतील लोकं अत्यंत गंभीर स्थितीचा सामना करत आहेत. रोजगाराची असुरक्षितता असहनीय होत आहे. संपूर्ण विश्वात अराजकता आणि हिंसा वाढत चालली आहे. वंशविद्वेष, सांप्रदायिकता, विशेष जाती आणि समुदाय, राष्ट्र आणि राष्ट्रीयता ह्यांचे दमन – हे सारेच दिवसेंदिवस, अधिकाधिक भयंकर होत आहे.

सर्व भांडवलदारी देशांत, आणि आपल्या देशात देखील, राज्यकर्ते तऱ्हेतऱ्हेचे खोटे प्रचार पसरवून हे लपविण्याचा प्रयत्न करत आहेत की लोकांच्या समस्यांवर त्यांच्याकडे कुठलाही उपाय नाहीय. ते या गोष्टीवर आपापसांत कुत्र्या-मांजरांसारखे भांडत आहेत की कोण लोकांना सर्वांत जास्त लुटेल. विविध साम्राज्यवादी ताकदी आपापसांत स्पर्धा करत आहेत, एकमेकांविरुद्ध खुले आणि गुप्त, आर्थिक आणि सैनिकी लढाया लढत आहेत.

आजही आपल्या देशात साम्राज्यवादी लूट, भांडवलदारी शोषण, जातीवादी भेदभाव आणि प्रत्येक प्रकारच्या शोषणापासून मुक्तीसाठी अगदी तसेच संघर्ष चालू आहेत, ज्याबद्दल गदरींनी 100 वर्षांपूर्वी सांगितले होते. गदरींनी घोषित केले होते की आमचा संघर्ष तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आपल्या देशाच्या श्रमाचे आणि संसाधनांचे शोषण आणि लूट होत राहील, मग लुटेरे विदेशी भांडवलदार असोत की हिंदुस्थानी किंवा ह्या दोघांचे संघटन. कोणीही या गोष्टीस नाकारू शकत नाही की आजही आपल्या श्रम आणि संसाधनांची लूट होत आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था संकटग्रस्त साम्राज्यवादी व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त जोडली जात आहे आणि अडकत जात आहे.

जे कुठले सरकार आले आहे, ते खाजगीकरण आणि उदारीकरण ह्यांमार्फत जागतिकीकरणाचा कार्यक्रम लागू करत राहिली आहे. ह्या कार्यक्रमाचा उद्देश्य आहे की टाटा, बिर्ला, अंबानी आणि इतर मक्तेदार भांडवलदार घराण्यांसाठी आणि त्यांच्या विदेशी सहयोगींसाठी अधिकतम नफा निश्चित करणे. ह्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे कामगारांचे अधिकाधिक शोषण करणे, शेतकऱ्यांना भरपूर लुटणे, आपल्या नैसर्गिक संसाधनांना लुटणे आणि जनतेच्या बचतीतील धनास लुटणे. आज ह्या समाजविरोधी कार्यक्रमाचा लोकं कडाडून विरोध करत आहेत.

उद्योग आणि सेवांच्या विभिन्न क्षेत्रांमध्ये कामगारांची विरोध संघर्षे वाढत आहेत. 2018मध्ये आपल्या उत्पादनांसाठी स्थायी आणि लाभकारी किंमतींच्या मागण्या घेवून व मागील कर्जमाफींच्या मागण्या घेवून देशभरांतील शेतकरी संघटनांची आपण अभूतपूर्व एकता बघितली आहे. महिला कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध जोरदार संघर्ष करत आहेत. करोडो युवक-युवती रोजगारांच्या मागण्या घेवून रस्त्यावर उतरत आहेत.

2014मध्ये मोदीच्या नेतृत्वाखाली भाजपाचे केंद्र सरकार बनले होते. त्याने भ्रष्टाचार नष्ट करण्याचे वचन दिले होते. पंतप्रधान मोदीने उत्पन्नाच्या असमानतेला घटविण्यासाठी आणि सर्वांना विकास आणि रोजगार देण्याचेही वचन दिले होते. परंतु जास्तीत जास्त लोकं हे समजायला लागली आहेत की हे भाजप सरकार मक्तेदारी भांडवलदारी घराण्यांच्या सेवेत, त्याच पहिल्यापासून चालत आलेल्या समाजविरोधी कार्यक्रमाला लागू करत आहे. सुधारणेच्या नावाखाली त्याने कामगारांच्या अधिकारांना हिरावून घेणारे कायदे पारित केले. त्यांनी कृषी व्यापाराचे उदारीकरण करणारी पावलं कायम ठेवली आहेत, ज्यांच्यामुळे शेतकरी आणखीच जास्त प्रमाणांत कर्जात बुडत आहेत आणि त्यांच्या रोजगाराची असुरक्षितता वाढतच जात आहे. त्यांनी भारतीय रेल्वे व इतर सार्वजनिक सेवा, शिक्षण व आरोग्य सेवा ह्यांचे खाजगीकरण अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्यांनी विदेशी भांडवलदारी कंपन्यांसाठी बरीच नवनवीन क्षेत्रे खुली केली आहेत ज्यांमध्ये ते भांडवल गुंतवू शकतील आणि आपल्या कामगारांच्या स्वस्त श्रमाचे अतिशोषण करू शकतील.

काँग्रेस पार्टी भाजपवर असा आरोप ठेवते की ती “सुटाबुटाची सरकार” चालवत आहे, म्हणजेच टाटा, बिर्ला, अंबानी आणि इतर धनवान मक्तेदारी भांडवलदारी घराण्यांच्या सेवेमध्ये सरकार चालवत आहे. भाजप काँग्रेसवर हा आरोप लावते की एक भ्रष्ट परिवार त्या पार्टीचे नेतृत्व करत आहे. खरे तर हे आहे की दोन्ही पार्ट्या मक्तेदार भांडवलदारांद्वारा लुटीचे समर्थन करत आल्या आहेत व तिला सुकर बनवित आल्या आहेत आणि ह्याच संकुचित हेतूंची पूर्तता करण्यासाठी धर्म आणि जात ह्यांचा वापर करून लोकांमध्ये आपापसात फूट पाडत आल्या आहेत. संपूर्ण व्यवस्था अशाच प्रकारे काम करते जेणेकरून अतिधनवान अल्पसंख्यांक, कष्टकरी जनसमुदायाला विभागून त्यांच्यावर राज्य करू शकतील ह्या पार्ट्या म्हणजे लालची मक्तेदारी भांडवदारी घराण्यांच्या नेतृत्वाखाली भांडवलदारी वर्गाचे केवळ विविध प्रबंधक टीमच आहेत.

ना केवळ संसदेच्या प्रमुख पार्ट्या तर राज्याचे सर्व अंग, कार्यकारिणी, विधायकी आणि न्यायपालिका, सर्व वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत. लाच देणे-घेणे हा ह्या राज्यतंत्राचा अविभाज्य हिस्सा आहे.

शासक वर्ग लोकांच्या ज्वलंत आर्थिक समस्यांचे निवारण करण्यात असफल आहे. म्हणून तो सांप्रदायिक आणि द्वेषाने भरलेली हिंसा, अल्पसंख्यांक व खालील जातींचे शोषण, उग्र राष्ट्रवादी प्रचार आणि पाकिस्तानवर “सर्जिकल स्ट्राइक” सारख्या पावलांचा आश्रय घेत आहे.

दररोज देशात कुठे ना कुठे कोणत्यातरी निर्दोष माणसावर किंवा काही निर्दोष लोकांवर हल्ला केला जातो आणि त्यांना मारून टाकण्यात येते. कधी हे “गो रक्षे”च्या नावावर केले जाते, तर कधी “इस्लामी आतंकवादीं”चा किंवा “लव-जिहाद”चा सामना करण्याच्या नावावर. आपल्या अधिकारांसाठी, न्यायासाठी, शोषण-दमन आणि भेदभावमुक्त हिंदुस्थानासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांवर “राष्ट्र-विरोधी” आणि “आतंकवादी” असल्याचा शेरा मारला जातो. त्यांचा खून केला जातो, त्यांना तुरुंगात डांबून तडपवलं जातं.

दिवसेंदिवस हे साफ होत आहे की हा भांडवलदारी वर्ग समाजावर शासन करण्याच्या लायकीचा नाहीय. लोकांमध्ये फूट पाडून ठेवण्याकरिता व त्यांची दिशाभूल करण्याकरिता तो आपल्या भूतकाळातील, वसाहतवादी व वसाहतवादपूर्व काळातील सर्वात मागासलेल्या व बर्बर तत्वांना व इसमांना पुढे आणतो. आपली वर्गसत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्याला असे करावेच लागते. ह्यातून निघण्याचा काय मार्ग आहे? ह्या विनाशकारी मार्गाला कसे रोखले जाऊ शकते? पुढे जाण्याचा कुठला मार्ग आहे? आज संघर्ष करणाऱ्या सर्व लोकांच्या मनात हाच ज्वलंत प्रश्न आहे.

साथींनो,

हिंदुस्थानात ब्रिटीशांविरुद्ध वसाहतवादविरोधी संघर्षासमोर दोन मार्ग होते – एक क्रांतीचा मार्ग आणि दुसरा तडजोडीचा मार्ग. हिंदुस्थान गदर पार्टी कामगार आणि शेतकऱ्यांची पार्टी होती. तिने क्रांतिकारी मार्ग स्वीकारला. हिंदुस्थान गदर पार्टीचे राजनैतिक लक्ष्य होते वसाहतवादी आणि साम्राज्यवादी शासनाला उलथून, कामगार आणि शेतकरी ह्यांची हुकुमत प्रस्थापित करणे. काँग्रेस पार्टी, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, आर.एस.एस. आणि भांडवलदारी व जमीनदारांच्या दुसऱ्या पार्ट्या आणि संघटनांनी वसाहतवादी आणि साम्राज्यवादी व्यवस्थेबरोबर तडजोड करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांनी साम्राज्यवादी व्यवस्थेशी नातं तोडण्याच्या मार्गाचा विरोध केला होता. त्यांनी वसाहतवादींच्या शासनाच्या जागी हिंदुस्थानी भांडवलदारांची हुकूमत बसविण्यासाठी काम केले. हिंदुस्थानी भांडवलदार राज्यकर्त्यांनी साम्राज्यवादी व देशातील सर्व मागासलेल्या शक्तींशी गठबंधन केले.

आजही आपल्या समोर केवळ दोनच मार्ग आहेत. एक आहे गदरींचा मार्ग. ह्याचा अर्थ आहे साम्राज्यवादी व्यवस्था आणि पूर्ण वसाहतवादी वारशाशी पूर्णपणे नातं तोडून टाकणं आणि हिंदुस्थानी समाजाची नवी घटस्थापना करणं. ह्याचा अर्थ आहे भांडवलदारांची हुकुमत नष्ट करून, त्याजागी कामगार- शेतकऱ्यांची हुकूमत स्थापित करण्याच्या राजनैतिक लक्ष्याच्या सभोवती कामगार वर्ग आणि सर्व शोषित जनसमुदायास एकजूट करणे. दुसरा मार्ग आहे वर्तमान व्यवस्थेबरोबर तडजोड करण्याचा मार्ग, म्हणजे ह्याच व्यवस्थेमध्ये कुठल्यातरी तथाकथित धर्मनिरपेक्ष युतीच्या किंवा भ्रष्टाचारविरोधी युतीच्या कुठल्यातरी तथाकथित विकल्पाच्या शोधात राहणे. दुसऱ्या शब्दांत ह्याचा अर्थ आहे “राज्यघटनेची रक्षा” करण्याच्या नावाने भांडवलदारांची हुकूमत आणि त्यांच्या राज्याचे संरक्षण करणे.

आज हिंदुस्थानी समाजात ज्या काही समस्या आहेत, त्यांचे मूळ ह्या गोष्टीत आहे की 1947 मध्ये जेव्हा सत्तेचे हस्तांतरण झाले होतं, तेव्हा वसाहतवादी-साम्राज्यवादी व्यवस्थेबरोबर नातं तोडलं गेलं नव्हतं. 1947 मध्ये वसाहतवादाबरोर आणि साम्राज्यवादाबरोबर तडजोडीचा सौदा केला गेला होता आणि त्याला सांप्रदायिकतेच्या आधारावर देशाला विभागून लागू केले गेले होते. देशाच्या विभागणीबरोबर 15 लाखांहून जास्त पुरुषांचा, महिलांचा, आणि मुलांचा जनसंहार केला गेला होता आणि 1 करोडहून जास्त लोकांचे बलपूर्वक विस्थापन व स्थलांतर केले गेले होते.

1947 मध्ये हिंदुस्थानी भांडवलदारांनी साम्राज्यावादाबरोबर केलेल्या तडजोडीमुळे वसाहतवादी काळानंतर हिंदुस्थानात त्या साऱ्या गोष्टी कायम राहिल्या ज्या वसाहतवादी काळात होत होत्या. फरक केवळ एवढाच होता की गोऱ्या लोकांची जागा हिंदुस्थानातील वरच्या वर्गाने घेतली. हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या आपापसांतील वैर्याला कायम राखण्यासाठी बऱ्याच संसाधनांना खर्च केले जाते. शोषणाची आणि लुटीची अर्थव्यवस्था मेहनती जनसमुदायाच्या जीवनाला उध्वस्त करून टाकत आहे. स्वतंत्र हिंदुस्थानात आजही तीच जुनी राजनैतिक व्यवस्था कायम आहे जी विश्वस्तता, संसदेचे सार्वभौम, राज्याचे सर्वतोपरी अधिकार आणि ब्रिटीश साम्राज्यवादी भांडवलदारांच्या दुसऱ्या विचारांवर आधारित आहेत.

1950 च्या हिंदुस्थानी राज्यघटनेचा अधिक हिस्सा ब्रिटीश संसदेद्वारा पास केल्या गेलेल्या 1935च्या भारत सरकार अधिनियमाची प्रतिलिपी होती. हिंदुस्थानच्या गद्दार मोठ्या भांडवलदारांनी हा निर्णय घेतला की स्वतंत्र हिंदुस्थानात ते सत्तेच्या वसाहतवादी संस्थानांनाच कायम ठेवतील. ह्यास उचित ठरविण्यासाठी त्यांनी त्याच सिद्धांतांचा आधार घेतला ज्यांना वसाहतवादींनी आपल्या शोषण-लुटीच्या सत्तेला योग्य ठरविण्यासाठी प्रस्तुत केले होते. ह्याचा परिणाम असा आहे की गेलेल्या काळाची प्रत्येक मागासलेली गोष्ट आजही चालू आहे आणि वाईटाहूनही अधिक वाईट होत जात आहे. प्रत्येक निवडणूक अभियानात धर्म आणि जातीची ओळख पुढे ठेवली जाते. आता तर ह्या ना त्या नेत्याचे गोत्र किंवा हनुमानाच्याही जातीच्या गोष्टी उकरून काढल्या जातायत.

काँग्रेस पार्टी आणि भाजप, दोन्हीही ब्रिटीश वसाहतवादींकडून वारश्यात मिळालेल्या ह्या राज्यतंत्राला आणि शासनाच्या पद्धतीला लागू करण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्या दोन्हीही पार्ट्या भांडवलदारी व्यवस्था आणि वाढत्या साम्राज्यवादी लुटीच्या व्यवस्थेचे संरक्षण करतात. त्या दोन्हीही पार्ट्या ‘फोडा आणि राज्य करा’ ह्या वसाहतवादी कार्यनीतीचा वापर करतात.

भाजपा “हिंदू अस्मिता” आणि हिंदुस्थानी राष्ट्रवाद ह्यांची नावं घेवून सांप्रदायिक हल्ले आयोजित करते आणि लोकांना फोडण्याचे राजकारण चालवते . काँग्रेस पार्टी धर्मनिरपेक्षतेच्या व हिंदुस्थानी राष्ट्रवादाच्या झेंड्याखाली तेच राजकारण करते. खरे हे आहे की ह्या दोन्ही पार्ट्या एकाच वर्गाच्या हितासाठी काम करतात. ह्या दोन्ही पार्ट्या एकच राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कार्यक्रम लागू करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

गेल्या 71 वर्षांपासून साम्राज्यवादाबरोबर करार करण्याच्या आणि संकटग्रस्त विश्व भांडवलदारी व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त जोडण्याच्या मार्गावर हिंदुस्थान चालत आलेला आहे. राज्य करणारा हिंदुस्थानी भांडवलदार वर्ग स्वतःच एक साम्राज्यवादी ताकद बनण्याच्या आपल्या मनसुब्यांना पूर्ण करण्यासाठी, अमेरिका आणि इतर मोठ्या ताकदींबरोबर मिळून काम करतोय आणि त्यांच्याशी स्पर्धादेखील करतोय. कामगार वर्ग, शेतकरी आणि इतर मेहनती लोकांना हा मार्ग अवलंबून कुठलाही फायदा झाला नाहीय. भांडवलदारी राज्याला कायम ठेवून सामान्य जनतेला कुठलाही फायदा झाला नाहीय. अस्तित्वात असलेली राज्यघटना आपल्या जनतेचे शोषण-दमन करण्यास आणि देशाला लुटणाऱ्या राजनैतिक सत्तेला वैधता देते. तिचे संरक्षण करण्यास कुठलेच औचित्य असू शकत नाही.

आपण कामगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना, आणि युवक-युवतींना वर्तमान राज्य आणि वर्तमान राजनैतिक सत्तेचे संरक्षण करून कुठलाही फायदा होणार नाही कारण ही सत्ता आणि हे राज्य आपल्या अधिकारांचे संरक्षण करत नाही. आपल्यासाठी हेच फायद्याचे ठरेल की आपण गदरींच्या लक्ष्यासाठी संघर्ष करू, म्हणजे त्या नव्या हिंदुस्थानी समाजाचे, नवी राजनैतिक सत्तेचे आणि नव्या राज्याचे बीज पेरू जे सगळ्यांची सुरक्षितता आणि सुख सुनिश्चित करेल. त्या नव्या राज्याची एक नवी राज्यघटना असेल, जी मानवाधिकारांचा व लोकशाही अधिकारांचा आणि हिंदुस्थानी संघाच्या सर्व घटकांच्या राष्ट्रीय अधिकारांचा आदर करेल आणि त्यांना सुरक्षित करेल. आजच्या ह्या अमानवीय भांडवलकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या जागेवर एका मानवकेंद्रित अर्थ व्यवस्थेची गरज आहे.

आपल्याला अशा एका राज्यघटनेसाठी संघर्ष करावा लागेल, जिच्यात अधिकारांची आधुनिक परिभाषा असेल. ह्या परिभाषेनुसार अधिकार वस्तुगत असतात, कोणाच्या मर्जीनुसार नव्हेत व राज्याचे कर्तव्य आहे की त्यांचे कधीही उल्लंघन होणार नाही ह्याची हमी देणे. मनुष्य म्हणून प्रत्येक व्यक्तीचे काही अधिकार असतात. मानवाधिकारांत सदसद्विवेक बुद्धीचा अधिकार आणि सुरक्षित रोजगाराचा अधिकार ह्यांचाही समावेश होतो. हिंदुस्थानाच्या प्रत्येक प्रौढ नागरिकाला बरोबरीचे अधिकार असले पाहिजेत. प्रत्येक राष्ट्र आणि राष्ट्रीयतेचे आपापले विशिष्ट अधिकार आहेत. महिला, पगारी कामगार, इत्यादी सर्वांचेच आपापले विशिष्ट अधिकार आहेत. सर्व अधिकारांना राज्यघटनेत सुनिश्चित केले गेले पाहिजे. ह्या अधिकारांच्या संरक्षणाखातर राज्य जबाबदार असले पाहिजे.

1857 मध्ये हिंदुस्थानच्या सर्व धर्म आणि जातीच्या लोकांनी एकजूट होऊन घोषित केले होते की ‘आम्ही ह्याचे मालक, हिंदुस्थान आमचा!’ 20व्या शतकाच्या प्रारंभी गदरी आणि त्यांच्यानंतर बनलेल्या संघटनांनी जे 1857मध्ये उभारून आले होते त्याच नव्या हिंदुस्थानच्या लक्ष्याला आणखीच विकसित केले होते. ब्रिटीश वसाहतवादींनी आधीच्या काळातील प्रत्येक मागासलेल्या आणि दमनकारी रुढींचा वापर करून आणि ‘फोडा आणि राज्य करा’च्या भयंकर पद्धतीचा वापर करून, तशा नव्या हिंदुस्थानाला उभारण्यापासून रोखले होते. त्यांनी सांप्रदायिकतेवर आधारित राज्य निर्माण केले. त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा प्रचार केला मात्र गुप्त रूपाने त्या सर्व धार्मिक उग्रवादीनां प्रश्रय दिला जे प्रत्येक क्षणी सांप्रदायिक विष उगाळत राहत होते. त्यांनी निवडणुकीची अशी प्रक्रिया प्रस्थापित केली जिच्यामार्फत पैसेवाल्या वर्गांच्या आणि निवडक जातींच्या खास लोकांना सर्व प्रांतांतील विधायक मंडळात समाविष्ट केले जाऊ शकत होते. त्यांनी पैसेवाल्या वर्गातील वेगवेगळ्या गटांच्या पार्ट्या बनवल्या, ज्या निवडणुकीत भाग घेऊन वसाहतवादी राज्याचा हिस्सा बनतील. स्वतंत्र हिंदुस्थानात आजही हीच व्यवस्था आणि राजकीय प्रक्रिया कायम आहे.

विशेष गटांना सत्तेमध्ये सामील करण्याच्या ह्या व्यवस्थेला ना तर काँग्रेस बदलू शकते आणि ना भाजपा, कारण हे ह्या दोन्ही पार्ट्यांच्या हिताचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ही व्यवस्था ह्या पार्ट्यांना धनसमर्थन देणाऱ्या मक्तेदार भांडवलदारांच्या हिताचे आहे.

“घटना वाचवा” हा नारा भांडवलदारी हुकुमशाही आणि साम्राज्यवादी लुटीच्या वर्तमान राज्याचे संरक्षण करण्याचा नारा आहे. मानवाधिकारांना आणि लोकशाही अधिकारांना धोका केवळ भाजप पासून आहे का? नाही, हा धोका ह्यासाठी आहे कारण वर्तमान राज्य मक्तेदार भांडवलदार घराण्यांच्या पुढाकारात भांडवलदार वर्गाच्या राज्याचे साधन आहे. भाजप मक्तेदार भांडवलदारी घराण्यांची विश्वासू पार्ट्यामधील एक आहे आणि काँग्रेस पार्टी दुसरी.

“घटना वाचवा” हा नारा हिंदुस्थानच्या मोठ्या भांडवलदारांचा नारा आहे. ह्याचा उद्देश्य आहे कामगार वर्ग आणि मेहनती जनसमुदायाला, कामगार-शेतकऱ्यांचे राज्य स्थापित करण्याच्या मार्गापासून दूर करणे. आपण कम्युनिस्टांनी शासक वर्गाच्या ह्या दुष्ट हेतूचा पर्दाफाश केला पाहिजे. आपण गदरींचा मार्ग किंवा त्याच मार्गावर चालणाऱ्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन सारख्या संघटनांचा मार्ग स्वीकारला पाहिजे. त्या सर्वांनी वसाहतवादींच्या घटनेचा आणि कायद्यांना उघडपणे नाकारले होते. भांडवलदार वर्गाच्या लोकशाहीच्या वर्तमान व्यवस्थेच्या आणि राजनैतिक प्रक्रियेच्या पर्यायाला आपल्याला हिंमतीने पुढे ठेवावे लागेल. भांडवलदार वर्गाच्या लोकशाहीचा पर्याय म्हणजे श्रमजीवी लोकशाही आहे. श्रमजीवी लोकशाही एक अशी व्यवस्था आणि राजनैतिक प्रक्रिया आहे जी हे सुनिश्चित करू शकेल की प्रत्येक बाबतीत मेहनत करणाऱ्या बहुसंख्यकाच्या मताचीच सरशी होईल. आपल्याला कामगार वर्गाला आणि सर्व पीडित लोकांना ह्या पर्यायासाठी संघटित करावे लागेल, जेणेकरून आपण हे सुनिश्चित करू शकू की आपल्या सामूहिक मताचीच अल्पसंख्यक शोषकांच्या मतावर सरशी होईल.

आपल्याला एक अशा व्यवस्थेसाठी आणि राजनैतिक प्रक्रियेसाठी संघर्ष करावा लागेल, ज्यात सार्वभौमत्व, म्हणजेच निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार, जनतेच्या हातात असेल. कार्यकारिणीला निर्वाचित विधायकीच्या प्रती जबाबदार व्हावं लागेल आणि विधायकीला जनतेच्या प्रती जबाबदार असावे लागेल. हिंदुस्थानच्या नवनिर्माणाच्या कार्यक्रमासाठी कामगार वर्गाला, शेतकऱ्यांना, महिलांना, व तरुणांना एकजूट करण्याचा मार्गच आपल्या उद्धाराचा मार्ग आहे.

काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व लोकांना रोजगार देणे हे काही अशक्य लक्ष्य नाहीय. जर आर्थिक निर्णय खाजगी फायदा कमविणाऱ्या कंपन्यांच्या हातातून काढून घेऊन मेहनती लोकांनी आपल्या हातात घेतले तर हे शक्य होईल. जेव्हा गदरी आणि त्यांच्या मार्गावर चालणारी मंडळी, रेल्वे, पोलाद, बँका आणि अर्थव्यवस्थेच्या इतर निर्णायक क्षेत्रांच्या राष्ट्रीयकरणाबद्दल बोलायचे, तेव्हा त्यांचा हाच हेतू होता.

देशाच्या शेतकऱ्यांचे संकट भांडवलदारी स्पर्धा आणि मक्तेदार भांडवलदारी कंपन्यांच्या वाढत्या वर्चस्वाच्या मार्गावर चालून सुटणार नाही. ह्यातून एकमेव मार्ग म्हणजे कृषी व्यापारावर जनतेचे नियंत्रण स्थापित करणे. सिंचन, शीत भंडारण आणि कृषीच्या इतर गरजांवर सामाजिक धनाची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एक सर्वव्यापक सार्वजनिक खरेदीची व्यवस्था स्थापित करावी लागेल, ज्यात सर्व कृषी उत्पादनाची खरेदी होईल आणि शेतकऱ्यांसाठी स्थायी व लाभकारी दर सुनिश्चित केले जातील. आपांपसांत स्पर्धा करण्याऐवजी शेतकऱ्यांना सामूहिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करून, कृषी क्षेत्राला अधिक उत्पादक बनविले जाऊ शकते. सहकारी शेती विकसित करून मोठमोठाली सामूहिक शेते निर्माण केली जाऊ शकतील ज्यात समूहातील सर्व सदस्यांच्या हितासाठी आधुनिक प्रौद्योगिकीचा वापर होऊ शकेल.

साथींनो,

एक फारच भयानक असत्य, जे हिंदुस्थानी लोकांत पसरविले जाते, ते हे आहे की अमेरिका आपला रणनैतिक मित्र आहे, विश्वासू मित्र आहे, तर पाकिस्तान आणि बांगलादेश आपले सर्वांत वाईट शत्रू आहेत.

जर तीर्थयात्रेसाठी हिंदुस्थानातून पाकिस्तानात जाऊ इच्छिणारी लोकं सहजपणे असे करू शकली, तर ही चांगली गोष्ट नाही का? पाकिस्तानच्या सरकारने करतारपूर कॉरिडोरसारखे मैत्रीपूर्ण पाऊल जेव्हा उचलले, तेव्हा त्याची आलोचना करून हिंदुस्थानच्या सरकारने अतिशय संकीर्ण मनाची आणि घमंडी वागणूक दाखवली. दक्षिण आशियाच्या लोकांच्या हितात आणि ह्या आवारात शांतीसाठी ते काम करत नाहीये.

ऐतिहासिक तथ्यांतून हे स्पष्ट होते की अमेरिकी साम्राज्यवादच दुनियेवर दहशतवादाच्या प्रायोजकांपैकी प्रमुख राज्य आहे. हिंदुस्तान आणि पाकिस्तानला कायम एकमेकांविरुद्ध भिडवून ठेवण्यासाठी, अमेरिका दहशतवादाचा एक शस्त्र म्हणून वापरते. जेव्हा दोघांपैकी कुठल्याही पक्षाच्या वतीने मैत्रीपूर्ण आणि शांतीपूर्ण संबंध स्थापित करण्याची काही पावलं उचलली जातात, तेव्हा अमेरिकेचे सी. आय. ए. पाकिस्तानात असलेल्या आपल्या कुठल्या तरी हेरांमार्फत हिंदुस्थानच्या धरतीवर दहशतवादी हल्ला आयोजित करते. हिंदुस्थानचे राज्यकर्ते पाकिस्तानविरुद्ध ओरडायला लागतात आणि कुठलेही संभाषण किंवा मैत्रीपूर्वक पावले थांबतात.

ह्यावेळी अमेरिका समजून उमजून पाकिस्तानात अस्थायी परिस्थिती निर्माण करत आहे. अमेरिका चीन-पाक आर्थिक कॉरिडोरला नष्ट करू इच्छित आहे. हिंदुस्थानचे राज्यकर्ते अमेरिकेच्या भूराजनैतिक कार्यनितीमध्ये पूर्ण सहयोग देत आहेत. आपले राज्यकर्ते अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्पच्या खोट्या प्रचाराचा उल्लेख करून हे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत की पाकिस्तान ह्या भूभागात दहशतवादाचा मुख्य प्रेरक आहे.

ब्रिटीश-अमेरिकन साम्राज्यवाद कायमच उपमहाद्वीपाच्या लोकांचा कट्टर शत्रू राहिलेला आहे आणि अजूनही आहे. त्याची इच्छा आहे की हिंदुस्थानच्या, पाकिस्तानच्या आणि बांग्लादेशच्या लोकांनी आपापसांत विभागलेले असावे आणि आपापसांत भांडत असावे. आपल्या सर्वांच्या देशांत अमेरिकन साम्राज्यवादी, सांप्रदायिक वाद भडकावित आहेत. ते ह्या भागातील सर्व देशांना अस्थायी बनविण्याचे आणि उध्वस्थ करण्याचे काम करत आहेत.

पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानची लोकं आपलेच साथी, आपलेच बंधू-भगिनी आहेत. ब्रिटीश वसाहतवादी गुलामीला संपविण्याच्या संघर्षात आपण सर्वजण एकत्र येवून लढलो होतो. आपण हे विसरता कामा नये की, हिंदुस्थान गदर पार्टीच्या गदरींनी वर्तमान पाकिस्तानातील पेशावर आणि लाहोरपासून, वर्तमान बांग्लादेशातील चितगाँग आणि ढाकापर्यंत सैनिकांना, शेतकऱ्यांना आणि तरुणांना संघटित केले होते. आपण हे विसरता कामा नये की स्वतंत्र हिंदुस्थानाच्या प्रथम मुक्त सरकारला हिंदुस्थान गदर पार्टीने अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये प्रस्थापित केले होते. अफगाणिस्तानाच्या राज्यकर्त्यांनी ब्रिटीश वसाहतवादी शासनाविरुद्ध आपल्या लोकांच्या मुक्तीसंघर्षाला पूर्ण समर्थन दिले होते.

हिंद-अमेरिका रणनैतिक गठबंधन दक्षिण आशियाच्या सर्व राष्ट्रांसाठी आणि लोकांसाठी एक गंभीर धोका आहे. हे पाकिस्तानबरोबर किंवा ह्या प्रदेशातील इतरे देशांबरोबर व आशियातील अन्य देशांबरोबर आपल्या देशाच्या शांतीपूर्ण आणि परस्परहितांचे संबंध बनविण्याच्या मार्गावर एक मोठा अडथळा आहे.

अमेरिकन राज्यकर्त्यांच्या मैत्रीवर अजिबातच विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. अमेरिकेचा विश्वासू मित्र होण्यामुळे कुठल्याही देशाचे काय नुकसान होऊ शकते, ह्याचे पाकिस्तान हे ज्वलंत उदाहरण आहे.

आपल्या देशातील राज्यकर्ते एक फारच हानिकारक विदेशनीती वापरत आहेत. हानिकारक असलेल्या हिंद-अमेरिका रणनैतिक गठबंधनाविरुद्ध देशाच्या कामगार, शेतकरी, महिला आणि युवक ह्यांना संघटित करण्यासाठी आपल्या कम्युनिस्टांनी एकजूट होऊन, सक्रीय आणि नेतृत्वाची भूमिका निभावली पाहिजे.

शांतता कायम राखण्यासाठी देशाच्या विदेशनीतीला नवी दिशा द्यावी लागेल. हिंदुस्थानाला पाकिस्तान, बांगलादेश आणि ह्यांसारख्या प्रदेशांतील सर्व लोकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आणि राजनैतिक एकता बनवली पाहिजे जेणेकरून अमेरिका किंवा दुसरी कुठलीही विदेशी ताकद दक्षिण आशियाच्या कुठल्याही देशाच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे हनन करू शकणार नाही.

साथींनो,

वसाहतवादी शासन 71 वर्षांआधी संपले होते, परंतु आपल्या समाजातील कुठल्याच समस्येचे निवारण आजवर झालेले नाही. हिंदुस्थानी आणि विदेशी मक्तेदार भांडवलदारांद्वारे आपल्या लोकांचे शोषण आणि लूट वाईटाहून वाईट प्रकारे केली जात आहे. सामंती अवशेषांतर्गत आजही आपली जनता दबलेली आहे. जातीवादी भेदभाव आणि अत्याचार निरंतर चालू आहेत. महिलांवरही अत्याचार सदैव चालूच आहेत. हिंदुस्थानातील तमाम राष्ट्र, राष्ट्रीयता आणि लोकांना भेदभावाचा आणि दमनाचा सामना करावा लागत आहे. भांडवलदारी व्यवस्था आणि त्याचे संरक्षण करणारे राज्य ह्या साऱ्या समस्यांना कायम ठेवतात. आपले राज्यकर्ते सांप्रदायिक भावनांना भडकवत राहतात, जेणेकरून लोकांना विभाजित ठेवले जाईल आणि त्यांचे राज्य चालू राहील.

जोपर्यंत भांडवलदारांच्या सत्तेचा अंत केला जात नाही व त्याच्या जागी कामगार आणि शेतकरी ह्यांचे राज्य स्थापित होत नाही तोपर्यंत कुठलीही समस्या सुटू शकणार नाही. हिंदुस्थानला भांडवलदारी -साम्राज्यवादी व्यवस्थेपासून पूर्णपणे नातं तोडावे लागेल. गदरींच्या क्रांतिकारी निष्कर्षाचा आजही तेवढेच औचित्य आहे. वसाहतवादी वारसा, वर्तमान राज्य आणि त्याच्या संस्थानांशी पूर्णपणे नातं तोडावे लागेल. हिंदुस्थानच्या नव्या पायावर नवनिर्माण करावे लागेल.

गदरींचा मार्ग आजही सर्व कम्युनिस्टांना आणि देशभक्तांना ललकारत आहे.

गदरींनी सर्व हिंदुस्थानींना धर्म, भाषा, प्रदेश आदींच्या वर उठून एकजूट होण्याचे आवाहन केले होते. त्यांनी वसाहतवादी शासनाला उखडून फेकण्याचे आणि शोषणातून मुक्त हिंदुस्थानची निर्मिती करण्याच्या लक्ष्याभोवती एकता बनविण्याचे आवाहन केले होते. आपण कम्युनिस्टांना एकजूट होऊन, कामगार वर्ग आणि सर्व दडपलेल्या व पीडित लोकांच्या संघर्षाचे नेतृत्व करत, त्या नव्या हिंदुस्थानच्या दिशेने पुढे जावे लागेल, ज्यासाठी गदरींनी संघर्ष केला होता आणि आपल्या जीवांची आहुती दिली होती.

शोषक आणि जुलमी राज्याविरुद्ध गदरींची बिनतडजोड धारणा होती. त्यांचे राजनैतिक उद्दिष्ट सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त असे एक नवे राज्य आणि नव्या व्यवस्थेच्या स्थापनेपेक्षा कमी नव्हते. गदरींच्या मार्गावर चालून, आपल्याला वर्तमान भांडवलदारी राज्याबाबत आणि त्याच्या घटनेबाबत सर्व भ्रमांना उघड करून त्यांचा विरोध करावा लागेल. आपल्याला कामगार आणि शेतकरी ह्यांच्या राज्याची स्थापना करण्याच्या उद्देश्याभोवती एकजूट व्हावे लागेल.

दमन-शोषणमुक्त नव्या हिंदुस्तानची निर्मिती करण्यात केवळ कम्युनिस्टांचीच रुची नाहीय. इतर बरेच प्रगतीशील आणि लोकशाही लोकं ह्याच लक्ष्यासाठी संघर्ष करत आहेत. लोकं अशा नव्या हिंदुस्थानाची वाट बघत आहेत, ज्यात धर्म, जाती, भाषा, लिंग, वर्ण ह्या आधारावर कोणाही बरोबर भेदभाव केला जाणार नाही.

आपल्याला वर्तमानाच्या अर्थकेंद्रित व्यवस्थेच्या विकल्पाला धैर्याने सादर करावे लागेल, जसे गदरींनी 100 वर्षांपूर्वी केले होते. लोकशाहीची वर्तमान व्यवस्था, ज्यात निर्णय घेण्याची ताकद काही मोजक्या लोकांकडे आहे, त्याच्या क्रांतिकारी विकल्पाला आपल्याला सादर करावे लागेल. सर्वांचे सुख आणि सुरक्षा सुनिश्चित करणारे राज्य आणि अर्थव्यवस्था बनविण्याच्या लक्ष्याची आणि कार्यक्रमाची आखणी करावी लागेल.

साथींनो,

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या 38 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, आपण पुन्हा एकदा वचन घेऊया की, हिंदुस्थानात कामगार-शेतकऱ्यांच्या राज्याची स्थापना करण्याच्या लक्ष्याभोवती कम्युनिस्टांची एकता पुनर्स्थापित करण्यासाठी आपण संघर्ष करू!

आपण पुन्हा एकदा वचन घेऊयात की हिंदुस्थानच्या नवंनिर्माणाच्या कार्यक्रमाभोवती सर्व लोकांची राजनैतिक एकता बनवू आणि ती मजबूत करू!

कम्युनिस्ट एकतेचे साधन म्हणून आणि कामगार वर्ग व सर्व दडपलेल्या व पीडित लोकांना नेहमी क्रांतिकारी नेतृत्व देणाऱ्या साधनाप्रमाणे, आपली पार्टी घडवूया आणि मजबूत करूया!

गदरींचा मार्गच हा सर्व प्रकारच्या शोषण आणि दमनातून हिंदुस्थानच्या मुक्तीचा मार्ग आहे! आपण बहादुरीने ह्या मार्गावर पुढे जाऊ!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी जिंदाबाद!

इंकलाब जिंदाबाद!

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.