सीरियावरील क्षेपणास्त्रांद्वारे बर्बर हल्ल्यांचा धिक्कार करा!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 14 एप्रिल 2018

14 एप्रिलला पहाटे पहाटे, अमेरिका, इंग्लंड व फ्रांसने सीरियावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला सुरू केला. हा हल्ला म्हणजे सीरियाच्या सार्वभौमत्वावर निर्लज्ज हल्ला आहे, व सीरियाच्या सरकारविरुद्ध व लोकांविरुद्ध एक हेतुपुरस्सर चिथावणी आहे.

साम्राज्यवाद्यांद्वारे सीरियावर व तिच्या लोकांवर केलेल्या ह्या गुन्हेगारी हल्ल्याचा, हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी जोरदार धिक्कार करते. आपल्या देशातील कामगार वर्गास, सर्व कष्टकऱ्यांस व सर्व न्याय आणि शांतीप्रेमी लोकांना हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी पुकारत्येय की त्यांनी सीरियावरील साम्राज्यवादी युद्धाचा एकजुटीने विरोध करावा.

ह्या हल्ल्याच्या सुमारे एक आठवडा आधीपासून आंग्लअमेरिकन साम्राज्यवादी मोठ्या प्रमाणात सीरियाविरुद्ध प्रचार करतायत आणि हा दावा करतायत की सीरियाचे सरकार रासायनिक अस्त्रांचा वापर करून आपल्या स्वतःच्या लोकांचाच जनसंहार करीत आहे. सीरियाच्या सरकारने कोणत्याही प्रकारच्या रासायनिक अस्त्रांचा वापर केलेल्याचा कोणताही पुरावा नाहीय. सीरियाच्या सरकारने रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचे नाकारले आहे. त्याचे असे म्हणणे आहे की नॅटो अमेरिकेच्या समर्थनाने काही बंडखोरटोळ्याच जाणून बुजून अशा प्रकारचे हल्ले आयोजित करतात, जेणेकरून अमेरिकेला त्यांच्या देशात हस्तक्षेप करण्याचा बहाणा मिळतो. युद्ध करण्यासाठी साम्राज्यवाद्यांच्या द्वारे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरविणे काही नवे नाहीय. ही गोष्ट सगळ्यांनाच चांगली माहित्येय की अमेरिकन साम्राज्यवाद्यांद्वारा समर्थित व वित्तपोषित बंडखोर टोळ्यांनी सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक अस्त्रे जमा करून ठेवल्येत.

गेल्या सात वर्षांपासून अमेरिकन साम्राज्यवादी, व यूरोपमधील नॅटोतील त्यांचे सहयोगी देश, खास करून इंग्लंड व फ्रांस, सीरियामध्ये हस्तक्षेप करतायत. आपल्या फौजी हस्तक्षेपाच्या समर्थनार्थ, अमेरिकन साम्राज्यवादी सीरियाच्या असाद सरकारला एका बर्बर हुकुमशाहीच्या रूपात सादर करून बदनाम करण्याचे प्रयत्न करतायत. अमेरिकन साम्राज्यवाद व त्याचे सहयोगी देश, ब्रिटन, फ्रांस, व सौदी अरब ह्यांची सरकारें सीरियामध्ये विविध टोळ्यांना पैसे व शस्त्रास्त्रे देत आले आहेत. त्यांचा हेतू आहे सीरियामध्ये अराजकता व हिंसा पसरविणे, आणि सीरियाचे गुटवादी आधारावर तुकडे करणे, जसे पूर्वी अफगाणिस्तान, इराक, व लीबियामध्ये त्यांनी केले होते. हे करताना त्यांचे एक ध्येय आहे असाद सरकारला उखाडून फेकणे व तिथे सत्ता परिवर्तन आयोजित करणे.

सीरियातील हल्लीच्या संकटास अमेरिकन साम्राज्यवाद व त्याचे सहयोगी देश जबाबदार आहेत. ह्यामुळे लाखो लोक मारले गेल्येत, पुरीच्या पूरी शहरे व देशातील मोठमोठे़ इलाके बर्बाद झाल्येत, व लक्षावधी सीरियन लोकांना पलायन करण्यावाचून काही गत्यंतर उरले नाहीय.

हे क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले अशा वेळी केले जात आहेत जेव्हा अमेरीकानॅटो समर्थित बंडखोरटोळ्यांना सीरियन सरकारकडून वाईट पराभवाचा सामना करावा लागत आहे. अमेरीकानॅटोच्या हस्तक्षेपाचा हेतू आहे ह्या टोळ्यांची मदत करणे व सीरियात चालू असलेल्या बर्बर युद्धास प्रलंबित करणे.

अमेरिका द्वारा केलेल्या ह्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे अमेरिकानॅटो शक्ती व रूस ह्यांच्यातील युद्धाचा धोका फार वाढला आहे.

ज्या कोणाला सीरिया व पश्चिम एशियातील शेजारी देशांमध्ये शांतीची इच्छा आहे, त्यांनी ही मागणी केली पाहिजे की अमेरिकेच्या पुढाकारातील केलेल्या ह्या बर्बर हस्तक्षेपास लागलीच बंद केले पाहिजे. कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध ह्या प्रकारच्या हल्ल्यांना उचित मानता येणार नाही.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.