हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त महासचिव कॉम्रेड लाल सिंग यांचे भाषण:

मोठ्या भांडवलदारांच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, समाजविरोधी आणि राष्ट्रविरोधी हल्ल्याविरुद्ध संघर्ष तीव्र करा!

कामगार आणि शेतकऱ्यांची हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी संघटित व्हा!

आपण आज एक खास घटना साजरी करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत. हा आपल्या पार्टीचा जन्मदिवस आहे. ह्या पार्टीला हिंदुस्थानी क्रांतीची आघाडीची पार्टी बनविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी जे रात्रंदिवस मेहनत करीत आहेत, त्या आपल्या सर्वांसाठी हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे.

मोठ्या भांडवलदारांच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, समाजविरोधी आणि राष्ट्रविरोधी हल्ल्याविरुद्ध संघर्ष तीव्र करा!

कामगार आणि शेतकऱ्यांची हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी संघटित व्हा!

साथींनो!

आपण आज एक खास घटना साजरी करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत. हा आपल्या पार्टीचा जन्मदिवस आहे. ह्या पार्टीला हिंदुस्थानी क्रांतीची आघाडीची पार्टी बनविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी जे रात्रंदिवस मेहनत करीत आहेत, त्या आपल्या सर्वांसाठी हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे.

40 वर्षांपूर्वी जेव्हा आपण कामगार वर्गाच्या अशी आघाडीची पार्टी बनविण्याचा विडा उचलला होता, तेव्हा देशात काय परिस्थिती होती? त्यावेळी संसदीय लोकतंत्राची व्यवस्था खोल संकटात होती. जून 1975 मध्ये राष्ट्रीय आणिबाणीच्या घोषणेमुळे आणि लोकशाही व नागरी अधिकारांच्या निलंबनामुळे हिंदुस्थानी राज्याचा फासीवादी चेहरा उघडा पडला होता. देशातील कामगार वर्ग आणि नवतरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक-विरोध फैलावत होता. तो असा काळ होता जेव्हा क्रांतीची लाट आगेकूच करत होती.

जेव्हा वस्तुगत परिस्थिती क्रांतीस अनुकूल होती, तेव्हा कम्युनिस्ट आंदोलन त्या स्थितीचा फायदा उचलून क्रांतीच्या दिशेने आगेकूच करण्यास असमर्थ होते. कम्युनिस्ट आंदोलन अगणित गटांमध्ये विभागलेले होते. त्यांत अशा पार्ट्यांचा समावेश होता ज्या संसदीय लोकतंत्रात पूर्णपणे विलीन होऊन गेल्या होत्या आणि भांडवलदारांच्या प्रतिस्पर्धी दलांमध्ये कामगार व शेतकऱ्यांना संघटित करीत होत्या. काही पार्ट्या अशा होत्या ज्या कामगार वर्गाकडे दुर्लक्ष करून फक्त शेतकऱ्यांवर आपले लक्ष केंद्रित करत होत्या. त्या असे दावे करीत की गावांद्वारे शहरांना वेढा घातला जाऊ शकतो.

त्या परिस्थितीत आपण या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो की कामगार वर्गाची अशी आघाडीची पार्टी बनविणे आणि मजबूत करणे खूप गरजेचे आहे, जी भांडवलदारांचा तख्ता-पालट करून समाजवाद व कम्युनिझम् निर्माण करण्याच्या रणनैतिक लक्ष्याप्रती वचनबद्ध असेल. ही एक अशी पार्टी असेल जी मार्क्सवाद-लेनिनवादी सिद्धांतांनी मार्गदर्शित असेल आणि त्यात सर्व हिंदुस्थानी कम्युनिस्ट एकजूट होऊन संघर्ष करतील. ही अशी लेनिनवादी पार्टी असायला हवी, जी लोकतांत्रिक केंद्रियवादावर आधारित असेल आणि पायाभूत संघटना ह्या तिचा आधार असतील. आम्ही समाजवादासाठी संसदीय रस्त्यांचा विरोध केला. आम्ही वैयक्तिक दहशतवादाचा, तसेच गावांद्वारे शहरांना वेढा घालण्याच्या अवधारणेला धुडकावून लावले.

आम्ही पीपल्स वाईस नामक वर्तमानपत्र नियमित प्रकाशित करणे सुरू केले. आम्ही मार्क्सवाद-लेनिनवादाच्या रक्षणार्थ, सोवियत आणि चीनी संशोधनवाद या दोहोंविरूद्ध सतत सैद्धांतिक व विचारधारात्मक संघर्ष केला. तीन वर्षांहून अधिक काळ अशी तयारी केल्यानंतर 25 डिसेंबर 1980 रोजी आपल्या पार्टीच्या स्थापनेचे महाअधिवेशन झाले.

साथींनो!

आपण 1980च्या दशकात, खूपच कठीण परिस्थितींत आपल्या पार्टीचे संघटन बांधून त्यास मजबूत केले. कोणत्याही प्रकाराने आपल्या हुकूमशाहीला स्थाई बनविण्यासाठी मोठ्या भांडवलदारांनी इंदिरा गांधीच्या काँग्रेस पार्टीला जनादेशाच्या रूपा पुन्हा केंद्र सरकारात आणण्यासाठी पूर्णपणे समर्थन दिले. भांडवलदार वर्गाचे शासन चालविण्याचे राजकीय दहशतवाद हे आवडीचे माध्यम बनले. त्याद्वारे ते आपापसातील अंतर्विरोध सोडवू लागले व त्याच बरोबर जनसंघर्षांचा बळी घेऊन रक्तपात करू लागले. आर्थिक व राजनैतिक मागण्यांसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांना ’’कायदा आणि सुव्यस्थेची’’ समस्या म्हणून संबोधिले जाऊ लागले. देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्याच्या नावाखाली, खोट्या चकमकींत तरूणांच्या हत्येसह सर्व प्रकारच्या दमनाला न्य्याय ठरविले गेले.

1984 मध्ये अमृतसर मधील सुवर्ण मंदिरावर झालेला फौजी हल्ला, त्यानंतर इंदिरा गांधींची हत्या व राज्याद्वारे आयोजित शिखांचा नरसंहार, या सगळ्यांमुळे देशातील सर्व प्रगतीशील ताकदींच्या विरुद्ध आतंकाचे सावट निर्माण केले गेले होते. आपली पार्टी, जिची काही वर्षांपूर्वीच स्थापना झाली होती, ती काही ह्या आतंकी मोहिमेने दबली गेली नाही. देशभरात सरकारद्वारे पसरविल्या जाणाऱ्या सांप्रदायिक व फासीवादी आतंकाचा आपण बहादुरीने पर्दाफाश व विरोध केला आणि आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करत असलेल्या लोकांचे रक्षण केले.

आपल्या पार्टीने हे सत्य स्पष्ट केले की राज्यच सांप्रदायिक आहे, लोकांचा कोणताही हिस्सा नव्हे. शासक वर्गच पंजाब, आसाम, मणिपूर आणि पूर्ण देशात पसरलेल्या भयानक स्थितीसाठी जबाबदार आहे. आपले शासकच लोकांची एकता तोडित आहेत. आम्ही सर्व जनसंघटनांना आवाहन केले की एकजूट होऊन राजकीय दहशतवादाचा विरोध करा. आम्ही ऐलान केले की एकावर हल्ला म्हणजे सर्वावर हल्ला आहे व आम्ही ही मागणी केली की सांप्रदायिक हिंसा व नकली चकमकींना आयोजित करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यावी.

मोठ्या पैशाचिक प्रकारे लोकांना पथभ्रष्ट करणे, सांप्रदायिक हिंसा तसेच वैयक्तिक व राजकीय दहशतवाद पसरविणे हे भांडवलदार वर्गाचे शासन चालविण्याचे आवडीचे तंत्र आहे असे 1980च्या दशकाच्या शेवटपर्यत आणखी जास्त स्पष्ट झाले. मोठे भांडवलदार ह्या प्रकारांचा वापर करून जुन्या दिखावटी समाजवादी आवरणांना झुगारून देऊन ’’मुक्त बाजारपेठेच्या’’ नियमांना अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करू लागले. आंतरराष्ट्रीय पातळीवर, साम्राज्यवाद व प्रतिक्रियावादी भांडवलदार कम्युनिझम् वर तसेच कामगार वर्गाने व लोकांद्वारे जिंकलेले सर्व अधिकारांवर अत्यंत क्रूरपणे हल्ले करत होते.

ह्या परिस्थितीत, आम्ही पार्टीला खुल्या रूपात समोर आणण्याचा धाडसी निर्णय घेतला. पहिल्या महाअधिवेशनानंतर डिसेंबर 1990 मध्ये मुंबईत आपल्या पार्टीचा विशाल मेळावा, ज्यात हजारो कामगारांनी हिस्सा घेतला होता, त्याद्वारे आपण ऐलान केले की आम्ही कम्युनिस्ट-विरोधी हल्ल्यांना घाबरणारे नाहीयत. आम्ही ऐलान केले की कम्युनिस्ट गदर पार्टी ह्या आव्हानाला सामोरी जाईल आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करून हिंदुस्थानी क्रांतीचे लक्ष्याच्या दिशेने आगेकूच करेल.

साथींनो!

आपल्या पार्टीचे प्रथम महाअधिवेशन अशा वेळी झाले ज्यावेळी जगभरात मोठ-मोठी परिवर्तने होत होती. पूर्व युरोपात जवळपास सर्वच दिखावटी समाजवादी सत्ता नाश पावल्या होत्या. सोवियत संघाचे विघटन होण्यास सुरुवात होऊ लागली होती. चीनने ’’बाजारी समाजवाद’’ बनविण्याच्या नावाने विदेशी भांडवलासाठी दरवाजे उघडले होते. अल्बानिया भांडवलदारी हल्ल्यापुढे गुडघे टेकणार होता.

काही देशांतील कम्युनिस्ट पार्ट्या साम्राज्यवादी भांडवलदारांच्या भयानक समाज-विरोधी, कम्युनिस्ट-विरोधी हल्ल्यांसमोर झुकू लागल्या होत्या. काही पार्ट्यांनी आपल्या नावातून ’कम्युनिस्ट’ शब्दच काढून टाकला तर काही पार्ट्यांनी आपल्या कार्यक्रमातून श्रमजीवी हुकूमशाही स्थापित करण्याच्या उद्देश्याला काढून टाकले. ह्या परिस्थितींत आपल्या पार्टीने निर्णय घेतला की आपल्याला मार्क्सवाद-लेनिनवादाच्या मूलभूत तत्त्वांवर व निष्कर्षांवर टिकून राहिले पाहिजे आणि आतापर्यंतच्या वर्गसंघर्षाचे त्या सिद्धांताच्या आधारावर मूल्यांकन करून, आम्ही मार्क्सवाद-लेनिनवादाला अजून समृद्ध व संपन्न बनविण्यासाठी योगदान दिले पाहिजे.

आपल्या पार्टीच्या पहिल्या महाअधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला की आम्ही स्वतःच आपला आदर्श निर्धारित करू. आपण हिंदुस्थानी क्रांतीचा सिद्धांत विकसित करण्याचे हाती घेतले – एक असा सिद्धांत जो ह्या देशातील परिस्थितीतून उमलून येईल तथापि हिंदुस्थानात कम्युनिझमच्या विकासासाठी अनुकूल असेल. अशा प्रकारे आम्ही हिंदुस्थानी कम्युनिस्ट आंदोलनात, हिंदुस्थानी क्रांतीचा पथ सुनिश्चित करण्यासाठी कोणत्याच इतर पार्टी अथवा देशावर निर्भर राहण्याच्या प्रवूत्तींशी पूर्णतः नाते तोडून टाकले.

जागतिक स्तरावर होणाऱ्या मोठ-मोठ्या बदलांचे मूल्यांकन करत, पहिल्या महाअधिवेशनात त्या बदलांचे विश्लेषण करून पार्टीची सर्वसाधारण कार्यदिशा, बदलत्या परिस्थितींत वर्गसंघर्षाला पुढे नेण्यासाठी पार्टीचा कार्यक्रम आणि कार्यनिती निर्धारित करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. पहिल्या महाअधिवेशनामध्ये समाजातील सर्व सदस्यांच्या सर्वव्यापक अधिकारांच्या रक्षणार्थ तथा हिंदुस्थानी संघामधील सर्व राष्ट्रांच्या व लोकांच्या अधिकारांच्या रक्षणार्थ, शासक वर्ग व राज्याच्या हल्ल्यांविरूद्ध जास्तीत जास्त विस्तृत राजनैतिक एकता बनविण्याचे कार्य हाती घेण्यात आले.

पहिल्या महाअधिवेशनानंतर, आपल्या पार्टीने जागतिक स्तरावर होत असलेल्या परिवर्तनांचे विश्लेषण करण्याच्या सैद्धांतिक कामावर विशेष लक्ष दिले. 1991-98 च्या दरम्यान अनेक सल्लागार परिषदा आयोजित करण्यात आल्या, जेणेकरून पार्टीच्या आम कार्यदिशेवर चर्चा करून व ती निर्धारित करण्यात पार्टीच्या सर्व सदस्यांना समाविष्ट करता आले.

आम्हाला हे समजले की साम्राज्यवाद व श्रमजीवी क्रांतीच्या युगात जगाने एका नव्या कालावधीत प्रवेश केला आहे. क्रांतीची लाट भरतीपासून ओहोटीत रूपांतरित झाली आहे. प्रतिक्रांती व प्रतिक्रियावादी शक्तीं हावी झाल्या आहेत. आम्ही या गोष्टींवर जोर दिला की ह्याचा अर्थ क्रांती संपुष्टात आली असा नव्हे. आम्ही सांगितले की कम्युनिस्ट पार्टीनीं आपल्या वर्गशत्रूंच्या ह्या हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी उपयुक्त संघर्ष रीतींचा व कार्यनीतींचा अवलंब करायला हवा. संक्षिप्तपणे आपल्याला प्रवाहाविरुद्ध पोहायला, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितींत पूढे जाण्याचे कसब आत्मसात करायला हवे.

हिंदुस्थानी समाजाच्या विकासाच्या टप्प्यावर आपल्या पार्टीच्या विश्लेषणातून ह्या गोष्टींची पुष्टी होते की भांडवलशाही हीच हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेची चालक शक्ती आहे. सामंती अवशेष, जातीवादी संबंध आणि देशाची साम्राज्यवादी लुटीला कायम ठेवीत भांडवलदारी संबंध विस्तृत होत आहेत असे निरीक्षण आम्ही केले. आम्ही ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की सामंतवाद विरोधी, वसाहतवाद विरोधी व साम्राज्यवाद विरोधी संघर्ष पूर्णत्वास नेण्याची अनिवार्य शर्त आहे की भांडवलशाही व भांडवलदारी शासनाचा तख्तापालट करणे.

सोवियत संघाचे पतन होवून त्याचे विघटन होण्याच्या कारणांचे आम्ही विश्लेषण केले. सोवियत पार्टीद्वारे मार्क्सवाद-लेनिनवादाच्या सिद्धांताचा त्याग तसेच त्या सिद्धांतातील मुख्य मूल्यांत 1956च्या 20व्या पार्टी महाअधिवेशनापासून सूरू झालेली फेरफार हे त्यामागील मुख्य कारण होते. क्रुश्चेवच्या अध्यक्षतेखालील सोवियत पार्टीने समाजवादी अर्थव्यवस्था, श्रमजीवी लोकतंत्र व सचेत मानवीय भूमिकेच्या समस्यांना सोडिवण्यासाठी पाऊले उचलली नाहीत. याउलट त्याने ’’संपूर्ण जनतेचे राज्य’’ आणि ’’संपूर्ण जनतेची पार्टी’’ ह्यांसारख्या मार्क्सवाद विरोधी अवधारणांना बढावा दिल्या. आता सोवियत समाजात वर्गसंघर्ष करण्याची काहीच आवश्यकता नाही असे सांगून कामगार वर्गाला झोपवून टाकण्यात आले.

सोवियत पार्टीने सोशल-डेमोक्रेसी (सामाजिक लोकतंत्र) बरोबर तडजोड करून असा दावा केला की सर्व भांडवलदारी देशांत समाजवादासाठी शांतिपूर्ण व संसदीय मार्गाचा अवलंब करायला हवा. त्याने आपली ही संशोधनवादी कार्यदिशा दुसऱ्या कम्युनिस्ट पार्टीवर थोपण्यासाठी, त्यांच्या अंतर्गत बाबींत बेरहमीने लुडबूड केली. सोवियत राज्याला एका सामाजिक-साम्राज्यवादी राज्यात परिवर्तित केले, जे नावापुरतं समाजवादी परंतू वास्तविकपणे साम्राज्यवादी होते. त्याने जगावर आपले वर्चस्व गाजविण्यासाठी अमेरिकी साम्राज्यवाद्यांशी कधी तडजोड केली तर कधी टक्कर घेतली. वेगवेगळ्या देशांच्या कम्युनिस्ट पार्ट्यांचा आपल्या साम्राज्यवादी कार्यक्रम पुढे नेण्यासाठीची आयुधे बनविण्याचा त्याने प्रयत्न केला. स्वतःचे नव-वसाहतवादी साम्राज्य स्थापिण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी त्याने नवनव्या स्वतंत्र देशांच्या कम्युनिस्ट पार्ट्यांना आपापल्या भांडवलदारांचे समर्थन करण्याचे, तसेच सोवियत समर्थक सरकारांची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सोवियत अर्थव्यवस्थेचे सैन्यीकरण आणि दुसऱ्या देशांत हल्लेखोर युद्धांमुळे तेथील कष्टकरी लोक होरपळून निघाले. 1980च्या दशकात जेव्हा सोवियत संघातील कष्टकऱ्यांचा असंतोष चरमसीमेला पोहोचला तेव्हा अंतर्गत व बाह्य भांडवलशाही शक्तींनी कट रचून समाजवादाच्या उरल्यासुरल्या चिन्हांना मिटविले आणि शेवटी सोवियत संघाचे तुकडे केले.

आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की कम्युनिस्ट आंदोलन एकच आहे. सामाजिक लोकतंत्राशी तडजोड करणाऱ्यांपासून त्याला मुख्य धोका आहे. सामाजिक लोकतंत्राशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध विचारधारात्मक व विवादात्मक संघर्ष करून हिंदुस्थानी कम्युनिस्ट आंदोलनात एकता पुन:स्थापित करण्याचे प्रयत्न करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

सर्व जगात भांडवलशाही लोकतंत्र जास्तीत जास्त प्रमाणात बदनाम होत होते. हे स्पष्ट होत होते की भांडवलशाही लोकतंत्रांची व्यवस्था वास्तविकतः लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बनविण्यात आली आहे. जनतेच्या नावाने सत्तेत येऊन मक्तेदार भांडवलदारांचे हितरक्षण करणाऱ्या राजनैतिक पार्ट्यांबद्दल लोकांत क्रोध आणि द्वेष वाढत होता. अधिकाधिक लोक आपल्या जीवनावर स्वतःच नियंत्रण करण्याच्या अधिकारांची मागणी करू लागले. आपल्या पार्टीने लोकांना सत्तारूढ करण्याच्या ह्या प्रयत्नांना वर्तमान काळातील एक संभावित क्रांतीकारी कारकांच्या स्वरूपात ओळखले.

श्रमजीवी वर्गाला एका अशा आधुनिक लोकतंत्रासाठी संघर्ष करावा लागेल ज्यांत सार्वभौमत्व लोकांच्या हाती असेल, हा आमचा एक महत्त्वाचा निष्कर्ष होता. आपण कम्युनिस्टांनी अशा राजनैतिक व्यवस्थेची मागणी करायला हवी व तिच्यासाठी संघर्ष करायला हवा, जिच्यात लोकांना उमेदवारांचे चयन करण्याच्या अधिकारासमवेत निवडण्याचा व निवडून येण्याचा समान अधिकार सुनिश्चित असेल. लोकांना निवडलेल्या प्रतिनिधींकडे त्यांच्या कामाचा लेखाजोखा मागण्याचा हक्क असायला हवा तसेच कोणत्याही वेळी अयोग्य प्रतिनिधीला त्याच्या पदावरून हटविण्याचा अधिकार असायला हवा. लोकांना नवे कायदे व नीती प्रस्थापित करण्याचा अधिकार असायला हवा. उर्वरित सर्व शक्तीं लोकांच्या ताब्यात हव्यात, ज्यांत संविधानात सुधारणा करण्याचा तसेच पुनर्लिखित करण्याचा अधिकाराचा देखील समावेश असला पाहिजे.

लोकांनी मते देऊन पार्ट्यांना सत्तेत आणण्याऐवजी, पार्ट्यांनी लोकांना सत्तेत आणण्यासाठी व सत्तेत कायम ठेवण्याचे काम करायला हवे. आपल्या पार्टीने हा क्रांतीकारी विचार 1993 मध्ये अधिकार रक्षणाच्या आंदोलनात प्रस्थापित केला होता. हा प्रस्ताव अशा वेळी केला गेला जेव्हा लोक संसदेत बसलेल्या अशा प्रमुख पार्ट्यांच्या अपराधी भूमिकेविरूद्ध संघर्ष करीत होते, ज्यांनी एकत्रितपणे बाबरी मशिदीचा विध्वंस केला व संपूर्ण देशात सांप्रदायिक हिंसाचार पसरवला होता.

त्यावेळी कम्युनिस्ट आंदोलनात खूप सारे चुकीचे विचार पसरले होते. सामाजिक लोकतंत्राबरोबर तडजोड करणाऱ्यांनी भाजपा व त्यासंबधित संघटनांना सांप्रदायिक शक्ती मानल्या होत्या. त्यांनी हा भ्रम पसरविला की काँग्रेस पार्टी कमी वाईट आहे आणि वर्तमान राज्य सांप्रदायिक नसून धर्म-निरपेक्ष आहे.

आपल्या पार्टीने सांप्रदायिक शक्तींशी लढण्याच्या नावाखाली वर्तमान राज्याचे रक्षण करून काँग्रेस पार्टीसोबत हात मिळवण्याच्या मार्गाचा नेहमीच विरोध केला आहे. दोन्ही काँग्रेस पार्टी व भाजपा ह्या सांप्रदायिक राज्याचा हिस्सा आहेत हे सत्य आपण वारंवार उघड केले आहे. ह्याच दोन्ही मिळून बाबरी मशिदीचा विध्वंस केला. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते दोन्ही मक्तेदार भांडवलदार घराण्याच्या अध्यक्षतेखालील भांडवलदार वर्गाच्या हितांची सेवा करीत आहेत.

ऑक्टोबर 1998 मध्ये पार्टीच्या दुसऱ्या महाअधिवेशनात1991-98 च्या दरम्यान केलेल्या आपल्या पार्टीच्या सैद्धांतिक कामाची समीक्षा करण्यात आली. त्या अधिवेशनात हिंदुस्थानाच्या नवनिर्माणाचा कार्यक्रम अंगीकारण्यात आला. हा कार्यक्रम लोकांच्या हाती सार्वभौमत्व सोपविण्याच्या उद्देश्याने अर्थव्यवस्थेला नवीन दिशा बहाल करण्याचा, तसेच राज्य आणि राजनैतिक प्रक्रियेला पुन:स्थापित करण्याचा कार्यक्रम आहे.

ज्यावेळी मोठ्या भांडवलदारांचे प्रवक्ते दररोज हा दावा करीत की ’’बाजारपेठ उन्मुख अर्थव्यवस्था’’ व ’’बहुपार्टी प्रतिनिधित्ववादी लोकतंत्राच्या’’ व्यवस्थेचा कोणताही विकल्प नाहीय, त्यावेळी मोठ्या बहादुरीने आपल्या पार्टीने एक क्रांतिकारी विकल्प प्रस्तुत केला. आम्ही असा दावा केला की अधिकतम खाजगी नफे सुनिश्चित करणाऱ्या भांडवलशाही व्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था हा विकल्प आहे. ही व्यवस्था समाजातील सर्व सदस्यांच्या वाढत्या भौतिक व सांस्कृतिक गरजांना जास्तीत जास्त प्रमाणात पूर्ण करू शकेल. बहुपार्टी प्रतिनिधित्ववादी लोकतंत्रास पर्याय एक अशी राजनैतिक व्यवस्था व प्रक्रिया आहे जी लोकांना मतदान करणारी वोटबँक बनविण्याऐवजी लोकांच्या हाती वास्तविकपणे सत्ता सोपवेल.

भांडवदारांविरुद्ध वर्गसंघर्षाचे मैदान म्हणून आपल्या पार्टीने निवडणुकांचा उपयोग केला आहे. भांडवलदार लोकांना राजनितीपासून दूर लोटण्यासाठी तसेच आपले अंतर्गत अंतर्विरोध सोडविण्यासाठी निवडणुकांचा वापर करतात. आम्ही लोकांत राजनैतिक चेतना जागविण्यासाठी व हिंदुस्थानी समाजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी एकमात्र मार्ग म्हणून नव-निर्माणाचा कार्यक्रम दूरवर पोहोचविण्यासाठी निवडणुकींच्या आखाड्याचा उपयोग केला आहे. भांडवलदारांचे लोकतंत्राचे संचालन करणे हा आमचा राजनैतिक उद्देश्य नाही असे आम्ही उघडपणे लोकांना सांगतो. आमचे उद्दिष्ट आहे श्रमजीवी लोकतंत्र प्रस्थापित करणे, ज्यात मूलभूत कायदा हे सुनिश्चित करेल की सार्वभौमत्व लोकांच्या हाती असेल.

भांडवलदारांच्या समाजविरोधी हल्ल्याविरुद्ध संघर्षाच्या दरम्यान, हिंदुस्थानच्या नवनिर्माणाचा क्रांतिकारी कार्यक्रमा भोवताली कामगार वर्ग आणि लोकांना सुसज्ज करणे, हाच वर्तमान अवधीत आमच्या पार्टीच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. आपल्या पार्टीच्या तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या महाअधिवेशनात ह्याच कार्याला वारंवार केंद्रबिंदू ठरविण्यात आले आहे.

साथींनो!

ह्या अवधीत वर्गसंघर्षाचा संपूर्ण अनुभव या गोष्टीची पुष्टी करतो की मक्तेदार भांडवलदार घराणी आपल्या संकुचित साम्राज्यवादी इराद्यांच्या पुर्ततेसाठी हिंदुस्थानाला एका मोठ्या जोखमीच्या व विनाशकारी मार्गावर घेऊन जात आहेत.

नरसिंह रावांच्या काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखालील युती सरकाराने 1991 मध्ये जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या झेंड्याखाली, तथाकथित आर्थिक सुधारांच्या पहिल्या टप्प्यांची सुरुवात केली. वाजपेयींच्या भाजपा नेतृत्वाखालील युती सरकाराने 1999 पासून नीतीगत सुधारांच्या दुसऱ्या टप्प्यांची पाठराखण केली होती. खाजगीकरण तथा वाढत्या उदारीकरणाच्या झेंड्याखाली अशी पाऊले उचलण्यात आली ज्यांचा उद्देश्य होता भांडवलदारी घराण्यांच्या विश्वव्यापी प्रसाराच्या इराद्यांना बढावा देणे. 2004 मध्ये मनमोहन सिंहांच्या काँग्रेस नेतृत्वाखालील युती सरकाराने शपथ घेऊन आश्वासन दिले की भांडवलदारी सुधारांना ’’मानवी चेहऱ्यासकट’’ लागू करू. पूढच्या दहा वर्षांच्या दरम्यान संपत्तीचे संकेंद्रण अभूतपूर्व सीमेपर्यत पोहोचले. श्रीमंत आणि गरीब यांतील दरी अजूनच खोल बनत गेली. 2014 मध्ये भाजपा नेतृत्वाखालील युती सरकाराने ’’सर्वांची साथ, सर्वांचा विकास’’ घोषणेखाली सत्तेची सूत्रे हाती घेतली.

ह्या सर्व गतिविधींतून हे स्पष्ट होते की तो एकच कार्यक्रम आहे ज्यास गेल्या 26 वर्षांपासून काँग्रेस पार्टी व भाजपा पार्टीच्या एका पाठोपाठ आलेल्या सरकारांनी बढावा दिला आहे. ह्यामुळे टाटा, बिर्ला, अंबानी आणि इतर मक्तेदार भांडवलदारी घराणी कोट्याधीशांपासून डॉलर अब्जाधीश बनले आहेत. दुसरीकडे कामगारांचे शोषण कित्येक पटींनी वाढले आहे. बेरोजगारी आणि महागाई खूपच वाढली आहे. शेतकऱ्यांच्या रोजी-रोटींची असुरक्षितता असह्य होत चालली आहे.

जस-जसे भांडवल कमीत कमी हातांत संकेंद्रित होत चालले आहे, तस-तसे राजनैतिक सत्तादेखील अधिकाधिक संकेंद्रित आणि फासीवादी होत चालली आहे. ह्या वेळी आर्थिक व राजनैतिक सत्ता अभूतपूर्व मात्रेत संकेंद्रित झाली आहे. कधी मतपेटींतून तर कधी बंदुकीच्या गोळीने आणि वारंवार सांप्रदायिक हिंसाचार करून व राज्याद्वारे दहशतवादाच्या विविध मार्गानी जवळपास 150 मक्तेदार भांडवलदार घराणी 125 करोड हिंदुस्थानी लोकांवर आपली हुकूमशाही थोपवित आहेत.

भाजपा आणि काँग्रेस पार्टी शासक वर्गाच्या दोन मुख्य पार्ट्या आहेत. दोन्ही पार्ट्या शासक वर्गाच्या कामगार-विरोधी, शेतकरी-विरोधी, समाज-विरोधी आणि राष्ट्रविरोधी कार्यक्रम लागू करण्यासाठी बांधील आहेत. ह्या दोन्ही पार्ट्या स्वतःला एकमेकींच्या विरोधी असल्याचा दिखावा करतात, परंतू दोन्ही एकाच वर्गाच्या सेवेत काम करीत आहेत.

हिंदूंच्या हितांचे रक्षण करणारी पार्टी, ह्या रूपात भाजपा पार्टी स्वतःला प्रस्तुत करते. भाजपा काँग्रेसवर धार्मिक अल्पसंख्यककांच्या तुष्टीकरणाचा आरोप करते. काँग्रेस पार्टी सहिष्णुतेचा प्रचार करते आणि भाजपावर धार्मिक अल्पसंख्यककांप्रती असहिष्णू असल्याचा आरोप करते. दोन्ही पार्ट्या सांप्रदायिक भावना भडकावून आणि समाजात जातीवादी विभाजनास प्रोत्साहन देऊन कामगार वर्ग व श्रमजीवींची एकता तोडण्याचे काम करतात. हिंदुस्थानात चाललेल्या संघर्षात एका बाजूला मक्तेदार भांडवलदारी घराण्यांच्या अध्यक्षेत शोषक भांडवलदार वर्ग उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला कामगारवर्गाच्या अध्यक्षतेखाली शोषित जनसमुदाय उभा आहे, हे सत्य ह्या दोन्ही पार्ट्या लपवितात.

काँग्रेस पार्टीच्या वारशाशी नाते तोडण्याचा भाजपा दावा करते. सरदार पटेलांचा वारसा जपण्याचा भाजपा दावा करते. हिंदुस्थानच्या लोकांच्या सर्व समस्यांसाठी काँग्रेसपार्टीच्या शासनाला आणि विशेषतः नेहरू परिवाराच्या शासनाला दोषी ठरविते. खरेतर सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू, दोघेही त्या भांडवलदार वर्गाचे आघाडीचे प्रतिनिधी होते ज्या वर्गास 1947 मध्ये सत्ता प्राप्त झाली होती. हिंदुस्थानी लोकांच्या सर्व समस्या सर्वात मोठ्या मक्तेदार भांडवलदारांच्या अध्यक्षतेखालील भांडवलदार वर्गाच्या हुकूमतीचा परिणाम आहेत.

20व्या शतकात वसाहतवाद-विरोधी संघर्षात दोन विरोधी धारणांचे अस्तित्व होते. हिंदुस्थान गदर पार्टी व त्यानंतर बनलेल्या क्रांतिकारी संघटनांनी, उदा. भगत सिंहांच्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनने, वसाहतवादी शासनाचा तख्तापालट करण्यासाठी आणि कामगार व शेतकऱ्यांची हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला होता. दुसरीकडे काँग्रेस पार्टी आणि मुस्लिम लीग हिंदुस्थानच्या मोठ्या भांडवलदार व जमीनदारांच्या हितांचे प्रतिनिधी होते, जे ब्रिटीश वसाहतवादी शासन हटवून आपल्या शोषणाचे राज्य प्रस्थापित करू इच्छित होते.

क्रांतीची संभावितता पाहून, वसाहतवाद्यांनी हिंदुस्थानी भांडवलदारांबरोबर आणि त्यांच्या राजनैतिक प्रतिनिधीं बरोबर एक तडजोड केली. वसाहतवाद्यांनी हिंदुस्थानची रक्तरंजित सांप्रदायिक फाळणी आयोजित केली आणि हिंदुस्थान व पाकिस्तानच्या मोठ्या भांडवलदारांच्या प्रतिनिधींना सत्ता’ सोपविली.

हिंदुस्थानच्या मोठ्या भांडवलदारांनी ’’समाजवादी नमुन्याच्या समाजाच्या’’ झेंड्याखाली, मक्तेदार भांडवलदार घराण्यांची श्रीमंती वाढवणारी टाटा-बिर्ला योजना लागू करण्यासाठी काँग्रेस पार्टीवर भरवसा ठेवला. 1980च्या दशकापर्यंत पोहोचता-पोहोचता हा मार्ग पूर्णपणे बदनाम झाला होता आणि त्यात काही जोर उरला नव्हता. मोठ्या भांडवलदारांनी जनतेच्या असंतोषाशी खिलवाड करून उदारीकरण आणि खाजगीकरणाद्वारे जागतिकीकरणाच्या मार्गाला बढावा दिला. कामगार वर्ग आणि कष्टकरी लोकांवर हा अलोकप्रिय, समाज-विरोधी कार्यक्रम थोपण्यासाठी भांडवलदारांनी सांप्रदायिक भावना भडकाविल्या, जातीयवादी फुटीला वाढवले आणि राजकीय दहशतवाद पसरविला. ह्यासोबतच, भांडवलदारांनी काँग्रेसपार्टीला पर्यायाच्या रूपात भाजपाचे पालन-पोषण करण्यास व त्यास बढावा देण्यास सुरुवात केली.

सध्याच झालेल्या गुजरातच्या निवडणूक निकालांतून हे स्पष्ट होते की मक्तेदार भांडवलदार घराणी आपले समाज-विरोधी हल्ले तेजीने पुढे ढकलण्यासाठी, आत्तातरी भाजपा वर भरवसा करीत आहेत. भाजपा सर्वात जास्त अलोकप्रिय कामगार-विरोधी आणि शेतकरी-विरोधी योजना लागू करेल, तसेच सर्व प्रकारच्या विरोधांना मोडून काढेल. त्यासोबतच ते अशी परिस्थिती बनवू इच्छितात जेणकरून जेव्हा भाजपा बदनाम होईल तेव्हा काँग्रेस पार्टीला सत्तेत आणता येईल.

पुढील निवडणुकीत आपली काही प्रगती होईल अशी अपेक्षा करणे निष्फळ आहे हे सत्य कामगार व शेतकऱ्यांना पटवून देणे हे कम्युनिस्टांचे काम आहे. आपण कामगार वर्ग आणि शेतकऱ्यांचा आघाडीच्या कार्यकर्त्यांना हा विश्वास देण्याचे काम करत राहायला हवे की कष्टकरी बहुसंख्या राजनैतिक सत्ता काबीज करू शकतात आणि त्यांनी ते करायला हवे.

ह्या परिस्थितींत आपण कम्युनिस्टांनी मोठ्या भांडवलदारांच्या कार्यक्रमाविरुद्ध कामगारवर्ग, शेतकरी आणि दुसऱ्या शोषित घटकांचा एकजूट जनविरोध संघटित करायला हवा. आपण हे सुनिश्चित करायला हवे की ह्या संघर्षाला कामगार व शेतकऱ्यांची हुकूमत स्थापित करण्याच्या दृष्टीने पाहायला पाहिजे. भाजपाच्या जागी काँग्रेस पार्टीला सत्तेत प्रस्थापित करणे हा ज्यांचा उद्देश्य आहे त्या सर्वांद्वारे संघर्षाची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना आपल्याला हरवावे लागेल.

मोठ्या भांडवलदारांच्या हल्ल्यांविरुद्धच्या संघर्षाला तेजीने पुढे नेण्याचा कामाचा निर्णायक पैलू आहे कामगार एकता समिती बनविणे व त्यांना मजबूत करणे. कामगार-शेतकरी समित्या आणि लोकांना सत्तेत आणणाऱ्या समित्या बनविणे व त्यांना मजबूत करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व श्रमजीवींच्या अध्यक्षतेखाली एक क्रांतीकारी संयुक्त मोर्चा बनवून त्याला मजबूत करण्याच्या कार्याचा भाग आहेत. निवडणुकांद्वारे एका पार्टीला सत्तेतून हटवून आणि दुसऱ्या पार्टीला सत्तेत बसवून लोकांच्या समस्या सुटू शकतील, ह्या प्रचलित भ्रमाविरुद्ध बिन-तडजोड संघर्ष करून, आपल्याला कामगार वर्ग आणि कष्टकऱ्यांच्या अशा संघटनांना बनवायला हवे.

आपल्या पार्टीच्या पाक्षिक वतर्मानपत्राला मजबूत करणे ही ह्या कार्याच्या सफलतेची चावी आहे. आपण आपल्या पार्टीच्या वृत्तपत्राला इमारतीच्या स्तंभाप्रमाणे वापरून कारखान्यांत, कार्यस्थळी, शिक्षा संस्थानांमध्ये आणि जनसंघर्षाच्या अन्य ठिकाणी पार्टीची मुलभूत संघटने बनवून त्यांना मजबूत करायला हवे.

आपल्याला कामगार वर्गाच्या सर्वात आघाडीच्या घटकांना पार्टीमध्ये संघटित करायला हवे आणि व्यापक कामगार वर्गाला सर्वच शोषित आणि पीडित जनसमूहासोबत एका संयुक्त मोर्चात संघटित करायला हवे. आपल्याला नवतरुणींना व नवतरुणांना कम्युनिझम्साठी संघटित करण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. हे सर्व करण्यासाठी आपल्याला कम्युनिस्ट प्रचाराच्या विविध प्रकारच्या माध्यमांचा आणि तंत्रांचा विस्तार करायला हवा. कामगार वर्ग स्वतःहून कम्युनिझम् कडे आकर्षित होतो. नवयुवक प्रत्येक प्रकारच्या अन्यायाचा विरोध करतात आणि क्रांतीची उमेद बाळगतात. ह्यासाठी गरजेचे आहे कम्युनिस्ट नेतृत्व आणि संघटन. ह्या नेतृत्व आणि संघटनाला उपलब्ध करून देण्यासाठी पार्टीच्या प्रत्येक कॉम्रेडने कम्युनिझमध्ये निपुण बनायला हवे. ह्याचा अर्थ आहे की आपल्याला पार्टीच्या कार्यदिशेला संपूर्णपणे समजून घ्यायला हवे आणि जेथे-जेथे आपण काम करतो तेथे-तेथे आपल्याला पार्टीच्या कार्यदिशेचा प्रचार आणि त्याचे रक्षण करायला हवे.

आपल्या पार्टीची मूलभूत संघटने ही कम्युनिझम् च्या पाठशाळाच आहेत. प्रत्येक युनिटच्या सदस्यांना पार्टीच्या साहित्याचे अध्ययन करायला हवे, पार्टीच्या वृत्तपत्रासाठी योगदान द्यायला हवे, तसेच त्याचे वितरण करायला हवे. आपल्याला जनसमुदायांमध्ये चर्चासत्रे चालवून त्यांत असे समजवायला हवे की पार्टीने दाखविलेला मार्गच समाजातील समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग का आहे. आपल्याला वर्तमान व्यवस्था आणि बहुपार्टी-प्रतिनिधित्ववादी लोकतंत्राच्या राजनैतिक प्रकियेबाबत भांडवलदारांनी पसरविलेल्या सर्व भ्रमांचे खंडन करायला हवे. लोकांना नव-निर्माणाचा कार्यक्रम समजावून त्या कार्यक्रमाभोवती आपण त्यांना संघटित करायला हवे. कम्युनिझमचे योद्धे आणि संघटनकर्त्यांची भूमिका निभाविण्याचा हाच मार्ग आहे.

कॉम्रेड्स!

कम्युनिस्टांची एकता संघर्षाशिवाय उभारली जाऊ शकत नाही. आपल्या पार्टीची एकता बनविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आपल्याला अशा सर्व चुकीच्या विचारांविरुद्ध दृढनिश्चयी व कठोर संघर्ष करावा लागला होता, जे आघाडीच्या पार्टीसाठी तसेच क्रांतीच्या लक्ष्यासाठी हानिकारक होते.

आपल्याला दुसऱ्या पार्ट्यांतील कम्युनिस्टांसोबत अगदी तशाच प्रकारे चर्चा करायला हवी जशी आपण आपल्या पार्टीच्या आत करतो -खुली आणि स्पष्टतापूर्ण- जशी कम्युनिस्टांना शोभा देते. आपण ह्या विश्वासाने संघर्ष करायला हवा की जे कोणी कामगार वर्ग आणि कम्युनिस्टांच्या बाजूने आहेत ते क्रांतिकारी कार्यक्रमाभोवती एकजूट होतील आणि शेवटी हिंदुस्थानच्या कामगार वर्गाला दिशा प्रदान करणाऱ्या एक आघाडीच्या पार्टीत एकजूट होतील.

ह्या वेळी हिंदुस्थानी कम्युनिस्टांच्या क्रांतिकारी एकतेच्या मार्गात मुख्य अडथळा सामाजिक-लोकतंत्राशी तडजोड करणाऱ्यांची कार्यदिशा आहे. काँग्रेस पार्टी ’’कमी वाईट’’ आणि ’’धर्मनिरपेक्ष’’ पर्याय आहे असे समजून तिला पाठिंबा देण्याची कार्यदिशा ही सामाजिक-लोकतंत्राशी तडजोड करणाऱ्यांचे सर्वात निर्लज्ज स्वरूप आहे. ह्या चुकीच्या व विनाशकारी कार्यदिशेशी बिनातडजोड संघर्ष करणे ही कम्युनिस्ट एकतेची पुर्नस्थापनेची मुख्य अट आहे.

जोवर भांडवलदार वर्ग सत्तारूढ राहील, तोवर मक्तेदारी व शोषण, दमन आणि लूट वाईटाहून जास्त वाईट होत जाईल. सांप्रदायिक हिंसा तर संपुष्टात येणारच नाही व जातीयवादी दमनाचाही अंत होणार नाही. भांडवलदारांच्या हुकूमशाहीच्या वर्तमान व्यवस्थेमध्ये निवडणुकांद्वारे कोणताच ’’कमी वाईट पर्याय’’ आणला जाऊ शकत नाही. भांडवलदार वर्गाचे प्रत्येक नविन सरकार आधीच्या सरकारापेक्षाही भयानक प्रकारे आपल्यावर हल्ले करत राहील.

कामगार वर्गावर हल्ले वाढविणे आणि सांप्रदायिक भावना भडकाविणे हा शासक वर्गाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम लागू करण्याची जबाबदारी सध्या भाजपकडे आहे. भाजपाच्या जागी काँग्रेस पार्टीला निवडून दिल्याने हा कार्यक्रम बदलणार नाही.

धर्मनिरपेक्षतेची रक्षा करण्याच्या नावाखाली काँग्रेस पार्टीला साथ देण्याची कार्यदिशा काही नवीन नाही. पूर्वी ह्याच कार्यदिशेमुळे कामगार वर्गाच्या आंदोलनाला मोठा फटका बसला होता. ह्या कार्यदिशेने चालून मोठ्या भांडवलदारांच्या फासीवादी समाज-विरोधी हल्ल्यांना कधीच रोखता आलेले नाहीये. ह्या उलट अशा कार्यदिशेने कामगार वर्गाला निःशस्त्र केले गेले आहे आणि मोठ्या भांडवलदारांच्या हल्ल्यांचा मार्ग अजूनच सुकर बनवला गेला आहे. कम्युनिस्ट आंदोलनांतर्गत असे अनेक घटक आहेत ज्यांनी पूर्वी काँग्रेस पार्टी आणि नेहरूंच्या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली होती. कम्युनिस्टांच्या पुढच्या पीढीनेदेखील आपले संपूर्ण जीवन राहुल गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पार्टीला बढावा देण्यासाठी खर्चायला हवे का? की आपण कम्युनिस्टांनी कामगार व शेतकऱ्यांची हुकूमत स्थापिण्याचा उद्देश्याने क्रांतीकारी आघाडी बनविण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावायला हवी?

आपल्याला सर्व कम्युनिस्टांसमोर आणि जनसंघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर हे प्रश्न मांडायला हवेत. असा कोणता कार्यक्रम आहे ज्याच्या भोवताली कामगारवर्ग आणि लोकांना एकजूट व्हायला हवे, ह्या विषयावर प्रत्येक संधीचा उपयोग करून आपण सक्रियतेने चर्चा आणि वादविवाद करायला हवेत.

साथींनो!

37 वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या पार्टीची स्थापना झाली होती, तेव्हा आपण पार्टीच्या नावात गदर शब्द समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता, कारण आपण लोकांतील सर्वोत्तम क्रांतीकारी परंपरा आणि विचारांचे जतन करून त्यांना अजून विकसित बनवू इच्छित होतो. आज गर्वाने आपण म्हणू शकतो की आपण खरंच 1857च्या महान गदर व हिंदुस्थान गदर पार्टीच्या नेतृत्वाखाली 1915-16च्या क्रांतीकारी विद्रोहाच्या सिद्धांताचे आणि कार्यक्रमाचे जतन केले आहे आणि त्यांना अजून विकसित करत आहोत.

आजपर्यंत आपल्या पार्टीचे जीवन आव्हांनानी भरलेले आहे. आपण ज्या काळात जन्मलो आणि मोठे झालो तो काळ कामगार वर्गासाठी सर्वात कठीण काळांपैकी एक आहे तसेच कम्युनिस्ट आंदोलनासाठीच्या सर्वात आव्हानात्मक काळांपैकी एक आहे. आपल्या पार्टीने प्रत्येक टप्प्यावर बहादुरीने आव्हानांचा सामना केला आहे. आपण नेहमीच वर्गसंघर्षात अव्वल राहिलो आहोत आणि सर्वात कठीण परिस्थितीत देखील आपण तत्त्वनिष्ठ भूमिका बजावली आहे.

आपण पार्टीची आम कार्यदिशा निर्धारित केली आहे आणि हिंदुस्थानच्या नव-निर्माणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अनुकूल आहे. आपण कार्यनिती आणि संघर्षाचे विविध प्रकार विकसित केले आहेत, जे आजच्या काळात वर्गसंघर्षाला पुढे नेण्यासाठी सर्वात जास्त सफल सिद्ध होऊ शकतात.

मागील वर्षी झालेल्या पाचव्या महाअधिवेशनात वर्तमानकाळात आपल्या पार्टीच्या समोर असणारे आव्हानात्मक कार्य निर्धारित केले आहे. नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारच्या अध्यक्षतेखालील मोठ्या भांडवलदारांच्या खतरनाक फासीवादी हल्ल्यांचा सामना करत करत, आपल्याला हिंदुस्थानच्या नव-निर्माणासाठी आपले आंदोलन व प्रचार तीव्र करायला हवा. आपण पार्टीच्या मूलभूत संघटनांपासून सुरुवात करून वर्गसंघर्षाच्या सर्वच संघटनांना उभारून त्यांना मजबूत करायला हवेत.

पाचव्या महाअधिवेशनात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आपल्याला विस्तृत दृष्टीकोन ठेवून काम करायला हवे आणि स्वतःसाठी कठीण लक्ष्य निर्धारित करायला हवेत.

अधिकाधिक लोकांना आपल्या राजनैतिक कार्यक्रमाभोवती संघटित करून आपल्याला आपल्या लक्ष्यांना गाठण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. सर्व पार्टी संघटनांचे लोकतांत्रिक केंद्रीयवादी पद्धतीने कामकाज चालवणे आणि मजबूत करणे, तसेच आपल्या सर्व सदस्यांचे नियमित कम्युनिस्ट शिक्षण चालू ठेवणे हीच पूर्वीसारखी आजही आपल्या सफलतेची चावी आहे.

साथींनो या, आजही आपण आपल्या समोर असलेल्या या आव्हानात्मक कामाचा विडा त्याच बहादुरीने आणि लढाऊ भावनेने उचलुया, ज्या बहादुरीने आपण भूतकाळात प्रत्येक आव्हानाचा विडा उचलला होता.

हिंदुस्थानाच्या नव-निर्माणाच्या कार्यक्रमाभोवती कामगार, शेतकरी आणि सर्व दडपलेल्या लोकांची राजनैतिक एकता बनवून मजबूत करण्यासोबत कम्युनिस्ट एकता पुन:स्थापित करण्याच्या आपल्या प्रयत्नांना अजून तीव्र करूयात.

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी झिंदाबाद!
मार्क्सवादलेनिनवाद झिंदाबाद!
इंकलाब झिंदाबाद!

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.