आंतरराष्ट्रीय महिला दिन 2017 : एका नवीन राज्यव्यवस्थेच्या निर्मितीसाठी महिलांना आपला संघर्ष प्रखर करावा लागेल!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 27 फेब्रुवारी 2017
आज 8 मार्चच्या निमित्ताने, हिंदुस्थान आणि जगभरातील सर्व स्त्रियांद्वारे आपल्या अधिकारांसाठी व समाजातील सगळ्यांच्या मानव अधिकारांच्या रक्षणांसाठी चालविल्या जाणाऱ्या बहाद्दुर आणि अथक संघर्षाला कम्युनिस्ट गदर पार्टी मुजरा करते.
भांडवलशाही, साम्राज्यवादी युद्धे, नस्लवाद, राजकीय दहशतवाद, व तऱ्हेतऱ्हेचे दमन आणि मनुष्या-मनुष्यांतील भेदभावाविरुद्धच्या संघर्षांत स्त्रिया सतत आघाडीवर राहिल्या आहेत. त्या कामगारांच्या संपसंघर्षांत सामिल आहेत, तसेच त्या शेतकरी व नौजवानांच्या आंदोलनाचाही हिस्सा आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या व साम्राज्यवादी देशांद्वारे राष्ट्रीय अधिकारांवरील दमनाच्या विरुद्धच्या लढ्यात त्या सर्वांत जास्त सक्रीय सहभागी आहेत. अमेरिकी साम्राज्यवाद आणि त्याच्या मित्र देषांद्वारे जगभरात लढल्या जाणाÚया अन्यायपूर्ण युद्धांच्या विरोधात त्या ठामपणे उभ्या आहेत. ह्या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणात बर्बादी होत आहे, तसेच हजारों लाखों लोकांना शरणार्थी बनून घरदार सोडून जावे लागत आहे.

अांतरराष्ट्रीय महिला दिनाचा उगम
1910 मध्ये कोपेनहेगन, डेन्मार्क मध्ये आयोजित केलेल्या समाजवादी महिलांच्या द्वितीय आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती. 17 देशांतून आलेल्या 100हून जास्त महिला प्रतिनिधींनी या अधिवेशनात एकमताने ह्या निर्णयाचे अनुमोदन केले. ह्यात फिनलँड संसदेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या 3 महिलांचा समावेश होता. जर्मनीच्या कम्युनिस्ट नेत्या क्लारा झेटकिन ह्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. 1907 मध्ये स्टुटगार्ट मध्ये आयोजित समाजवादी महिलांच्या प्रथम अधिवेशनात त्यांनी जगभरातील कामगार महिलांच्या संघर्षात आणि महिला अधिकारांच्या समर्थनासाठी प्रत्येक वर्षी निदर्शने आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
ह्या प्रस्तावात अन्य गोष्टींसोबत असे म्हटंलय की ’’जगभरात महिला आंदोलन… आपला संघर्ष भांडवलदारी महिला अधिकार कार्यकर्त्यांसोबत नव्हे, तर समाजवादी पार्ट्याबरोबर गठबंधन करून चालविले जाते. आणि महिलांसाठी मताधिकार मिळविण्यासाठीचा संघर्ष सर्व व्यापक मताधिकाराचे लोकतांत्रिकीकरण करण्याचे मूल्य आणि व्यवहार ह्या दोन्हीच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.’’
पुढे म्हटंलय की ’’राजनितिक मताधिकाराच्या संघर्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी जगभरातील सर्व देशातील समाजवादी महिलांचे हे कर्तव्य आहे की आंदोलनाच्या वरील मूल्यांची कास धरून कामगार व कष्टकरी लोकांचे आंदोलन उभारणे; महिलांच्या राजनितिक मुक्तीची गरज ह्यावर चर्चा आणि साहित्याद्वारे त्यांना जागृत करण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा उचला. या प्रचारासाठी त्यांना खासकरून प्रत्येक राजनैतिक व सामाजिक मंच आणि संस्थेच्या निवडणुकीचा उपयोग करून घ्यायला हवा.’’

Womens demonstration
अधिवेशनात आलेल्या प्रतिनिधींनी हा निर्णय घेतला की ’’ह्यासाठी समाजवादी महिलांना आपल्या वर्गहितांबाबत जागरूक कामगारांच्या सर्व राजनैतिक आणि ट्रेड युनियन संगठनांसोबत एकत्र येऊन विशेष रूपाने महिला दिन आयोजित करायला हवा आणि त्यांत सर्वप्रथम महिलांसाठी मताधिकाराच्या प्रचाराला प्राधान्य द्यायला हवे. ह्या मागणीला समाजात समाजवादी दृष्टीकोनातून महिलांच्या प्रष्नांवर चर्चेचा विषय बनविला पाहिजे.

हिंदुस्थानात जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या विरुद्ध निरंतर चाललेल्या जन-आंदोलनांमध्ये स्त्रिया सर्वात पुढे आहेत. कामाच्या सर्वच जागी, मोठमोठ्या कंपन्यांपासून बेगारीच्या छोट्या दुकानांपर्यत, सरकारद्वारे श्रम कायद्यांमध्ये कामगारविरोधी बदलांच्या विरुद्ध त्या उठाव करीत आहेत. षिक्षक, नर्स, अंगणवाडी आणि ’आषा’ कार्यकर्त्या, सगळ्या महिला, कामगार म्हणून आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करीत आहेत.
आपल्या देषातील स्त्रियांनी आणि नवयुवतींनी त्या सामंती रिवाजांना आणि जुन्या-पुराण्या विचारांना आव्हान दिले आहे, जे स्त्रियांना समाजामध्ये नीच व दुय्यम दर्जाचे समजतात. त्या एका अषा नवीन कायद्याची मागणी करीत आहेत जो त्यांना स्त्रियां म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून असलेल्या अधिकारांची हमी देऊ शकेल.
सांप्रदायिक हिंसा आणि राजकीय दहषतवादाविरुद्ध संघर्षात महिला सगळ्यात पुढे उभ्या आहेत. मग ते काष्मीर असो, उत्तर-पूर्व असो, छत्तीसगढ असो वा इतर कोणतेही ’’अषांत क्षेत्र’’, स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रांत सेना राज्याच्या विरुद्ध धाडसी संघर्ष केला आहे.
आपल्या अनुभवांतून वारंवार हेच दिसून येतं की हे राज्य आणि आर्थिक व्यवस्था जिचे हे राज्य रक्षण करते, ते दोन्ही स्त्री मुक्तीच्या वाटेतील मुख्य अडथळे आहेत. पोलिस व अन्य सषस्त्र दले स्त्रियांची सुरक्षा सुनिष्चित करीत नाहीत, याउलट ते स्वतः स्त्रीविरोधी गंभीर गुन्हे करतात, ज्यात कोठडीतील बलात्कार पण समाविष्ट आहेत. न्यायालये पीडितांसाठी न्याय सुनिष्चित करीत नाहीत. स्त्री विरोधी अपराध करणाऱ्यांना शिक्षा करण्याऐवजी हिंदुस्थानी लोकतंत्राच्या सर्व संस्था त्या गुन्हेगारांचे रक्षण करतात.
वर्तमान राज्याअंतर्गत सत्तेत येण्यासाठी आपापसांत स्पर्धा करणाऱ्या पार्ट्या सर्व प्रकारच्या सामाजिक आपत्त्या मिटविण्याची आष्वासने तर देतात, परंतु सत्तेवर आल्यावर मात्र फक्त मोठ्या भांडवलदारांच्या सेवेत रुजू होतात. सर्वात मोठ्या मक्तेदार घराण्यांना अधिक श्रीमंत बनविण्यासाठी ह्या पार्ट्या महिला विरोधी व जन विरोधी भांडवलदारी कार्यक्रमच लागू करतात.
’’जगातील ह्या सर्वात मोठ्या लोकतंत्रामध्ये’’ सर्व राजनीतीक सत्ता काही मोजक्या अतीश्रीमंतांच्या हातात एकवटलेली आहे. ते आपल्या स्वार्थी हितांसाठी बहुसंख्य महिलांचे व पुरूषांचे शोषण करतात. प्रचलित आर्थिक व्यवस्था उत्पादन साधनांच्या खाजगी मालकीवर आधारित आहे. ती मानवी श्रमाचे अत्याधिक शोषण करीत, छोट्या उत्पादकांची लूट करून आणि प्राकृतिक संसाधनांचा नाष करीत जास्तीत जास्त भांडवलदारी नफा मिळविण्यासाठी काम करते. महिलांना निकृष्ट दर्जा आणि त्यांचे अत्याधिक शोषण, ह्या आर्थिक व राजनितीक व्यवस्थेत निहीत आहे.
जे लोक असा दावा करतात की महिलांच्या मुक्तीचा संघर्ष आणि कामगारांचा संघर्ष ह्यांत कुठलाच संबंध नाही, ते लोक उघडपणे खोटे बोलत आहेत. महिला-मुक्तीचा संघर्षाला नामोहरम करणे, हाच त्यांचा हेतू आहे. दरवर्षी 8 मार्चला अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी पुढाकार ज्या कामगार महिलांनी घेतला होता, त्या समाजवाद आणि कम्युनिझम् आंदोलनांच्या नेत्या होत्या.
आजपासून 100 वर्षांपूर्वी 8 मार्च, 1917 रोजी रशियातील महिला यु़द्ध, उपासमार आणि झारच्या ही राजवटीला संपविण्याची मागणी करीत पेट्रोगार्ड व अन्य शहरांमध्ये रस्त्यांवर उतरल्या होत्या. महिलांच्या ह्या विरोध प्रदर्शनामुळे झारशाही संपविण्याच्या क्रांतिकारी आंदोलनाला जबरदस्त उभारी मिळाली. पुढे जाऊन रशियन महिलांनी रशियन क्रांतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. कामगार वर्गाने शेतकरी व सैनिक गठबंधनासोबत ही महान ऑक्टोबर क्रांती घडवून आणली आणि सत्ता हस्तगत केली. नव्या समाजवादी समाजाच्या निर्मितीमध्ये  महिलांनी पुरुषांच्या खांद्यास खांदा लावून काम केले.
रशियातील क्रांतीकारी अनुभवाने हे सिद्ध केले की श्रमजीवी क्रांती आणि समाजवादाचा मार्ग, हाच महिलांच्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. त्या वेळेपासून आजपर्यंत जगभरातील भांडवलदार, महिलांना महिला म्हणून एकजूट होण्यापासून तसेच कामगार वर्ग व सर्व शोषित-पीडित लोकांसोबत एकजूट होण्यापासून रोखण्यासाठी नित्य नवी कारस्थाने रचित आहेत. महिला आंदोलनाची दिशाभूल करण्यासाठी ते असा समज पसरवितात की पुरुष हे महिलांचे मुख्य शत्रू आहेत आणि महिलांचा खरा संघर्ष केवळ आपल्या कूटुंबात बरोबरीच्या स्थानासाठी संघर्ष करणे, एवढ्यापुरताच सीमित आहे.
आपल्या देशाचे राज्यकर्ते मोठे भांडवलदार, मोठे जमीनदार आणि अन्य धनवान तबकांशी हातमिळवणी करून, लोकांवर राज्य करण्यांसाठी आपल्या गुरूंकडून, म्हणजेच ब्रिटीश वसाहतवाद्यांकडून शिकलेल्या ’फोडा आणि राज्य करा’ व इतर मार्गाचा अवलंब करीत आहेत. ते जाणूनबुजून धर्म, जात, राष्ट्रीयता आणि जमातींच्या आधारावर लोकांना एकमेकांविरुद्ध भडकावित राहिले आहेत. वेगवेगळ्या जाती व समुदायांना आरक्षणाद्वारे त्यांतील धनवान व बलवान लोकांना आपल्या गटांत सहभागी करण्याचा मार्ग वापरत आहेत.
मोदी सरकार पण महिलांना संसद तसेच राज्यांतील विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचे जुन्यापुराण्या आष्वासनाची पुनरावृत्ती करत आहेत. सत्तेचे हे आमिष 1996 पासून महिला आंदोलनास वारंवार दाखविले जात आहे. ह्याचा उद्देष आहे, संघर्ष करत असलेल्या महिलांना प्रस्थापित  व्यवस्थेशी झोता करण्यासाठी राजी करणे. ह्याचा उद्देष आहे, काही मोजक्या महिलांना वर्तमान सत्ता व्यवस्थेत समाविष्ट करून महिलांची लढाऊ एकता तोडणे.

100 वर्षांपूर्वी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने
8 मार्च 1917 रोजी रशियातील पेट्रोगार्ड शहरात हजारों महिला रस्त्यांवर उतरल्या होत्या. त्यांत काही कामगार होत्या, तर काही सैनिकांच्या पत्नी. ह्या सर्व महिला मागण्या करत होत्या की ’’आमच्या मुलांना भाकरी द्या’’ आणि ’’आमच्या पतींना युद्धाच्या मैदानांतून परत बोलवा’’. त्या वेळेपर्यंत ’’महिलांसाठी मताधिकाराचा’’ नारा झारशाही रशियाच्या कानाकोपऱ्यात पसरला होता.
त्या वेळी चालू असलेल्या प्रथम विष्व युद्धामुळे संपूर्ण युरोपमध्ये कामगारांची हालत असहनीय झाली होती. 1915 पासून सुरू झालेली विद्रोहाची लाट संपूर्ण जर्मनीत पसरली होती.ऑस्ट्रिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व रशियामध्ये ’’गृहिणींचे उठाव’’ तेजीने आणि वारंवार होवू लागले. ऑक्टोबर 1915 मध्ये रशियातील कापड उद्योगाचे केंद्र असणाÚया बोगोरोडस्कमध्ये बाजाराच्या दिवशी विद्रोहाला सुरुवात झाली. 12000 हून अधिक महिलांनी सुरू केलेला हा हडताळ काही आठवडे सुरूच होता.  
जून 1916 मध्ये रशियाच्या गोर्दिव्का शहरात जवळ-जवळ 1000 महिलांच्या जनसमुहाने विद्रोह सुरू केला. प्रत्येक दुकानात जाऊन त्यांनी दुकानदारांना आपली गोदामे उघडण्यास सांगितले. ऑगस्ट 1916 मध्ये जर्मनीत सैनिकांच्या पत्नींच्या एका समूहाने हॅम्बर्ग सिनेट (संसद)ला शांती तहाच्या समर्थनाची मागणी करणारे पत्रक लिहिले. त्यांनी लिहिले की ’’आमची इच्छा आहे की आमचे पती व आमची मुले युद्धभूमी वरून परत यावेत, आम्ही अजून भुकेलेले नाही राहू शकत.’’
ह्या दरम्यान झालेले सर्वाधिक प्रसिद्ध निदर्शन 8 मार्च 1917 ला रशियामध्ये  झाले. हजारों महिला कामगार व गृहिणींनी पोलिसांना टक्कर दिली. त्यांनी झारच्या सैनिकांना आपल्यासोबत एकजूट होण्याचे आवाहन केले. दुसऱ्या दिवशी 2 लाख महिला व पुरुष कामगार संपावर गेले. लोकांच्या मागण्या अधिकाधिक राजनैतीक बनू लागल्या आणि लोक घोषणा करू लागले की ’’युद्ध मुर्दाबाद’’, ’’झारशाही मुर्दाबाद’’. पेट्रोगार्ड छावणीतील सैनिकांनी लोकांवर गोळ्या व बंदुका चालविण्याचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावले.
100 वर्षांपूर्वी 8 मार्चला रशियातील महिलांनी जे बहादुरीचे काम केले, त्यामुळे जनविद्रोहाला भडकाविले आणि झारचा तख्ता उलथाविला. ह्याला फेब्रुवारी क्रांती म्हणून ओळखले जाते. (रशियन कॅलेंडरनुसार  फेब्रुवारी महिना)

आपल्या राज्यकर्त्यांनी विणलेल्या ह्या खतरनाक जाळ्यात महिलांनी अडकता कामा नये असे हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीला वाटतेण् वर्तमान संसदेत काही आरक्षित जागा मिळविणे हे महिला आंदोलनाचे लक्ष्य नाहिये. महिला आंदोलनाचे लक्ष्य आहे की ह्या ’’गप्पागोष्टींच्या दुकानाच्याजागी’’, म्हणजेच संसदेच्या जागी, एका अशा संस्थेची निमिती करणे जी खऱ्याखुऱ्या अर्थाने कष्टकरी  महिला-पुरूषांचे प्रतिनिधित्व करेल. आपले लक्ष्य एका  अशा नव्या राज्याची व राजनितीक प्रकियेची बांधणी करणे आहे, ज्यात सत्तेची सूत्रे कष्टकरी लोकांच्या हातात असतील, मोजके मोठे भांडवलदारांच्या व अन्य शोषकांच्या मुठीतील नेत्यांकडे नव्हे. असेच राज्य सर्वांच्या समृद्धी आणि सुरक्षेची हमी देऊ शकते. एक असे राज्य जेथे कोणीच महिलांचा अधिकारांचे आणि त्यांच्या मानसन्मानांचे उल्लंघन करण्याची हिंमत करू शकणार नाही.
महिलांना आपल्या घरपरिसरात व कामाच्या जागी महिला म्हणून आणि समाजातील सर्व प्रकारचे शोषण संपविण्यासाठी कामगारवर्गाच्या आंदोलनाचा एक हिस्सा बनून एकजूट व्हावे लागेल. आपण सर्व कामगार महिला पुरुष, युवती-युवकांना आपल्या कामाच्या जागी, महाविद्यालयांमध्ये आणि रहिवासी विभांगामध्ये आपल्या समित्या बनवाव्या लागतील. आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करत करत आपण स्वतःला आपल्या देशाचे व समाजाचे राज्यकर्ते बनण्याची तयारी करायला हवी.
अंतरराष्ट्रीय महिला दिन ही एक संधी आहे जेव्हा आपण सर्व महिला एक असे जग निर्माण करण्याची पुनःप्रतिज्ञा करतो, जिथे अन्यायपूर्ण युद्ध नसेल, जिथे शोषण आणि दमन होणार नाही, जिथे लिंगाच्या किंवा अन्य कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही.
या, आपण सगळे हिंदुस्थानाच्या नवनिर्माणासाठी, एका आधुनिक लोकतांत्रिक राज्याच्या निर्माणासाठी एकजूट होऊया, ज्यात निर्णय घेण्याचा अधिकार, म्हणजे सार्वभौमत्व लोकांच्या हाती असेल. आपल्या लोकतांत्रिक, वसाहतवाद विरोधी, सामंतवाद विरोधी संघर्षाला पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच भांडवलशाचा तख्तापलट करण्यासाठी एकजूट व्हा!
समाजाच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असलेल्या सर्व महिलांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही सर्व कम्युनिस्ट गदर पार्टी मध्ये सामील व्हा, व कामगार वर्गाच्या अग्रिम हिश्श्याला आणि कम्युनिझम्साठी चालविलेल्या क्रांतिकारी आंदोलनाला मजबूत बनवा.
महिला मुक्तीचा संघर्ष झिंदाबाद!
इंकलाब झिंदाबाद!

 

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *