पॅलेस्टिनी लोकांशी एकजुटीचे जागतिक स्तरावर प्रदर्शन

US-capitol_protest-231019
अमेरिकन संसदेत (कॅपिटोलमध्ये) निदर्शक युद्धबंदीची मागणी करत आहेत

जगभरातील अनेक शहरांमध्ये पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ हजारो हजारो लोकांची प्रचंड मोठी निदर्शने होत आहेत. इस्राईलने केलेले गाझा वरील बॉम्बिंग, मुलांची हत्या, हॉस्पिटल्स आणि निवासी क्षेत्रांवरील बॉम्ब हल्ले यांचा निदर्शक धिक्कार करत आहेत. इस्राईल सरकारने गाझा प्रदेशाची जी क्रूर नाकाबंदी केली आहे, पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा तोडला आहे, आणि गाझाला वैद्यकीय आणि इतर मानवतावादी मदतीपासून वंचित ठेवले आहे त्याचाही ते धिक्कार करत आहेत. पॅलेस्टिनी लोकांचे हत्याकांड तसेच कब्जाकारी आणि विस्तारवादी गुन्हे करणाऱ्या इस्राईलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकन आणि युरोपियन साम्राज्यवादी शक्तींचाही ते धिक्कार करत आहेत. पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवणाऱ्या निदर्शकांच्या “पॅलेस्टिनी लोकांनो आम्ही तुमच्या सोबत आहोत”, “पॅलेस्टाईन कधीच एकटे राहणार नाही”, “पॅलेस्टाईनला स्वतंत्र करा” इत्यादी अनेक घोषणांनी आसमंत दुमदुमत आहे.

अमेरिकेतील विद्यापीठांमधील निदर्शने

कोलंबिया विद्यापीठ

न्यूयॉर्क विद्यापीठ

बोस्टन विद्यापीठ

कॉर्नेल विद्यापीठ

Demonstrators condemning the genocide of civilians in Gaza were witnessed in Australia, Brazil, Canada, Denmark, Ireland, Sri Lanka and Sweden. Tens of thousands of people protested in The Hague – Netherlands, Barcelona-Spain, in Rome-Italy, Mexico city, Tokyo-Japan, Cape Town-South Africa and at the UN Headquarters in Geneva-Switzerland. Student-led rallies have exploded from coast to coast in universities across the US. Hundreds of university students gathered in the southern French city of Toulouse on 11th October to demonstrate their support for Palestine.

मँचेस्टर, इंग्लंड

लंडन, इंग्लंड

जिनिव्हा, स्वित्झर्लंड

माद्रिद, स्पेन

लिस्बन, पोर्तुगाल

अम्सटरडॅम, नेदरलँड

रोम,इटली

अथेन्स, ग्रीस

बर्लिन, जर्मनी

कोपेनहेगन, डेन्मार्क

ओटावा, कॅनडा

टोरोंटो, कॅनडा

बेलफास्ट, आयर्लंड

अडलेड, ऑस्ट्रेलिया

शिकागो, अमेरिका

सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका

अमेरिकन विद्यापीठातील निदर्शन

इस्रायली दूतावासाच्या बाहेर, शिकागो, अमेरिका

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, डेन्मार्क, आयर्लंड, श्रीलंका आणि स्वीडनमध्ये गाझामधील नागरिकांच्या नरसंहाराचा अनेक निदर्शकांनी धिक्कार केला. हेग-नेदरलँड्स, बार्सिलोना-स्पेन, रोम-इटली, मेक्सिको सिटी, टोकियो-जपान व केपटाऊन-दक्षिण आफ्रिकामध्ये आणि जिनिव्हा-स्वित्झर्लंड येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयापुढे हजारो हजारो लोकांनी निदर्शने केली. अमेरिकेतील या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंतच्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शने झाली. पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी ११ ऑक्टोबर रोजी दक्षिण फ्रांस मधील टुलुझ शहरात जमले.

१९ ऑक्टोबर रोजी, “आमच्या नावाने नाही” असे नारे लिहिलेले बॅनर आणि फलक घेतलेले शेकडो ज्यू निदर्शक अमेरिकन सरकारच्या केंद्रस्थानी – म्हणजे जिथे अमेरिकेच्या विधिमंडळाची बैठक होते त्या वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटोल हिल येथे जमले. अमेरिकन काँग्रेसने (विधी मंडळाने) गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करावी अशी मागणी ते करत होते. आंदोलकांनी कॅपिटोल इमारतीकडे जाणारा मुख्य रस्ता रोखला आणि जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणे सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. ३०० हून अधिक निदर्शकांना पोलीस लाईन्स ओलांडल्याबद्दल अटक करण्यात आली. पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या प्रमुख शहरांमध्ये १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान अनेक निषेध निदर्शने आयोजण्यात आली.

लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टर आणि स्कॉटिश राजधानी एडिनबर्गसह ग्रेट ब्रिटनमधील सर्व प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. या शहरांमधून निघालेल्या १ लाखाहून अधिक लोकांनी गाझा तसेच इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी प्रतिकारक आणि इस्रायली सैन्य यांच्यातील युद्धात हजारो निष्पाप लोकांची जी हत्या होत आहे ती थांबवण्याची मागणी केली.

मलेशिया, इंडोनेशिया, इराण, इराक, जॉर्डन, तुर्की आणि येमेनमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला आणि मोठे पॅलेस्टिनी झेंडे फडकावले.

अमेरिकेमधील ज्यू लोक घोषित करत आहेत कि -“आमच्या नावाने नाही!

Not_in_our-Name

Hundreds of thousands people poured out into the streets in Malaysia, Indonesia, Iran, Iraq, Jordan, Turkey and Yemen. The angry crowds expressed condemnation of Israel’s attacks on Gaza and waved large Palestinian flags.

इस्तंबुल, तुर्कीये

दमास्कस, सिरीया

केप टाऊन, साउथ आफ्रिका

सेओल, कोरिया

कौलालंपूर, मलेशिया

कराची, पाकिस्तान

अम्मान, जॉर्डन

बघदाद, ईराक

हवाना, क्यूबा

बोगोटा, कोलंबिया

बैरुत, लेबनॉन

साना, येमेन

रामल्ला, वेस्ट बँक

नाबलूस, वेस्ट बँक

फ्रान्स आणि जर्मनी मध्ये पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांवर बंदी घातली होती. त्या देशांतही लोकांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या उपस्थितीत असंख्य ठिकाणी निषेध निदर्शने केली. अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली.

हिंदुस्थानातही, देशभरात शेकडो विद्यार्थी युवांनी नवी दिल्ली, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ (एएमयू) आणि उत्तर प्रदेशातील इतर शहरांमध्ये तसेच पुणे, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे “नरसंहार आणि कब्जा मान्य करू नका” अशा घोषणा असलेले बॅनर घेऊन निदर्शने केली. गाझावर इस्त्रायली हवाई हल्ल्यानंतर दक्षिणेकडील केरळ राज्यातील शेकडो ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. बेंगळुरू, दिल्ली आणि इतर ठिकाणी पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे तर एएमयूच्या विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहेत. इस्रायल-हमास तंट्याबद्दल भारत सरकारच्या भूमिकेला विरोध केल्यास आणि सोशल मीडियावर पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी आवाज उठविल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे.

बेंगलुरू

पुणे

संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालयाच्या बाहेर, कोलंबो, श्रीलंका

नवी दिल्ली

फ्रान्स, जर्मनी आणि इतर देशांच्या सरकारांनी शांततेसाठीचे आणि न्यायासाठीचे लोकांचे आवाज दडपून टाकण्याचा  प्रयत्न केला आहे. मात्र, ते त्यांच्या प्रयत्नात अपयशी ठरले आहेत. जगभरातील लोक गाझामधील नरसंहार बंद करण्याची मागणी करत आहेत. इस्रायलने पॅलेस्टाईनचा ताबा संपवण्याची त्यांची मागणी आहे. पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्याच मायभूमीत शांततेत राहण्याच्या हक्काच्या समर्थनार्थ ते उभे आहेत.

 

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *